Tuesday, May 20, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘या’ कारणांसाठी आहारात टाळू नका ‘तांबडा भोपळा’

by प्रभात वृत्तसेवा
March 11, 2021
in आरोग्य वार्ता, आहार
A A
‘या’ कारणांसाठी आहारात टाळू नका ‘तांबडा भोपळा’
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – भारतात तांबडा भोपळा (Red pumpkin) सर्वत्र होतो. चांगली निचरा होणारी जमीन भोपळ्याला अनुुकूल ठरते. भोपळ्याची उन्हाळी व पावसाळी अशी दोन पिके घेतली जातात. भोपळा (Red pumpkin)  शीतल, रूचिवर्धक, पित्तशामक, बलदायक, पौष्टिक आहे.

भोपळा (Red pumpkin)  सर्वदोषनाशक तसेच नाजूक प्रकृतीच्या व उष्ण प्रकृतीच्या लोकांसाठी आरोग्यदायक आहे. भोपळा पिकून त्याचा वेल सुकू लागेल तेव्हा वेलीवरचे भोपळे तोडावेत.

चांगला पिकलेला जुना भोपळा (Red pumpkin) गुणकारी असतो. तो जास्त काळ टिकतो. कच्चा भोपळा (Red pumpkin)   विषासमान समजला जातो.

त्यामुळे त्याचा भाजीत वापर करू नये. भोपळ्याचा हलवा, पेठा बनवला जातो. भोपळ्याच्या ‘बी’ला मगज म्हणतात. बियांचा हलवा बनवला जातो. तो पौष्टिक असतो.

गवार किंवा चवळीसारख्या वातूळ भाजीत भोपळ्याचा उपयोग केला असता ती जास्त स्वादिष्ट बनते. भोपळ्याचे भरपूर प्रमाणात सेवन केल्याने शौचास साफ होते व झोप चांगली येते.

गृहोपयोगी कानमंत्र :

– भोपळ्याच्या रसात हिंग व जवखार घालून घेतल्याने मूतखड्याच्या विकारात फायदा होतो.

– भोपळ्याच्या बियांचा गर दुधात वाटून गाळून त्यात थोडा मध घालून प्यायल्यास पोटातील चपटे कृमी नाहीसे होतात.

– भोपळ्याच्या रसात साखर घालून प्यायल्याने आम्लपित्ताचा त्रास दूर होतो.

– भोपळ्याची भाजी साजूक तुपात बनवून खाल्ल्याने किंवा त्याचा रस काढून साखर घालून सकाळ

-संध्याकाळ अर्धा कप प्यायल्याने शरीराचा दाह कमी होतो व शरीरातील रक्‍त कमी झाले असल्यास फायदा होतो.

– भोपळ्याच्या बिया (मगज) किराणा दुकानात मिळतात. त्याची पावडर पंजाबी भाज्यांमध्ये (पनीर बटरमसाला) वापरावी. भाजी छान होते.

Tags: aarogya jagar 2019aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietdigitalprabhatfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar