आजकाल मेंदूचे आजार किंवा अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत असल्याचे जाणवत आहे. तुमचा मेंदू दिवसातील 24 तास, आठवडयातील सात दिवस आणि वर्षातील दिवस अविरत कार्य करीत असतो. त्यामुळे तो स्वस्थ राहणे फार गरजेचे आहे. त्याचे हे स्वास्थ्य पाच गोष्टींवर अवलंबून आहे.
शारीरिक व्यायाम
शारीरिक व्यायामामुळे तुमचे आयुर्मान वाढते, तुमचा चांगला मूड राहतो, तुमची झोप व्यवस्थित होते आणि वजनही घटवते, हृदयविकाराचा धोका कमी करते तसेच तुमची हाडे आणि मेंदू निरोगी ठेवते. तुमचा मेंदू हा शरीरातील स्नायूंप्रमाणेच असतो, एकतर त्याचा वापर करा किंवा तो गमवा. धावणे, जॉगिंग, पोहणे किंवा सायकलिंग हे नियमित केल्यावर नव्या मेंदू पेशींची वाढ होण्यास चालना मिळते तसेच अस्तित्वात असलेल्या पेशी सुरक्षित राहतात. दिवसातून किमान मिनिटे व्यायाम केला, तर बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.
पौष्टिक अन्न
पौष्टिक आणि संतुलित आहार मेंदूला चालना देतो. धान्य, हिरव्या भाज्या आणि पालेभाज्या, ऑलिव्ह, मासे आणि ड्रायफ्रूट्स यांचा आहारात समावेश केल्यास, मेंदू निरोगी राहतो आणि अल्झायमरसारख्या आजाराचा धोकाही कमी होतो. ताजे अन्न शिजवा आणि खा, चविष्ट अन्नावर भर द्या, तसेच मित्रपरिवार आणि कुटुंबाबरोबर जेवणाचा आनंद घ्या. मेंदूसाठी योग्य अशा अमेगा-साठी मासे खाणे खूप फायदेशीर आहे. मासे खात नसाल, तर अक्रोड तसेच अळशी, अंबाडी, जवस किंवा सोयाबिन्सचा वापर करता येईल. पालक, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्या यांच्याबरोबरच फळांचा आहारात समावेश करावा. ब्लूबेरी, रास्पबेरी, ब्लॅकबेरी तसेच डार्क चॉकलेट आणि हळद, दालचिनी आणि आले यांसारखे मसाले तसेच औषधी वनस्पती यांच्यात चांगल्या प्रमाणात अँटिऑक्सिडन्ट्स असते. ज्यामुळे मेंदूला चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होतो. अक्रोड हे हृदयाच्या स्वास्थ्यासाठी जेवढे उपयुक्त आहे, तेवढेच मेंदूसाठीही महत्त्वाचे आहे. याच्यामुळे आकलनशक्ती वाढते, तर धान्य स्मृती चांगली ठेवण्यास मदत करतात.
निद्रा आणि आराम
आपण झोपतो तेव्हा देखील मेंदूचे कार्य सुरूच असते. पुरेशा झोपेमुळे तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहता. प्रौढांना रोज रात्री ते तासांची झोप गरजेची आहे. झोपेमुळे तुम्हाला तजेलदारपणा मिळतो. तुमचा मूड चांगला राहतो आणि तुमची रोगप्रतिकार प्रणाली मजबूत बनते. झोपण्यापूर्वी तुम्ही रिलॅक्स व्हा. काही जण पुस्तक वाचतात, काही संगीत ऐकतात, तर काही जण गरम पाण्याने आंघोळ करतात.
सामाजिक बांधिलकी
अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा मानवाच्या आहेत, पण त्याचप्रमाणे मेंदूची अधोगती रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. सामाजिक बांधिलकीला धोका निर्माण झाल्यावर किंवा त्याला धक्का लागल्याने होणारे परिस्थितीतील बदल तसेच सामाजिक अनुभव याच्या आधारे तुमची मानसिक जडणघडण होत असते. ग्लोबल कौन्सिल ऑन ब्रेन हेल्थच्या अहवालानुसार मित्रपरिवार, कुटुंब आणि सामाजिक कार्यामधील सहभाग यामुळे आपला मेंदू निरोगी राहतो. याचसाठी क्लब, क्लास किंवा सामाजिक संस्था/संघटनांशी जोडले जाणे गरजेचे आहे, जेणेकरून नव्या ओळखी होऊ शकतील. आपल्याला आनंदी ठेवणारे नातेसंबंध तसेच कार्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तुमचे नातेसंबंध तुटले असतील, तर त्याच व्यक्तीशी किंवा नव्या व्यक्तीशी ते नव्याने तयार करण्यासाठी प्रयत्न करा. सामाजिक नेटवर्क जर मजबूत असेल, तर सहकार्याचे हात जास्त मिळतात, तणाव कमी होतो, नैराश्यावर मात करता येते आणि बौद्धिक उत्तेजना वाढते. जो समाज जीवनात जेवढा व्यस्त असतो, त्याची बौद्धिक हानी कमी होते, असे पाहणीत आढळले आहे. जे लोक मनापासून सतत क्रियाशील असतात आणि इतरांशी संवाद साधून असतात, त्यांचे आयुष्य आनंदी आणि स्वास्थ्यपूर्ण असते.
मेंदूची क्षमता वाढवा
आपल्या मेंदूची खास क्षमता असते. ज्याद्वारे आपला मेंदू काही बदलांनुसार अनुरूप होऊन त्याचा स्वीकार करतो आणि नुकसान टाळतो. जी लोकं कायम शिकत असतात, नवनवीन कृती करत असतात आणि नवनवीन कौशल्य किंवा छंद जोपासत असतात, ते एकप्रकारे मेंदूची खास क्षमता वृद्धिंगत करीत असतात. नवे छंद जोपासा, नवी भाषा शिका, नवे संगीत, वाद्य शिका किंवा फोटोग्राफीमध्ये आनंद घ्या. याद्वारे मेंदूची क्षमता वाढण्यास मदत होते. कला ही तुमच्या मेंदूला पोषक असून, तुमचे मानसिक स्वास्थ्य राखते. खेळा, शब्दकोडे सोडवा, बुद्धिबळ किंवा स्मृती वाढविणारे खेळ खेळा. अशा कृती मेंदूला उत्तेजना देतात.