आपल्या शरीरातील अनेक ग्रंथींमधली एक महत्त्वाची ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी. ही ग्रंथी शरीरातील हार्मोन्सची पातळी नियंत्रित राखण्याचं काम करते. मात्र, या ग्रंथीच्या कमतरतेमुळे किंवा अतिरिक्त प्रमाणामुळे शरीराचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते.
कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती पाहतो ज्या एकदम बारीक होत जातात किंवा काही केल्या त्यांचं वजन कमी होत नसतं. किंवा काही व्यक्तींच्या गळ्याशी मोठी गाठ आलेली दिसते. ( thyroid information in marathi )
थायरॉईड म्हणजे काय?
थायरॉईड ही एक लहान ग्रंथी मानेच्या खालच्या बाजूला असते. तिचे काम शरीराची चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवणे असते. ही चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवण्यासाठी थायरॉईड संप्रेरकांचे उत्सर्जन करत असते. जे शरीरातील पेशींना उर्जेचा वापर कसा करायचा ते सांगते. संप्रेरकांचे उत्सर्जन झाल्यानंतर त्याचा वापर शरीर करते. ही प्रक्रिया सतत सुरु राहते. जर ही प्रक्रिया बिघडली तर थायरॉईडचा त्रास बळावतो.
थायरॉईडचे प्रकार –
हायपर थायरॉईडीझम : तुमच्या ग्रंथी क्षमतेपेक्षा अधिक काम करतात. त्याला हायपर थायरॉईडीझम म्हणतात. लोकांमध्ये हायपर थायरॉईडीझमचे प्रमाण अधिक असते. रक्ताची चाचणी केल्यानंतर तुम्हाला याबद्दल कळू शकते.
ऑटोइम्यून हायपर थायरॉईडीझम : जर हे प्रमाण अधिक वाढले तर हा प्रकार ऑटोइम्यून हायपर थायरॉईडीझम मोडतो. हा प्रकारही पटकन ओळखता येत नाही. यासाठीही तुम्हाला रक्ताची चाचणी करण्याची गरज आहे.
थायरॉईडची कारणे – ( thyroid information in marathi )
१) आयोडिनची कमतरता : तुमच्या आहारात आयोडिनचे योग्य प्रमाण असणे आवश्यक असते. जर तुमच्या आहारातील आयोडिनचे प्रमाण कमी झाले असेल तर तुम्हाला हा त्रास होण्याची शक्यता असते.
२) औषधांचे दुष्परिणाम : काही औषधे तुमच्यातील हार्मोन्सचे प्रमाण वाढवत असतात. जर तुम्ही कोणत्या आजाराने ग्रस्त असाल आणि तुमची औषधं सुरु असतील तर त्यांचा परिणामदेखील तुमच्याव होऊ शकतो.
३) ताणतणाव : हल्ली आपले लाईफस्टाईल इतके बदलले आहे. धावपळीच्या युगात कधीही आणि कसेही खाल्ले जाते. तुमची कधीही आणि काहीही खाण्याची हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. तुमच्या थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड होऊन तुम्हाला थायरॉईडचा त्रास होऊ शकतो.
थायरॉईड लक्षणे –
१) वजन वाढणे : जर तुमचे वजन अचानक वाढत असेल तर तुम्हाला थायरॉईड असण्याची शक्यता आहे. थायरॉईडमध्ये तुमचे वजन वाढण्याचे कारण असे की, त्यावेळी तुमची पचनशक्ती मंदावते. तुम्ही जे खाता त्याचे फॅटमध्ये रुपांतर होते.
२) केसगळती : आता तुम्ही खात असलेल्या पदार्थांपासून तुम्हाला काहीच प्रोटीन किंवा एनर्जी मिळत नसेल तर त्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होण्याची शक्यता कमीच असते. तुमच्या केसांना आवश्यक असलेले घटक तुमच्या शरीराला न मिळाल्यामुळे तुमचे केस गळू लागतात.
३) नख पातळ होणे : थायरॉईड झाल्याचे हे पहिले लक्षण आहे. तुमच्या नखांमध्ये तुम्हाला बदल दिसू लागतात. तुमची नखं पातळ पडू लागतात. नखांना चिरा जायला सुरुवात होते. नख अगदी सहज तुटू लागतात. जर तुम्हाला तुमची नखं पातळ वाटत असतील तर तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
४) सारखे आजारी पडणे : तुम्हाला वरचेवर आजारपण येत असेल तर ते देखील थायरॉईडचे लक्षण असु शकते. तुमची प्रतिकारशक्ती थायरॉईडमुळे कमी होते. त्यामुळेच तुम्ही आजारी पडता. ( thyroid information in marathi )