Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Egg: रोज अंडे खाल तर शरीर बनेल मजबूत! जाणून घ्या अंड्याचे जबरदस्त फायदे

by
May 23, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Egg: अंडे  हे सर्वात पौष्टिक आणि परिपूर्ण अन्न मानले जाते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी अंडे फायदेशीर आहे. म्हणूनच अंड्याला “सुपरफूड” असे म्हटले जाते. शरीराला आवश्यक असलेले अनेक महत्त्वाचे पोषक घटक अंड्यात असतात. विशेष म्हणजे अंडे प्रोटीनचा उत्तम स्रोत मानले जाते.

तज्ज्ञांच्या मते, निरोगी शरीरासाठी दररोज सुमारे ५० ते ६० ग्रॅम प्रोटीनची गरज असते. एका अंड्यात साधारण ५ ते ६ ग्रॅम प्रोटीन मिळते. त्यामुळे रोज दोन अंडी खाल्ल्यास शरीराला १० ते १२ ग्रॅम प्रोटीन सहज मिळू शकते. ज्यांची शारीरिक हालचाल किंवा व्यायाम जास्त असतो, ते दोनपेक्षा अधिक अंडीही खाऊ शकतात.

अंड्यात केवळ प्रोटीनच नाही, तर अनेक महत्त्वाचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यात व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी२ आणि फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळतात. हे सर्व घटक शरीराची ताकद, स्टॅमिना आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.  (Egg)

अंड्यातील सेलेनियम थायरॉईड आणि प्रजनन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कोलीन नावाचा घटक शरीरातील पेशींची वाढ आणि मेटाबॉलिझमसाठी महत्त्वाचा असतो. फॉस्फरस हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करतो. तसेच व्हिटॅमिन ए डोळे, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त आहे.

अंडे हृदयासाठीही फायदेशीर मानले जाते. अंड्यातील चांगले फॅट शरीरातील गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. योग्य प्रमाणात अंड्याचे सेवन केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.  (Egg)

जिम करणाऱ्या किंवा व्यायाम करणाऱ्या लोकांना अंडी खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. कारण अंड्यातील प्रोटीन स्नायू मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरते. मसल्स बिल्डिंगसाठी अंडे खूप फायदेशीर आहे. याशिवाय अंडे खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, त्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते.

अंडे केस आणि नखांसाठीही उपयुक्त आहे. अंड्यात सल्फरयुक्त अमिनो अॅसिड असतात, जे केसांची चमक वाढवतात आणि नखे मजबूत बनवतात. त्यामुळे सौंदर्य टिकवण्यासाठीही अंडे फायदेशीर मानले जाते.  (Egg)

गर्भवती महिलांसाठी अंडे अधिक उपयुक्त आहे. गर्भातील बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी फोलेट आणि व्हिटॅमिन्सची गरज असते. अंडे खाल्ल्याने आई आणि बाळ दोघांनाही आवश्यक पोषण मिळते.

मात्र, अंडी नेहमी योग्य प्रमाणात आणि संतुलित आहारासोबत खाणे महत्त्वाचे आहे. उकडलेले अंडे हे सर्वात हेल्दी पर्याय मानले जाते.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar