ही झाडे शेतात उगवतात. त्यांना गुजराथीत एखरो असे म्हणतात. संस्कृतमध्ये याला कोकिलाक्ष असे म्हणतात. कोकणात कोळसुंदा म्हणून ओळखली जातात. सर्वसाधारण लोक याला तालीमखाना म्हणतात. आयुर्वेदीय दुकानात तालीमखान्याच्या बिया मिळतात.
लघवीला साफ होण्यासाठी – तालीमखान्याच्या बिया लघवीच्या विकारांवर मोठे औषध आहे. लघवीे नीट सुटण्यासाठी तालीमखान्याचे चूर्ण, दूध व खडीसाखर यातून घ्यावे. त्यामुळे लघवी साफ होते.काहीवेळा लघवी थोडी-थोडी सारखी होते. तेंव्हाही या विकारही या औषधाने बरा वाटते. जर लघवीतून पू जात असेल तर थांबतो. ( ayurvedic talmakhana increase masculinity )
पू-प्रमेहावर – पू-प्रमेहात हे अत्यंत उपयुक्त औषध आहे. पू-प्रमेहात तालीमखाना दूध व खडीसाखर यातून दिले असता दोन तीन आठवड्यात बरे वाटते
अतिसारावर – अतिसारावर तालीमखाना चूर्ण गाईच्या दह्यातून दिले असता गुण येतो.
खोकल्याकरिता – खोकल्याकरिता मध व तूप याबरोबर तालीमखान्याचे चूर्ण घेतले असता खोकला थांबतो. अत्यंत औषधी असा तालीमखान्याचा क्षार बनविण्याची कृती – या झाडाची पाने, मुळे, फळे व साल ही घेऊन जाळून नंतर ती राख कल्हईच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात टाकावी व ते पाणी खूप ढवळावे. दुसऱ्या दिवशी ती राख खाली बसली म्हणजे वरील पाणी अलग काढून घ्यावे व राहिलेले मिश्रण पाणी आटेपर्यंत उकळवावे.खाली शिल्लक राहिलेल्या पदार्थास तालीमखान्याचा क्षार म्हणतात.
उदर व मुतखड्यावर उपयुक्त -तालीमखान्याचा मुख्य उपयोग उदर व मुतखडा यावर होतो. तालीमखान्याचा क्षार, तालीमखान्याच्या मुळांच्या काढ्यातून दिला असता मुतखडा जातो असे म्हणतात. ( ayurvedic talmakhana increase masculinity )
सांधेदुखीकरिता – सांधेदुखीकरिता तालीमखान्याचे चूर्ण, धूप, गुग्गुळ गरम करून सांध्यास लावले असता सांधे दुखणे थांबते.
पुरुषत्वासाठी – पुरुषांचे पुरुषत्व वाढावे म्हणून भारतात अनेक ठिकाणी तालीमखान्याचे चूर्ण वापरले जाते. 3 ग्रॅम चूर्ण, 250 मि. ली. आटीव दुधातून सांजसकाळ घेतले असता पुरुषत्व वाढते.
पोट फुगीवर – यकृत वाढले आहे, पोट फुगले आहे, लघवीस अडथळा होतो अशा वेळी तालीमखान्याचे चूर्ण किंवा क्षार घेतला असता परसाकडे व लघवीस साफ होऊन एका आठवड्यात गुण येतो.अशाप्रकारे तालीमखाना ही बहुगुणी वनौषधी आहे.( ayurvedic talmakhana increase masculinity )