जायपत्री हे नेहमीचे उपयोगातले आयुर्वेदिय औषध आहे.जायफळ आणि जायपत्री एकाच झाडाची फळे आणि पाने आहेत. रोजचा जेवणातला पदार्थ जायपत्री आहे म्हणून तो इतका चांगला चवदार होतो.जायपत्रीचे काही औषधी उपयोग असे
जुलाबावर –
जेव्हा भूक मंद होते, भूक लागत नाही, खाणे पचत नाही व खाणे न पचल्यामुळे वरचेवर जुलाब होतात, कधी कधी पोटात दुखून पातळ जुलाब होतात. विशेषतः लहान मुलास यकृत आणि प्लीहा दोन्हीचा त्रास होतो तेव्हा एकट्या जायपत्री चूर्णाने बरे वाटते.किंचित् मधातून हे घ्यावे.
दम्यावर –
जर दम लागत असेल तर जायपत्रीसारखे मोठे औषध नाही. जायपत्रीचे चूर्ण 1 ग्रॅम मधात चार वेळा द्यावे.
पोटातील रोगावर –
जायपत्री चूर्णाने पोटातील रोग बरे होतात. ते रोज 1ग्रॅम मधातून दोन वेळा घ्यावे.पोट दुखून वारंवार परसाकडला होणे, चार दिवस जायपत्री घेताच थांबते. पोट फुगणे जायपत्री चूर्णाने बरे होते.
लहान मुलांच्या तापावर –
लहान मुलांना येत असलेला ताप, अन्न पचत नसेल तर त्यापासून होणारा दमा आणि मुलांचे झिजून जाणे हे विकार जायपत्री चूर्णाने ताबडतोब बरे होतात. लहान मुलांचे यकृत व प्लीहा याने साफ बरी होतात.
कॉलरावर –
जायपत्री हे कॉलऱ्यात तहान थांबविण्यासाठी वैद्यांचे फार मोठे औषध आहे. 2।। ग्रॅम जायपत्रीचा काढा पाव लिटर पाण्यात एक अष्टमांश उरवावा व तो कॉलऱ्यात पेशंटला द्यावा. कॉलऱ्यातील तहान ताबडतोब मोडते. कॉलऱ्यात अंगावर पेटके येतात, तेव्हा जायपत्रीचे तेल अंगाला चोळतात. याने कॉलऱ्याचे पेटके बरे होतातइतके मोठे हे गुणकारी औषध आहे.
डोकेदुखीवर –
मोठ्या माणसाचे व लहान मुलांचे डोके दुखत असेल तर जायपत्री पाण्यात उगाळून त्याचा लेप डोक्यास लावला असता डोकेदूखी ताबडतोब थांबते.
लहान मुलांना शक्तीवर्धक –
जायपत्रीचे तेल काढतात आणि ते तेल बत्ताशावर घालून लहान मुलास देतात, लहान मुल सुकत चालले व त्याची शक्ती कमी होत चालली म्हणजे एका बत्ताशावर जायपत्रीचे तेल थेंब थेंब घालून लहान मुलास खाण्यास देतात.
लहान मुलांच्या तापावर –
लहान मुलांना अपचनापासून येणारा ताप जायपत्रीचे तेल बत्ताशावर दोन थेंब पोटात घेतले असता ताबडतोब ताप उतरतो.
केस गळण्यावर –
जायपत्रीचे तेल खोबरेल तेलात मिसळून केसास लावतात. याने केस गळून पडत नाहीत आणि केस वाढतात.
संधीवातावर –
संधिवातावर म्हणजे सांधे दुखत असतील तर जायपत्रीचे तेल दुखणाऱ्या सांध्यांवर चोळतात. याने दुःख ताबडतोब बरे होते.
अंगावर पूरळ उठले असता –
अंगावर पूरळ आले असता जायपत्रीचे तेल लावावे. पूरळ नाहीसे होते.
सूजेवर –
परसाकडची जागा सुजून रक्त पडू लागले म्हणजे जायपत्रीचे तेल वरून चोळतात. याने ताबडतोब परसाकडच्या वाटेची सूज व रक्त येणे कमी होते. थंडी ताप खोकला कफावर जायपत्रीचे गुण जायफळासारखेच आहेत; मात्र ही फार उष्ण आहे. म्हणून थोडी थंडी वाजून येणाऱ्या बारीक तापावर तसेच कफ, खोकला झाला तर पाव ग्रॅम जायपत्री विड्याच्या पानाबरोबर देतात.
शक्तीदायी –
जायपत्रीचा हलवा किंवा माजूम करतात. हा हलवा करण्यास सोपा आहे. याला माजूम असेही म्हणतात. जायपत्रीचे चूर्ण 2 ग्रॅम, कंकोळ चूर्ण 1 ग्रॅम, दालचिनी 12 ग्रॅम ही सर्व औषधे बारीक कुटून वस्त्रगाळ पूड करून, त्याच्यात दूध घालून त्याचा खवा करावा.मग रूची येईल एवढी साखर घेऊन त्याचा तीन तारी पाक तयार करावा व त्या पाकात तयार झालेला जायपत्रीचा खवा टाकावा, म्हणजे जायपत्रीचा हलवा किंवा माजूम तयार होईल.हे खाण्यास गोड, तोंडास सुगंधी व गुणास अतिशय गुणकारी असा हा शक्तीवर्धक आरोग्यवर्धक पाक आहे. अशाप्रकारे जायपत्रीचे अनेक औषधी गुण आहेत. प्रत्येकाने म्हणून घरी जायपत्री चूर्ण ठेवावेच.