पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास अनेकांना नेहमी होत असतो. पाठदुखी-कंबरदुखीमुळे होणाऱ्या वेदना या बऱ्याचदा या वेदना सायटिकाच्या असतात. शरीरातील पाय आणि कंबरेला जोडणाऱ्या ज्या नसा असतात त्यापैकी एखादी नस दुखावली किंवा तिला सूज आली तर संपूर्ण पाय दुखू लागतो. या वेदना सहन होऊ शकत नाहीत. यालाच सायटिका असं म्हटलं जातं.
पोटऱ्यांपासून सुरू झालेल्या वेदना हळूहळू वाढत जाऊन खाली पायाच्या तळव्याच्या अंगठ्यापर्यंत पोहोचतात. वेदना असह्य असल्याने अशा वेळी रुग्णाला झोपून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. सायटिका नाडीचा वरील भाग जवळपास 1 इंच जाड असतो. या रोगाची सुरुवात अचानक आणि तीव्र वेदनेने होते. साधारणपणे 30 ते 40 वर्षे वयाच्या लोकांना ही समस्या अधिक प्रमाणात होते.
थंडीच्या दिवसात या वेदना जास्त वाढतात. सायटिकाच्या वेदना एका वेळी फक्त एका पायातच होतात. रुग्णाला चालताना त्रास होतो. तो जेव्हा झोपतो किंवा बसतो तेव्हा पायाची नस आखडते, खेचल्यासारखी वाटते आणि जास्त त्रास होतो. शरीर जास्त वेळ एकाच स्थितीमध्ये ठेवल्यासही असह्य वेदना होतात. बैठे काम करणाऱ्यांना, जास्त चालत राहणाऱ्यांना, जास्त सायकल चालवल्यामुळे, मोटर सायकल किंवा स्कूटर चालवल्याने सायटिका नर्व्हवर दबाव पडतो आणि हा विकार सुरू होतो. कधी कधी हाडांवर अचानक जोर पडल्यामुळेही अशा प्रकारच्या वेदना होतात.
हेही लक्षात ठेवा
बदलती जीवनशैली किंवा चुकीच्या विहारातून निर्माण झालेला व्याधी म्हणजे सायटिका. सायटिकामध्ये कमरेमध्ये प्रचंड वेदना सुरू होऊन त्या पायापर्यंत पोहोचतात. वास्तवतः सायटिक नावाच्या नाड़ीमध्ये होणाऱ्या वेदनेमुळे या विकाराला सायटिका असे म्हणतात. कमरेचे मणके ङ 5 आणि ड 1, ड 2 ह्यामधून ज्या नसा निघतात, त्या पुढे एकत्र होऊन सर्वात मोठी नाड़ी बनते.
सायटिकाची कारणे
सायटिका होण्याचे सर्वात सामान्य कारण स्लिप डिस्क हे आहे. मणक्यांमधे आधार व मजबुतीसाठी असलेली कुर्च्यांची गादी म्हणजेच खपींशीर् ींशीींशलीरश्र वळील ही आपल्या स्थानापासून सरकल्यास, तिचा दाब डलळरींळल नाडीवर पडतो. त्यामुळे कंबरेपासून पायापर्यंत जिथे, जिथे ती संवेदना पोहोचवते तिथे वेदना होतात.
सायटिकाचा त्रास होण्याची कारणे
कमरेच्या ठिकाणी आघात झाल्याने, वजनदार वस्तू उचलताना कमरेत धक्का बसल्याने, उंचावरून घसरून पडल्यामुळे सायटिकाचा त्रास होऊ शकतो. तसेच वयोमानानुसार किंवा अन्य कारणांनी कमरेच्या ठिकाणी असणाऱ्या मणक्यांची झीज झाल्यामुळे सायटिकाचा त्रास होऊ शकतो. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणाऱ्या किंवा जास्त काळपर्यंत उभे राहणाऱ्या, अतिप्रवास करणाऱ्या व्यक्तीमध्ये हा त्रास होऊ शकतो.
अतिलठ्ठ व्यक्तींच्या वाढलेल्या वजनामुळे पायांवर अतिरिक्त भार पडतो परिणामी सायटिकाचा त्रास होऊ शकतो. ज्या बाजूचा पायाची सायटिका नाडी क्षतिग्रस्त झालेली असते, त्या बाजूच्या पायात व्याधीची लक्षणे तीव्रतेनुसार कमीअधिक प्रमाणात जाणवू शकतात. जसे की, कमरेपासून खाली पायापर्यंत प्रचंड वेदना, सूज आणि आग होते, कोणतीतरी टोकदार वस्तू टोचत असल्यासारखी वेदना होते, पाय आणि कंबर दुखते, पायाला मुंग्या आल्यासारखे वाटते, पाय बधिर होतात-जड वाटतात.
सायटिका हा विकार झाला असेल तर कोमट पाण्याने आंघोळ करा. स्वतःला थंडीपासून शक्यतो दूर ठेवा. सकाळी व्यायाम करा किंवा सैरसपाटा करा. जास्त वेळ एकाच स्थितीत बसू किंवा उभे राहू नका. ऑफिसमध्ये असला, तरी थोड्या थोड्या वेळाने पाय मोकळे करा.
पावसाळा आणि थंडीत या विकाराचा त्रास जास्त होतो. सायटिकावर काही घरगुती उपाय केले तरीही तो आटोक्यात येऊ शकतो. 4-5 लसूण पाकळ्या कापून त्या 200 मिलीलीटर दुधात टाकाव्यात. हे दूध काही मिनिटे उकळवावे. चांगले उकळले की ते दूध गोड करण्यासाठी त्यात थोडे मध घाला. हे मिश्रण थोडेथोडे असे दररोज सेवन करायचे. यामुळे सायटिकाच्या वेदना कमी होऊ शकतात.