आजकाल ऍनिमिया, रक्ताचे प्रमाण कमी, कॅल्शियम कमी असे बरेच प्रश्न आरोग्यविषयक सतवत असतात. शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाले की इतर समस्याही उद्भवू शकतात. रक्तवृद्धीसाठी काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे.
प्रात:काळी तीन केळी खाऊन दुधामध्ये साखर, इलायची मिसळून नित्य पित राहण्याने रक्ताची कमतरता दूर होते, हा एक पौष्टिक नाश्ता आहे. 10 औस द्राक्षांचा रस पित राहाण्याने रक्ताल्पतेत लाभ होतो.
ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल अशा लोकांनी लिंबू आणि टोमॅटोचा आहारात समावेश करावा. अर्धा कप आवळ्याच्या रसामध्ये 2 चमचे मध आणि थोडेसे पाणी मिसळून पिण्याने लाभ होतो. बेलाचा सुका गर वाटून घ्यावा. गरम दुधामध्ये याचे 2 चमचे आणि स्वादानुसार वाटलेली खडीसाखर मिसळून प्यावे. हे एक चांगले रक्तवर्धक टॉनिक आहे.
आपल्या आहारामध्ये बिटाचा वापर करावा. बिटाची कोशिंबीर, बिटाच्या स्लाईस किंवा टोमॅटोबिटाचे सूप घ्यावे. गाजराच्या रसामध्ये पालकचा रस मिसळून ते सकाळी घ्यावे. कांद्याचा रस अथवा रोजच्या आहारात गाजर, बीट, टोमॅटो, काकडी या सलाडमध्ये कांद्याचाही समावेश करावा. अथवा नुसता कांदा जेवणाबरोबर खाल्यास रक्तवृद्धी होते. कारण कांद्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते.
दह्याची लस्सी रोज पिण्याने दुर्बलता कमी होते. साधारणपणे उन्हाळ्यामध्ये रोज आहारात दह्याचा वापर करावा. रोजच्या जेवणात दही आणि ताकाचा वापर केल्यास आरोग्य उत्तम राहाते. रक्ताच्या कमतरतेत दिवसातून 3 वेळा मध प्यावे. पालकाच्या रसात 2 चमचे मध मिसळून 50 दिवसापर्यंत घेतल्यास शरीरातील रक्तवाढ होते.