चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही? विशेषत: मुलांना तर चॉकलेट जीव की प्राण असते. आपण मुलांसाठी एकवेळ खेळणी नाही घेतली तरी चालेल, पण त्यांच्यासाठी चॉकलेट घेतल्यास ते खूप आनंदी होतात. परंतु चॉकलेटचे जास्त प्रमाण मुलांसाठी हानिकारक आहे. वास्तविक, चॉकलेटमुळे मुलांचे दात किडतात.
चॉकलेटमधील कॅफिनमुळे मुलांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. भरपूर चॉकलेट खाल्ल्याने रक्तदाब आणि हृदय गतीदेखील वाढू शकते. गंमत म्हणजे चॉकलेटचे जसे तोटे आहेत, तसेच फायदेदेखील आहेत.
चॉकलेटमध्ये इतरही अनेक घटक असतात जे मुलांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. चॉकलेटमध्ये आढळणारे थियोब्रोमाइन आणि फेनिलेथिलेमाइनदेखील मुलांच्या मज्जासंस्थेस हानी पोहोचवू शकतात, तर, इंडामाइड ऍसिडचा मेंदूच्या कार्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळेच मुलांना चॉकलेट खाण्याची परवानगी द्या, परंतु मर्यादित प्रमाणात.
डॉक्टरांनी अशी शिफारस केली आहे की तान्ह्या मुलांना किमान 1 वर्षाचे होईपर्यंत चॉकलेट दिले जाऊ नये. डार्क चॉकलेट फक्त एक वर्षानंतरच खावे. चॉकलेट खाण्यापूर्वी, हेही पाहिले पाहिजे की मुलाला चॉकलेटपासून ऍलर्जी नाही.
चॉकलेटचे फायदे :
- मुलांच्या चॉकलेट खाण्याने केवळ तोटेच होत नाहीत तर त्याचे बरेच फायदेदेखील आहेत, जे मुलांच्या विकासासाठी उपयुक्त आहेत. चॉकलेटमध्ये आढळणारी एंडोर्फिन लोकांच्या मनाची भावना जागृत करतात आणि त्यांच्यात आनंदाची भावना निर्माण करतात.
- चॉकलेटमध्ये फ्लॅव्होनॉल्स असतात, जे मुलाच्या मेंदूच्या विकासास मदत करतात आणि वेगवान करतात.
- चॉकलेटमध्ये आढळणारे फ्लेव्होनोल्स रक्त गोठण्यास प्रतिबंधित करतात. हे रक्ताभिसरण सुधारते. आपले हृदयदेखील योग्यरित्या कार्य करते.
- चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडेंट घटकदेखील असतात, जे पेशी दुरुस्त करण्यात मदत करतात. चॉकलेट वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यात मदत करते.