Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

जेवल्यानंतर चहा पिताय? मग अगोदर हे वाचा, नाहीतर गंभीर परिणामांना समोरे जावे लागेल

by प्रभात वृत्तसेवा
March 23, 2021
in आहार
A A
जेवल्यानंतर चहा पिताय? मग अगोदर हे वाचा, नाहीतर गंभीर परिणामांना समोरे जावे लागेल
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

चहा म्हटले की अनेकांना स्वर्गातील अमृतच वाटते. इतके काही लोक चहासाठी वेडे झालेले असतात. मग हे लोक केव्हाही, कोणत्याही वेळेला, कुठेही चहा पिणे टाळत नाहीत. यातीलच काहीजणांना जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्याला घातक ठरते.

अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळल्या चहाने होते. एक चहा दिवसभराचा थकवा दूर करतो. तर ताजेतवाने राहण्यासाठी चहा प्यायला जातो. काही जणांना दिवसातून कितीही वेळा आणि कोणत्याही वेळी चहा पिण्याची सवय असते. जेवल्यानंतर चहा पिणं बऱ्याच जणांना आवडतं. पण ही सवय प्रकृतीला घातक ठरू शकते. जेवणानंतर तातडीने चहा पिणं आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.

चहापावडरमध्ये आम्ल पदार्थ असतात. हे पदार्थ अन्नातील प्रोटीनमध्ये मिसळतात. यामुळे प्रोटीन टणक बनतात, परिणामी ते पचायला जड जातं. यामुळे जेवल्यानंतर तातडीने चहा पिणं टाळावं. याशिवाय चहामध्ये कॅफिनही असतं. ज्यामुळे रक्‍तदाब वाढतो. त्याचसोबत कॅफिनचं अतिप्रमाण शरीरात कोर्टिसोल वाढवतं. यामुळे शरीराला अनेक आजारांचा सामना करावा लागतो.

हृदयासंबंधित आजार, मधुमेह आणि वजन वाढणं इत्यादींचा समावेश आहे. चहामध्ये पॉलिफेनॉल्स आणि टेनिन इत्यादी घटक असतात जे जेवणातील लोह शोषत नाहीत. परिणामी शरीराला त्याचा फायदा होत नाही. विशेषत: महिलांमध्ये लोहाची कमतरता असते, त्यांच्यासाठी जेवल्यानंतर चहा पिणं नुकसानकारक ठरतं. जर तुम्ही चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय राहू शकत नसाल, तर जेवणानंतर किमान एक तासाने घ्यावेत.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorBenefits Of Neemblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdestroys virusesdietEasy Dietfitnesshealthkokamkokum benefitslife styletopnews
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar