हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खाजरी होण्याची अनेक कारणे असतात. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे हवा शुष्क होते. त्यामुळे तुमची त्वचासुद्धा कोरडी होते. त्वचेला भेगा पडू नयेत, रक्त येऊ नये. इतर गुंतागुंत होऊ नये, यासाठी मधुमेहींनी हिवाळ्यात त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. ( dry skin in winter home remedies )
मधुमेहाचा शरीरातील प्रत्येक भागावर परिणाम होऊ शकतो. त्यात त्वचेचाही समावेश आहे. मधुमेह असलेल्या एक तृतियांश व्यक्तींना त्वचाविकार असतात किंवा होऊ शकतात. जेव्हा शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढते, तेव्हा शरीरातील द्रवाचा ऱ्हास होतो. त्यामुळे त्वचा कोरडी होते. कारण तुमच्या शरीरातील अतिरिक्त साखर घालवण्यासाठी शरीर त्या पाण्याचे लघवीत रूपांतर करत असते. त्याचप्रमाणे जर तुमच्या हाता-पायांमधील नसांना घाम बाहेर काढण्याचा संदेश मिळाला नाही, तर तुमची त्वचा कोरडी होऊ शकते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खाजरी होण्याची अनेक कारणे असतात. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे हवा शुष्क होते. त्यामुळे तुमची त्वचासुद्धा कोरडी होते. त्वचेला भेगा पडू नयेत, रक्त येऊ नये. इतर गुंतागुंत होऊ नये, यासाठी मधुमेहींनी हिवाळ्यात त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा कोरडी झाल्यास ती लालसर होते, त्यामुळे त्वचेवर फोड येतात. त्वचेला भेगा पडू शकतात आणि सालपटं निघू शकतात. या भेगांमधून जंतू तुमच्या शरीरात शिरू शकतात. त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. कोरडी त्वचा ही बहुधा खाजरी असते.
त्या ठिकाणी खाजवल्यामुळे त्वचेमध्ये फट पडून संसर्ग होतो. त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली तर बहुतेक त्वचाविकारांना प्रतिबंध घातला जाऊ शकतो वा त्यावर सहज उपचार करता येऊ शकतात. मधुमेहामुळे तुमची त्वचा कोरडी होते. त्यामुळे तुम्हाला सहज इजा होऊ शकते. त्याने संसर्ग होण्याची शक्यताही अधिक असते. तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि ती निरोगी राहावी यासाठीच्या काही टिप्स:
तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवा. ज्यांच्या शरीरात ग्लुकोजची पातळी प्रमाणापेक्षा अधिक आहे, त्यांची त्वचा कोरडी असते.
अति गरम पाण्याने आंघोळ करू नका. तुमची त्वचा कोरडी असेल तर बबल बाथ टाळा. मॉइच्श्ररायझिंग साबणाची मदत होऊ शकेल. त्यानंतर चांगले स्कीन लोशन लावा. पण पायाच्या बोटांमध्ये लोशन नका लावू. कारण त्यात बुरशी वाढू शकेल.( dry skin in winter home remedies )
त्वचा कोरडी असेल तर संरक्षण करा. कोरडया किंवा खाजऱ्या त्वचेवर खाजवले असता त्वचेला भेग पडते आणि संसर्ग आतपर्यंत जातो. त्वचेचे पापुद्रे निघू नयेत म्हणून तुमची त्वचा ओलसर ठेवा.
त्वचा कापली असेल तर ताबडतोब उपचार करा. थोडंसं कापलं असेल साबण आणि पाण्याने जखम धुवा. डॉक्टरच्या सल्ल्याने प्रतिजैविक ओषधे आणि मलम लावा. निर्जंतुक कापसाने छोटया जखमा झाकून ठेवा. त्वचेला मोठा छेद गेला असेल, भाजले असेल किंवा संसर्ग झाला तर लगेचच डॉक्टरची भेट घ्या.
थंडी आणि वारा यापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुमचे कान, चेहरा, नाक झाकून घ्या आणि टोपी घाला. त्याचप्रमाणे गरम हातमोजे आणि बूट घाला.
तुमचे पाय दररोज तपासून घ्या. कारण तेथील नसेला इजा झाली तर बधीरपणा येऊ शकतो. त्यामुळे त्यावरील जखमा, पोपडे किंवा छेद यांच्याकडे सहज दुर्लक्ष होऊ शकते. लिंबू सरबत, ताक यासारखी पेये भरपूर प्या. तृणधान्ये, फॅट्सचे प्रमाण कमी असलेले पदार्थ, फळे आणि भाज्या असा सकस आहार घेण्यावर भर द्या.( dry skin in winter home remedies )