चेहऱ्यावर दिसणारे मुरुम केवळ वाईटच दिसत नाहीत, तर ते बऱ्याच त्रासांना कारणीभूतही ठरतात. मोठ्या मुरुमांप्रमाणे चेहऱ्यावर येणारी छोटी मुरुमं किंवा फुटकळी खूप वेदनादायक असतात. ज्यामुळे आपल्याला त्रास तर होतोच, पण कुरूप डागही पडतात. अशा परिस्थितीत या मुरुमांना कमी करण्यासाठी आणि त्यांना बाहेर येण्यापासून रोखण्याची गरज असते. काही जण यांना तारुण्यपिटीकाही म्हणतात. चला तर, मुरुम कमी करण्यास मदत करणाऱ्या गोष्टी जाणून घेऊया.
ग्रीन टी
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. त्याच्या मदतीने, चयापचय प्रणालीदेखील बरे होते. 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी तर हा चहा हा चहा खूप महत्त्वाचा ठरतो. तुम्ही एकच करायचं- ग्रीन टी वापरल्यानंतर पिशव्या फेकून न देता त्याने चेहरा धुवा. कारण या चहाच्या पिशव्यांतील द्रव्याच्या मदतीने मुरुमांपासून मुक्तता मिळू शकते.
मध
दररोज त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे मध, जी मुरुमं कमी करण्यास मदत करते. मध अँटीबक्टीरियल आणि दाहकविरोधी आहे, जे मुरुमांना बाहेर येण्यास प्रतिबंध करते. काही थेंब मध घ्या आणि आंघोळ करण्यापूर्वी ते मुरुमांवर लावा. नंतर काही वेळाने स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ करा. मध चेहऱ्याला मॉइश्चराइझ करतोच्, तसेच ग्लोइंग स्किनही तयार करतो.
बर्फ
जर चेहऱ्यावर खूप मुरुमं दिसू लागली तर वेदना कमी करण्यासाठी, बर्फाचा एक तुकडा घ्या आणि त्यास स्वच्छ रुमालाने गुंडाळा. या गुंडाळलेल्या बर्फासह रुमाल आता मुरुमांभोवती फिरवा. असे केल्याने मुरुम कमी होण्याबरोबरच वेदना देखील कमी होते. त्याच वेळी, मुरुमांच्या आत जमा होणारी घाण देखील बाहेर येईल.
कोरफड जेल
कोरफड ही त्वचेच्या काळजीसाठी वापरली जाणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कोरफड केवळ त्वचा मऊ करते, असे नाही तर मुरुमांवर देखील कार्य करते. मुरुमांवर ताजे कोरफड जेल लावल्यास ते रात्रीतून अदृष्य होईल.
टी-ट्री ऑइल
टी-ट्री ऑईलमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो. या तेलाचे दोन थेंब थोड्याशा नारळाच्या तेलात घाला आणि चांगले मिसळा. नंतर ते मुरुमांवर लावा आणि थोड्या वेळानंतर कोमट पाण्याने धुवा. मुरमे हळूहळू नाहिशी होताना दिसतील.