Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Early Puberty: “लहान वयात मुलींना पीरियड्स येण्यामागे कोणती कारणं आहेत? जाणून घ्या महत्त्वाची माहिती”

by
August 11, 2025
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Early Puberty: सध्या अनेक पालकांना एक नव्या प्रकारची चिंता भेडसावत आहे. ती म्हणजे त्यांच्या मुलींना लहान वयातच मासिक पाळी सुरू होण्याची. काही मुलींना केवळ 8 ते 9 व्या वर्षीच पीरियड्स सुरू होतात, जे वयमानाने खूप लवकर मानलं जातं. त्यामुळे पालक घाबरतात की एवढ्या लहान वयात असे शारीरिक बदल का होतात आणि यामुळे त्यांच्या मुलीच्या भविष्यात काही अडचणी तर येणार नाहीत ना?

ही स्थिती वैद्यकीय दृष्टिकोनातून ‘अर्ली प्युबर्टी’ (Early Puberty) म्हणून ओळखली जाते. म्हणजेच शरीरात किशोरावस्थेतील बदल अपेक्षेपेक्षा लवकर घडू लागतात. ही एक गंभीर बाब असू शकते, कारण 8 वर्षांचं मूल मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या या बदलांसाठी पूर्णपणे तयार नसतं.

अर्ली प्युबर्टीची काही सामान्य लक्षणं:

~ स्तन विकास सुरू होणे (मुलींमध्ये)
~ जननेंद्रियामध्ये वाढ होणे (मुलांमध्ये)
~ शरीरावर केस येणे
~ चेहऱ्यावर मुरुम (Acne)
~ घामाला तीव्र दुर्गंधी येणे

पालकांनी हे लक्षणं वेळेत ओळखून तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

लहान वयात पीरियड्स सुरू होण्यामागे असू शकणारी 5 कारणं:

1. अयोग्य आहार व जंक फूडचं अतिसेवन शरीरात हार्मोनल बदल घडवून आणतो.
2. जास्त स्क्रीन टाइम म्हणजे मोबाईल, टीव्ही, टॅब यांचा अतिरिक्त वापर.
3. शारीरिक हालचालींचा अभाव. बैठं आयुष्य प्युबर्टी लवकर सुरू होण्यास कारणीभूत ठरू शकतं.
4. आनुवंशिकता .जर घरात कोणी लवकर प्युबर्टी अनुभवली असेल, तर त्या मुलालाही त्याचा प्रभाव होऊ शकतो.
5. पर्यावरणातील हार्मोन्ससारख्या रसायनांचा संपर्क. काही प्लास्टिक किंवा फूड प्रोडक्ट्समध्ये असणारी केमिकल्स हार्मोनल बदल घडवू शकतात.

काय करावं?

जर मुलामध्ये वरील लक्षणं दिसू लागली, तर पालकांनी गोंधळून न जाता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यावर योग्य निदान आणि उपचार उपलब्ध आहेत. आहार, जीवनशैलीत बदल आणि आवश्यकतेनुसार औषधोपचार यामधून अर्ली प्युबर्टी नियंत्रित करता येते.

लहान वयात होणारे हार्मोनल बदल मुलाच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर परिणाम करू शकतात. त्यामुळे या विषयाकडे दुर्लक्ष न करता योग्य माहिती घेणं आणि वेळेवर पावलं उचलणं आवश्यक आहे.

Join our WhatsApp Channel

The post Early Puberty: “लहान वयात मुलींना पीरियड्स येण्यामागे कोणती कारणं आहेत? जाणून घ्या महत्त्वाची माहिती” appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar