बदाम उष्ण पण पौष्टिक असतात. बदामाला “नेत्रोपमफल’ व “वातशत्रू’ असे म्हणतात. बदाम हे शक्तीवर्धक आहे. त्याचप्रमाणे बौद्धिक वाढ करणारे आहे. त्यामुळे लहान मुलांना दुधात उगाळून बदाम दिला जातो.
बदामाचे काही औषधी उपयोग –
-वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांमध्ये बदाम वापरले जातात कारण बदाम हे त्रिदोष नाशक आहेत. तसेच ते मेंदूला व नेत्रांना पुष्टी देतात त्यांचे आरोग्य सुधारतात. ज्यांच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे असतील तसेच ज्यांची त्वचा काळवंडलेली असेल त्यांनी बदामाची भुकटी दुधामधून चेहऱ्याला लावावी. तसेच काळ्या वर्तुळांनाही लावावी. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्याचा वर्ण खुलवते व नेत्र तेजही वाढवून डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे कमी करते.
-मेंदूचा कमजोरपणा घालविण्यासाठी बदाम अत्यंत उत्तम असतात. ज्यांना मेंदूचे विकार असतील त्यांना रोज एक बदाम भिजवून खायला द्यावा.
-बदामामुळे स्मरणशक्तीही वाढते म्हणून बदामाचे चूर्ण दुधात घालून लहान मुलांना तसेच वृद्धांनाही द्यावे. त्यामुळे बुद्धी तल्लख होते.
-नजर कमी झाली असता बदाम-तूप व साखर एकत्रित करून ते आंबवून खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे नेत्रदोष जातो.
-थंडीमध्ये बनविण्यात येत असलेल्या पाकांमध्ये स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यात खास करून बदामाचा उपयोग केला जातो.
-कॉडलिव्हरप्रमाणे बदामाचे तेल क्षयरोगात फायदेशीर असते. क्षयरोग बरा व्हायला मदत करते.
-रोज एक बदाम खाल्ला तर तो केसांच्या आरोग्याला उत्तम आहेत. केस गळणे, अकाली पांढरे होणे ह्या समस्या येत नाहीत म्हणून बदाम केशवर्धक आहेत.