Sunday, April 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तुमची मुलं दिवसभर मोबाईलवर असतात? मग वेळीच सावध व्हा, अन्यथा…!

by प्रभात वृत्तसेवा
November 19, 2020
in आरोग्य वार्ता
A A
हातांचा कोरडेपणा घालवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करा!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सध्याच्या करोना संकटकाळात ऑनलाईन क्लासेस सुरू असल्यामुळे मुलांना मोबाइल हाताळण्याचा जणू बहाणाच मिळाला आहे. पण अशामुळे मुलांना मोबाईलची सवय लागली आहे. तसे बरेच मुलांची सवय असते की मोबाइल बघितल्याशिवाय जेवतसुद्धा नाहीत. आपल्या पाल्याला देखील अशी काही सवय असल्यास, किंवा मुलं दिवसभर मोबाइलला चिटकलेले असतात का? जर होय, तर सावधगिरी बाळगा आणि हे नक्की वाचा !

एका संशोधनात असे आढळून आले आहे की मोबाईलचा अतिरिक्त वापर केवळ मुलांच्या दृष्टीसाठीच  नव्हे तर मानसिक आरोग्यासाठी देखील घातक आहे. तसेच मुलांनी शिकण्याची, समजून घेण्याची, लक्षात ठेवण्याची क्षमता तसे नातं जुळवून घेण्याची क्षमता देखील कमकुवत होते. पालकांना मुलांना दिवसभरातून फक्त 2 तास मोबाइल वापरायला देण्याचे सांगितले आहे.

या संशोधनानुसार दिवसभरातून तीन तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल हाताळणारी मुलं उशिरा बोलणं शिकतात. त्यांना वाचायला, लिहायला आणि भाषा समजायला देखील अडचण येते. तसेच वयात आलेली मुलं तब्बल 5 ते 7 तास मोबाइलच्या पुढे असतात त्यांमध्ये दुःख, अस्वस्थता, जीवनापासून नैराश्य आणि आक्रमकतेच्या तक्रारी प्रकर्षाने जाणवतात आणि यामध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यता असू शकते.  मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मुलांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात.

लठ्ठपणा – संशोधनात आढळून आले हे की मोबाइलचा अत्यधिक वापर मुलांमधील लठ्ठपणा वाढवतो. त्याचे कारण असे की मोबाइल बघून जेवणारे मुले अधिक कॅलरी घेतात. तर जे मुलं मोबाइलचा वापर 50 टक्के कमी करतात ते 25 टक्के कमी कॅलरी खातात.

झोपेची तक्रार – संशोधनात आढळून आले आहे की मोबाइलच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश मेलाटॉनिन नावाच्या स्लिप हार्मोनच्या उत्पादनास अडथळा आणतो. यामुळे मुलांना झोप येण्याचा त्रास तर होतोच, तसे सकाळी उठल्यावर त्यांना ताजे-तवानेदेखील जाणवत नाही. अर्धवट झोप झाल्यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर तसेच त्यांचा तार्किक क्षमतेवर देखील वाईट परिणाम होतो. तज्ञ सांगतात की मुलांनी झोपण्याचा किमान 2 तासापूर्वी पासूनच मोबाइल हाताळू नये.

डोक्यापासून कंबरेपर्यंत वेदना होणं – संशोधनात आढळले आहे की तासनतास मोबाइल वापरणाऱ्या मुलांमध्ये डोकं, पाठ, कंबर आणि खांदे दुखीचा त्रास उद्भवतो. ह्याचे कारण म्हणजे मान वाकवल्याने त्याचा भार वाढतो आणि त्यामुळे पाठीचा कणा किंवा मणक्यावर अतिरिक्त दाब पडतो.

एका माहितीनुसार 8 ते 12 वर्षापर्यंतची मुले दररोज चार ते सहा तास मोबाइल हाताळतात. वयात आलेले मुले मुली नऊ तास मोबाइल, टीव्ही किंवा कॉम्प्युटर हाताळतात. ही निश्चितच काळजी वाढवणारी बाब आहे.सध्या ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नसल्यामुळे विविध वयोगटातील मुलांनी किती वेळ मोबाईल हाताळावा, याची काळजी आपण नक्की घेऊ शकतो.

– 1 ते दीड वर्षाच्या मुलांना – 2 ते 3 मिनिटे मोबाईल हाताळू द्यावा. तेही फक्त व्हिडिओ कॉलपुरते. पालकांनी आपल्या मुलांना बाहेर खेळायला आणि वाचन – लिखाणासाठी प्रोत्साहित करावे.

– 18 ते 24 महिने – पालकांच्या निरीक्षणाखाली दिवसभरातून एक ते दीड तासच मोबाइल हाताळण्याची परवानगी असावी. मुलांना शैक्षणिक साहित्यापुरती मर्यादित असायला हवं.

–  2 ते 5 वर्षे – नृत्य-गाण्याशी संबंधित व्हिडिओ बघण्याची आणि खेळ खेळण्याची परवानगी देऊ शकता. पण आठवड्यातील पहिले पाच दिवस फक्त एक तास आणि आठवड्यांचा शेवटी तीन तासांपेक्षा जास्त काळ मोबाईल वापरायला देऊ नये.

– 5 वर्षांपेक्षा जास्त – मोठ्या मुलांसाठी तर वेळ निश्चित करणं अवघडच असत. पण मुलांनी मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटरचा जास्त वापर केल्यामुळे त्यांचा शारीरिक हालचाली आणि शिकण्याची कला समजून घेण्यावर परिणाम होऊ लागत असल्यास तर ते फार घातक आहे. त्यांच्या मोबाईल वापरावर पालकांनीच अंकुश ठेवणे गरजेचे आहे.

Tags: aarogya jagarindraja bhakarelife styletonews
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar