कांदा हा पांढरा व लाल स्वरूपात येतो. दोन्ही औषधी आहेत. तिखट, तिक्ष्ण, थंड, वातशमन करणारा, भूक वाढविणारा असा हा कांदा पौष्टिकही असतो. कांदा खाल्ल्य्ाने शरीर सर्व रोगांपासून दूर राहते. कांदा रूची निर्माण करतो. म्हणूनच कांद्याचा रोजच्या जेवणात समावेश हवा. कांद्याचे औषधी गुण अनेक आहेत.
कांद्याचे उष्णतेच्या विकारांवर वरील उपाय तर सर्वांना माहितच आहे. घोळणा फुटला असता तात्काळ नाकातील रक्त थांबावे म्हणून कांदा हुंगायला द्यावा. फिट आली असता अथवा बेशुद्ध अवस्थेत ही कांदा हुंगवला असता शुद्धीवर आणता येते. लहान मुलांना सर्दी झाली असता कांद्याचा रस पाजावा. कांद्यामुळे कफनाश होतो. जर का छातीत कफ अडकला असेल तर कांद्याची पेस्ट करून तुपात भाजून ती मलमा सारखी छातीवर लावावी.
लगेचच अडकलेला कफ मोकळा होतो. कांदा हा उत्तम जंतुनाशक आहे. शरीराबरोबर परिसरही कांद्याच्या वासाने स्वच्छ होतो. कीटकनाशकाचे काम कांदा करतो. कांदा हा आरोग्यवधेक आहे. तो रोज कोणत्या ना कोणत्या रूपात खायला हवा. उष्णतेच्या विकारात हाता-पायांची जळजळ होत असेल तर दही घालून केलेली कांद्याची कोशिंबीर उष्णतेचा दाह कमी करते. कांदा आपल्या स्नायूंचे तांत्रिक कार्य सुरळीतपणे पार पाडण्यास मदत करतो. रक्त दोष दूर होतो म्हणूनच उच्च रक्तदाब, हृदयविकार होऊ नये म्हणून रोज कांदा खाल्लाच पाहिजे. निद्रानाश झाला असेल तर झोपण्यापूर्वी थोडा कच्चा कांदा खावा. वंधत्वामध्ये कांद्याच्या फोडी मुरवत ठेवून तयार केलेले औषध खूप फायदेशीर आहे. फक्त ही मुरवण्याची क्रिया प्रदीर्घ हवी. कांदा हा तंतुमय असतो. त्यामुळे फायबर, लोह, प्रथिने, क्षार त्यात असते. म्हणूनच कांद्याला आयुर्वेदाने एक गुणकारी औषधाचा दर्जा दिला आहे. ( onion benefits in marathi )
कारिवणा
कारिवणा हे झाड वेली सारखे वाढते. बाराही महिने येते. कारिवणाचें वेल बागांमध्ये ही आढळतात. तसेच आपण आपल्या घरी कुंड्यामध्ये ही लावू शकतो. याच्या पानांचा लेप बाहेरून जखमेवर किंवा सूजेवर लावला असता सूज उतरते. तसेच जखम भरून येते. याची पानांची धूरी सर्दी, पडसे घालवते. त्याचबरोबर घरात याचा धूर केला असता डास पळून जातात.