मांडीऐवजी मनगटातून अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी रुग्णाला आराम देते. कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही, सकाळी रुग्णालयात येणारा रुग्ण संध्याकाळी घरी जाऊ शकतो रेडिअल रूटमार्गे केलेल्या अँजिओप्लास्टीचे हॉस्पिटलमधील वास्तव्यात एक तृतियांश कपात होण्याबरोबरच अनेक लक्षणीय फायदे आहेत.
हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये अनिर्बंध वाढ होत असल्याने पेरक्युटेनियस ट्रान्सकॅथेटर कोरोनरी प्रक्रियेची गरज वेगाने वाढत आहे. अलीकडेच झालेल्या एका पाहणीच्या निष्कर्षांनुसार कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 87% वाढ झाली आहे, तर कोरोनरी हृदयविकारांच्या प्रादुर्भावामध्ये 72% वाढ झाली आहे.
हार्ट अटॅकनंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना अँजिओग्राफी आणि त्यानंतर गरज भासल्यास अँजिओप्लास्टी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. या प्रक्रियांमध्ये त्वचेला कमीत-कमी छेद दिला जातो व जांघेच्या भागातून किंवा मनगटाच्या मार्गे शरीरात एक मऊ पोकळ नळी आत टाकून ही प्रक्रिया पार पाडली जाते.
युरोप, अमेरिका, जपान या देशांमध्ये मनगटाच्या शिरेवाटे केल्या जाणाऱ्या प्रक्रियेला अधिक पसंती दिली जाते. याचे कारण या पर्यायामध्ये रक्तस्त्राव होण्याचा धोका कमी असतो, छेद दिल्याच्या जागी इतर काही गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता अत्यंत कमी असते आणि रुग्णाच्या सोयीच्या दृष्टीने ती अत्यंत सुलभ असते.
भारतात मनगटामार्गे केल्या जाणाऱ्या अँजिओप्लास्टीचे प्रमाण फक्त 8 ते 10 टक्के आहे, त्यामुळे अनेक हार्ट पेशंट्स नव्या युगाच्या या तंत्रज्ञानाच्या फायद्यापासून वंचित आहेत.
रेडिअल रूटद्वारे ही प्रक्रिया पार पाडल्यास रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत घरी जाता येते. याचा रुग्णाच्या खर्चामध्ये बचत होण्याच्या दृष्टीने थेट फायदा होतो. लठ्ठ व स्त्री रुग्णांसाठी रेडिअल रूट हा प्राधान्यक्रमाने वापरण्याचा पर्याय असायला हवा, कारण या उपगटांतील रुग्णांमध्ये गुंतागुंती वाढण्याचा धोका खूप जास्त असतो.
इतर पद्धतींच्या तुलनेत रूट पेरक्युटेनियस ट्रान्सकॅथेटर प्रक्रियेमध्ये रुग्णांची सुरक्षा जपली जाण्याची संभाव्यता अधिक प्रमाणात सिद्ध झाली आहे तरीही भारतातील बहुतांश ठिकाणी ही पद्धत वापरली जात नाही.
भारतात रेडियल रूट पद्धती इतक्या मर्यादित प्रमाणात वापरली जाण्यास पद्धतीची पुरेशी ओळख नसणे, जुन्या पिढीतील शल्यचिकित्सक आपल्या जुन्या पद्धती बदलण्यास तयार नसणे या प्राथमिक गोष्टी कारणीभूत ठरत असल्याचे ते सांगतात.
रेडिअल रूट वापरून केलेल्या हृदय शस्त्रक्रियांमध्ये यशस्वीतेचे प्रमाण 90% हून अधिक आहे. नव्या उपकरणांमुळे ही प्रक्रिया अधिकच सुलभ आणि अधिक सुरक्षित झाली आहे. ही प्रक्रिया अपंगत्वामुळे परावलंबनामध्ये जाणारी वर्षे कमी होणे, भारतीय आरोग्यव्यवस्थेवरील हृदयरोगांशी संबंधित भार कमी होणे व हॉस्पिटलमधील खाटांच्या उपलब्धतेत वाढ होणे हे सर्वार्थाने शक्य आहे.
– डॉ. मनोहर साखरे