समाजामध्ये सर्वांसाठी तोंडाचे आणि दातांचे आरोग्य फारच महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्यस तुम्हांला एका निरोगी जीवनाकडे नेईल ह्याच्याण सर्व प्रकारच्यात शक्यता आहेत. (संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनामध्ये तोंडाच्या (मौखिक) आरोग्याचा फार मोठा वाटा आहे)
( bad breath )
खालील सूचना आपणांस सर्वोत्तम उपयोगी पडतील
आपले दात जागेवर धरून ठेवण्यासाठी हिरड्या (जिंजिव्हे) त्यांच्याभोवती असतात. हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी, मुखाचे आरोग्य राखणाऱ्या सवयींचा अवलंब करा. दररोज किमान दोनदा ब्रशने दांत स्वच्छ घासा, दररोज एकदा तरी फ्लॉसिंग (दातांमधील फटी दोर्यादने साफ करणे) करा आणि दातांच्या डॉक्टरकडे नियमितपणे जाण्याचे वेळापत्रक राखा. आपल्या हिरड्या लाल आणि सुजलेल्या असतील आणि त्यांमधून चटकन रक्त येत असेल तर त्यांना जंतुसंसर्ग झाला आहे असे समजा. ह्यास जिंजिव्हायटिस असे म्हणतात. त्वरित उपचाराने तोंडाचे आरोग्य पुन्हा मिळवा. उपचार न केल्यास, जिंजिव्हायटिस खूपच गंभीर होऊन पेरिओडोंटिटिस रोग होईल आणि दात पडू लागतील.
तोंडाच्या आरोग्यासाठी ब्रश करा
तोंडाच्या आरोग्याची सुरुवात स्वच्छ दातांनी होते. ब्रश करण्याचे हे मूलभूत तंत्र समजून घ्या –
दररोज किमान दोनदा ब्रशने स्वच्छ घासा घाई न करता, हे कार्य व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी पूर्ण वेळ लावून ब्रश करा.
योग्य टूथपेस्ट आणि टूथब्रश वापरा: फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट आणि नरम केसांचा
ब्रश वापरा
ब्रशिंगची योग्य पद्धत वापरा : ब्रश दातांसमोर कोनात धरा व कमी अंतरात पुढे-मागे घासा. दातांचे चर्वण पृष्ठभाग तसेच जीभ ही घासा. मात्र फार वेगाने व दाबाने घासू नका अन्यथा हिरड्यांना इजा होईल.
टूथब्रश बदलणे : दर तीन-चार महिन्यांनी नवीन टूथब्रश घ्या. ब्रशचे केस फिस्कारले गेले तर ह्या आधी देखील तोंडाच्या आरोग्यासाठी सर्वसाधारण सल्ले व सूचना
नरम ब्रिसलचा ब्रश वापरा. ( bad breath )
प्रत्येक जेवणानंतर खळखळून चुळा भरा.
अडकलेले अन्नकण काढण्यासाठी फ्लॉसिंग (दातांमधील फटी दोऱ्याने साफ करणे) करा.
तोंड कोरडे पडू लागल्यास लाळेचे प्रमाण वाढवण्यासाठी बिनसाखरेचे च्युईंगगम चघळा.
लाळेचा प्रवाह वाढवण्यासाठी शुगर-फ्री च्युईंगम चघळा.
स्नायूंना व्यायाम घडविण्यासाठी कडक व दाणेदार पदार्थ खा.
मद्यार्कविरहित माउथवॉशचाच वापर करा कारण मद्यार्कयुक्त माउथवॉशने तोंड कोरडे पडते (झेरोस्टोमिया – तोंड कोरडे पडणे).
जीभ स्वच्छ आहे ह्याची खात्री करण्यासाठी टंग क्ल्ीनर वापरा. जिभेवर जीवाणूंचा थर जमल्यास हॅलिटोसिससारखे रोग होऊ शकतात. टूथब्रशने देखील जीभ स्वच्छ करता येते.
पडून गेलेल्या दातांच्या ठिकाणी खोटे दात बसवावे (इंप्लांट्स) म्हणजे क्राउन्स आणि ब्रिजना आधार मिळतो व चेहऱ्याची एकंदर ठेवण चांगली दिसते.
दात झिजले असल्यास, तुम्ही विविध उपाय करून त्याचचे निवारण मिळवू शकता. क्राउन लावून ते मूळ आकारात आणता येतात तसेच इंप्लांटचे देखील विविध प्रकार असतात.
सरते शेवटी, सांगायचे म्हणजे धूम्रपानामुळे तोंडाचे आरोग्य पारच बिघडते. त्याने दात तर काळे पडतातच शिवाय इतर अनेक गंभीर परिणाम होतात.
गुटख्याची समस्या ( bad breath )
गुटखा म्हणजे तंबाखू, चुना, सुपारी व एक विषारी द्रव्य आणि सुगंधी मसाला इ. चे मिश्रण असते. अनेक नावांनी गुटखा विकला जातो. पान मसाला, गुटखा, सुपारी आदी पदार्थ चघळणाच्या सवयीमुळे हा आजार दिसून येतो. या आजारात तोंडातल्या मऊ त्वचेखालील भाग निबर होत जातो. यामुळे तोंडाची हालचाल आखडत जाते. तोंडात पांढरट चट्टे दिसू लागतात. हा चट्टा बोटाने चाचपता येतो. जीभेवरही पांढरट डाग येतात. जीभ संगमरवरी पांढरट गुळगुळीत दिसते. हा आजार हळूहळू काही महिन्यांत वाढतो. दिवसेंदिवस तोंड उघडायला कठीण होऊ लागते. आजार जास्त वाढेपर्यंत त्या व्यक्तीला पुरेसे कळून येत नाही. आणखी एक लक्षण म्हणजे मसाला, तिखट तोंडाला अजिबात लागू देत नाही, खूप झोंबते. या आजारातून पुढे कॅन्सर उद्भवू शकतो. गुटखा विकण्याला महाराष्ट्रात बंदी आहे. काही राजकीय पक्षांनी याबद्दल मोहीम सुरू केली होती.
तरीही बेकायदेशीररित्या गुटखा निरनिराळ्या नावाने विकला जात आहे. लोकशिक्षण हा यासाठी जास्त चांगला व टिकाऊ उपाय आहे. संपूर्ण भारतातही आता गुटख्याला बंदी लागू झाली आहे. उपचार गुटखा रोगावरचा उपायही बरेच दिवस करावा लागतो. (अ) बीटा- कॅरोटीनची रोज एक गोळी याप्रमाणे सहा महिने द्यावी. (ब) काही दंतवैद्य मानवी वारेचे सत्त्व इंजेक्शनच्या स्वरूपात डागाखाली टोचतात. (क) या उपायांबरोबरच आखडलेले तोंड सैल करावे लागते. यासाठी एक गुळगुळीत लाकडी पाचरीसारखी फळी दिवसातून 3-4 वेळा तोंडात 15-20 मिनिटे ठेवावी. रोज थोडी थोडी जास्त पाचर घालावी. यामुळे हळूहळू तोंड सैल होते.( bad breath )
पानमसाला, गुटखा, सुपारी, इ. सवयी पूर्णपणे थांबवाव्यात. यासाठी बंदीबरोबरच लोकशिक्षण करावे लागेल. हिरड्यांवर अनेक कारणांनी सूज येते. तोंडाची स्वच्छता न राखल्यामुळे क जीवनसत्त्व (पालेभाज्या, लिंबू, आवळा, संत्री) कमी पडल्यामुळे. हिरड्यांवर सूज असेल तर हिरड्या सळसळतात, शिवशिवतात, कधीकधी ठणकतात. मात्र हिरड्या ठणकणे म्हणजे पू झालेला असतो. मिश्रीची सवय असल्यासही हिरड्यांना त्रास होऊ शकतो. गोड पदार्थ, जास्त शिजवलेले पदार्थ व पिठूळ पदार्थ, इत्यादींनी दातांच्या फटीमध्ये अन्नकण राहतात. यामुळे दात व हिरड्यांचे रोग लवकर होतात. कीटण चढले असल्यास, तोंडात दुर्गंधी येत असल्यास, हिरड्यांतून पू व रक्त येत असल्यास दंतवैद्याकडून वेळीच उपचार करावे.
बऱ्याच जणांच्या दातांवर एक प्रकारचे कठीण पिवळे कीटण चढते. यामुळे हिरड्या व दात यांमध्ये फट तयार होते. अन्नकण यात अडकून कुजतात व दुर्गंध येतो, कीटणामुळे हिरड्यांची हानी होते. यामुळे दातांचा मुळाकडचा भाग उघडा पडत जातो. या सर्व घटनाक्रमामुळे हिरड्यातून पू व रक्त येते. यामुळे हळूहळू दात दुबळे होऊन पडतात. दातांवर कीटण न चढेल इतकी स्वच्छता रोज पाळणे आवश्यक आहे. ब्रशचा वापर करताना हा उद्देश लक्षात ठेवावा. दातांची योग्य निगा ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे. उपचार क जीवनसत्त्वाची गोळी रोज एक याप्रमाणे 5 दिवस द्यावी किंवा त्याऐवजी आवळा, लिंबू वगैरे 4-5 दिवस खाण्यात यावे.( bad breath )
मिठाच्या पाण्याने चुळा भरून तोंड स्वच्छ ठेवावे. झोपताना देखील चुळा भरून स्वच्छता ठेवावी
चॉकलेट, गोळ्यांची सवय असलेल्या मुलांचे दात लवकर किडतात, त्यामुळे या सवयीवर नियंत्रण ठेवावे. होमिओपथी निवड नायट्रिक ऍसिड, अपिस, आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर दातांची व हिरड्यांची स्वच्छता दात घासण्यासाठी चांगला ब्रश आणि पेस्ट लागते. ब्रशच्या केसांनी दातांच्या फटीतील घाण व अन्नकण निघू शकतात. ब्रश आडवा धरून खालीवर फिरवणे आवश्यक आहे. ब्रश नसल्यास दात घासण्यासाठी बाभूळ, कडूनिंब, वड, रूई यांचे दातवण चालेल.
यांच्या करंगळीएवढ्या जाड अशा एक वीत लांबीच्या काड्या दातवण म्हणून वापराव्यात. प्रथम काडीचा भाग चावून मऊ करावा. मग दातवणाच्या कुंचल्यासारख्या झालेल्या टोकाने दात स्वच्छ करावेत. रात्री जेवणानंतरही दात ब्रश किंवा दातवणाने साफ करणे आवश्यक आहे. प्रत्येक जेवणानंतर ताबडतोब खळखळून चूळ भरणे आवश्यक आहे. बोटाने हिरड्या चोळाव्यात. शक्यतो अर्ध्या तासाच्या आतच चूळ भरणे आवश्यक आहे. दातावर कीटण चढू न देणे हे महत्त्वाचे आहे. गोड पेस्टपेक्षा तुरट, कडू चवीच्या पेस्टने स्वच्छता चांगली होते. टुथपेस्ट नसल्यास ब्रश व दंतमंजनाचा वापर करता येईल.( bad breath )