पुणे – सकाळचा नाश्ता हा आरोग्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. असं म्हणतात की, सकाळचा नाश्ता हा राजासारखा पोटभर असावा. आपल्या कडे काही जण नाश्त्यामध्ये ज्यूस घेणं पसंत करतात तर, काही लोक सूप पिन पसंद करतात. मात्र, हे दोन्ही पदार्थ नाश्त्यासाठी योग्य आहे का? हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे.
१) आपण बाहेर जेवायला गेलो की सर्रास सूप हे मागवतोच. ते स्टार्टर या गटात मोडत असलं तरी ते पूर्ण अन्न आहे. कारण सुपात शरीराला आवश्यक ते पोषक घटक असतात. त्यामुळे सूप पिन कधीपण योग्यच.
२) ज्यूस बनवताना फळे आणि भाज्यांमधील फायबर गाळून वेगळे केले जातात. जेणे करुन ज्यूस पिण्यास खूपच टेस्टी लागेल आणि त्यातील फायबर घशात अडकणार नाहीत.
३) तेच सूप बनवताना ताज्या भाज्या शिजवून त्या मॅश केल्या जातात आणि नंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट केली जाते. यामुळे त्यातील पोषक घटक, फायबर, भाज्यांचे पाणी सारं काही त्यामध्ये जसंच्या तसं राहतं.
४) सकाळी ज्यूसने शरीराला एक तर्री मिळते, फ्रेश वाटतं, थकवा कुठच्या कुठे पळून जातो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य निरोगी व सुदृढ राहतं, ज्यूस पचण्यास हलका देखील असतो.
५) ज्यूस बर्फासोबत सर्व्ह केला जातो तर सूपचा आपण गरमा गरम असताना आस्वाद घेतो. मात्र, सूप गरम असल्यामुळे आपल्या जठराला गरम पदार्थ पचवणं सोपं जात. तर दुसरीकडे थंड पदार्थ पचवण्यासाठी आपल्या जठराला अधिक मेहनत घ्यावी लागते.