उन्हाळ्यातील घामामुळे अंगाला दुर्गंधी येते म्हणून खासकरून मॅन अँड वूमन दोघंही सर्रास परफ्युम वापरतात. महागातील महाग ब्रान्डेड परफ्युमपासून ते स्वस्तात मिळणारे परफ्युम बाजारात मिळतात. हे खरे आहे की, परफ्युममुळे फ्रेश वाटते. शिवाय थकवाही नाहीसा होतो. मात्र परफ्युममध्ये कॅन्सरसाठी कारणीभूत असणारे घातक घटक आढळून आले आहेत.
नुकत्याच एका संशोधनानुसार परफ्युममध्ये शरीरास हानिकारक अशी काही रसायने सापडली आहेत. परफ्युम तयार करताना वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचा वापर करण्यात येतो. अनेक सिंथेटिक घटक मिसळले जातात. सुगंध जास्त काळ टीकून राहावा यासाठीसुद्धा अनेक क्रिया प्रक्रिया करण्यात येतात.
परफ्युममध्ये वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे ऍलर्जी होणे, हार्मोनल असंतुलन, त्वचेवर पुरळ येणे,जळजळ होणे, कर्करोग, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांनी असेही मत व्यक्त केले आहे की, परफ्युम वापरणारे तसेच त्यांच्या आजूबाजूला नेहमी वावरणाऱ्या व्यक्तीलाही या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. लग्नसोहाळे, पार्टी, सण-समारंभामध्ये तसेच दररोज परफ्युमचा वापर केला जातो. पण हे रासायनिक घटक जीवघेणे ठरू शकतात.