ठाणे जिल्ह्यात ही वेळुच्या जातीची वनस्पती सर्वत्र आढळते. हिच्या लांब लांब म्हणजे पाच सहा फूट जाड काड्या घेऊन त्यांचा कुड करून भिंती लिंपतात. कूडापासून छान आडोसा करता येतो. म्हणजे अलीकडील पद्धतीप्रमाणे छान पार्टीशन करता येत, जे वर्षानुवर्षे टिकते. कारवीचे झाड हे वेळूच्या जातीचे असते. ते आयुर्वेदियदृष्ट्या चांगले गुणावह आहे.
अरूचीवर – करवी तोंडाला रूची देते. तोंडाला चव नसेल तर म्हणजेच अरुचीवर वेळू प्रमाणेच याचे कोंब शिजवून त्याची भाजी करून खातात. याने चांगली तोंडाला चांगली रूची येते.
आग होत असल्यास – हे थंड आयुर्वेदिय औषध आहे.कारवीचे कोंब पोटात घेतल्याने दाह म्हणजे अंगाची होत असलेली आग, शांत होते.
लघवीला जळजळ होत असल्यास – तसेच लघवी होते वेळी होणारी आग कारवीच्या कोंबाची भाजी शिजवून खाताच थांबते.
लघवी थांबत-थांबत होत असल्यास – लघवी थोडी थोडी होण्याची याचे कोंब शिजवून खाताच थांबू शकते.
पित्तामुळे शरीराला सूज आली असल्यास – काही वेळा पित्ताचा तीव्र ऍटॅक येतो. सूज,उलटीतून रक्त पडणे, यासारखे विकार कारवीचे कोंब शिजवून खाल्ले असता ताबडतोब थांबतात. याने पित्ताची आणि रक्ती पित्ताची सूूज बंद होते.
शक्तीदायी – कारवीमुळे शरीरात शक्तीही येते. संबंध कारवीचे झाड घेऊन वरून वडाची पाने गुंडाळून थोडा चिखल लावून विस्तवात घालून चांगले भाजतात व हे कारवीचे खोड पोटात घेतात. याने बळ वाढते.
आमवायू कमी – कारवीचे खोड वडाच्या पानात गुंडाळून वरून माती लावून विस्तवावर चांगले खरपूस भाजतात.मग शिजलेल्या झाडाचा आतील भाग पोटात गेला असता त्यामुळे आमवायू कमी होतो.
कुष्ठरोग तसेच खरूज झाली असता – पोटातकारवीचा रस घेतला असता कुष्ठरोग व कोणत्याही कारणाने अंगावर उठलेले खरूज, खरका व शरीरावर मोठ्या प्रमाणात आलेली सूजसूद्धा कारवीचा रस पोटात घेतल्याने जाते.
शरीरावरील सूज कमी करण्यासाठी – कारवीचे पाळ म्हणजेच मूळ उगाळून शरीरावरील सुजेवर लावले असता सूज ताबडतोब कमी होते,. इतके सुजेवर हे मोठे रामबाण आहे. कारवीलाच कोकणात जितसाया असेही म्हणतात.
जखमेवरील सूजेवर – जखमेवर जर सूज आली असेल तर ती जखम पिकून फुटून त्यातील पू वाहून जखम लगेच बरी होते. वरून कारवीचे मूळ उगाळून लावीत असतानाच कारवीचा पुटपाक करून काढलेला रस पोटात घेतल्याने लवकर बरे वाटते. अशाप्रकारे कारवी हे मोठे गुणकारी झाड आहे.
सह्याद्री पर्वतरांगेसह पश्चिमेकडील डोंगररांगेत कारवी मोठ्या प्रमाणावर उगवते. महाबळेश्वर, कास पठार परिसर, कोयना आणि भीमाशंकर अभयारण्यात कारवी आहेच. अशाप्रकारे कारवी हे आर्युवेदिय औषधी गुणकारी आहे.
– सुजाता गानू