तुळस ही सर्वांच्या परिचयाची आहे. दारात तुळशीवृंदावन असावे असे आपल्यात शास्त्र आहे. तुळस ही बहुगुणी औषधी आहे. तिला आपण देवतास्वरूपच मानले आहे. मात्र तिच्या बिया मात्र दुर्लक्षितच आहेत.
सब्जा म्हटले की सर्वांच्या लक्षात येते, की फालुद्यामध्ये किंवा नीरेमध्ये टाकण्यात येणाऱ्या बिया. ज्या हव्याहव्याशा वाटतात. पण हा सब्जा म्हणजेच तुळशीच्या बिया हे मात्र फारसे कोणाला माहीत नाही. हा सब्जा उन्हाळ्यात अगदी आवर्जून वापरावा असा पदार्थ आहे. तो शरीरातील उष्णता तर कमी करतोच शिवाय सर्व उष्णतेच्या विकारांवर खूप उपयुक्त आहे.
सब्जा भिजवला की फुगतो, चांगला दीडपट मोठा होतो. सब्जा हा नेहमी पातळ पदार्थाबरोबर खाल्ला जात असल्याने पटकन पोट भरल्याची भावना येते. त्यामुळे अतिरिक्त आहार घेण्याचे टाळले जाते. वजन आटोक्यात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी सब्जा खूपच उपयोगी आहे. हृदयरोग्यांनी सब्जा नियमित घ्यावा.
कोलेस्ट्रॉल कमी होते, त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारे एचडीएल नावाचे कोलेस्ट्रॉल वाढते.
मधुमेह्यांसाठीही सब्जा उपयुक्त आहे. त्याच्या श्लेष्मल गुणधर्मामुळे सर्व पदार्थाचे सावकाश शोषण होते. त्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही. विविध प्रकारच्या कर्करोगांमध्ये तसेच जखम लवकर भरून निघण्यास मदत होते.
तुळशीच्या बिया अँटिऑक्सिडेंट्स आणि फ्लेव्होनोइड्सने समृद्ध असतात जे फ्री रेडिकलच्या दुष्परिणामांना रोखण्यात प्रभाविपणे मदत करतात.
तुळशीच्या बियांमध्य भरपूर प्रमाणात लोह असते, त्यामुळे आपले केस वाढण्यास मदत होते आणि प्रदूषण किंवा रसायनामुळे केसांचे झालेले नुकसान कमी होण्यास मदत होते. यांमध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर आढळतो त्यामुळे आपली पचनसंस्था सुरळीत चालण्यास मदत होते ह्याशिवाय तुळशीच्या बोया खाल्लाने पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे जेवणाच्या मध्ये अरबट चरबट खायची इच्छा होत नाही आणि जास्त खाणे टाळते जाते. त्याचा फायदा आपल्याला वजन कमी करण्यासाठी होतो.
गोड तुळशीचे बीज वाईट कोलेस्टेरॉलचा स्तर कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. शिवाय अथेरोस्क्लेरोसिसचा धोका कमी करते. धमनी आणि रक्त वाहिन्यामधील प्लाक कमी करण्यात मदत करते
तुळशीच्या बियांचा वापर केल्याने हृदयावरचा ताण कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकच्या शक्यता कमी होतात.
तुळशीच्या बियांमध्ये पोटाशियम आढळते ज्यामुळे ते धमन्या आणि राक्तवाहिन्यांमधील ताण कमी होऊन हृदयाची कार्यप्रणाली सुरळीत चालते.
तुळशीच्या बियांमध्ये विटामिन ए मुबलक प्रमाणात असते जे रेटिनासाठी एकशक्तिशाली अँटिऑक्सीडंट म्हणून काम करते ज्यामुळे मोतिबिंदूंची वाढ थांबवण्यासाठी मदत होते.
ह्या बियांमध्ये प्रोटीन, विटामिन के, कार्बोहायड्रेट, क्युरेटीव्ह ओमेगा-3, फॅटी ऍसिड आणि अनेक खनिजे अगदी मुबलक प्रमाणात आढळतात.
ऍसिडीटीचा त्रास होत असेल तर तुम्ही भिजलेला सब्जा, दूध आणि गुलकंद ह्यांचे एकत्र सेवन केल्यास ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. शिवाय फायबर मुबलक प्रमाणात असल्याने मूळव्याध आणि ब्लड शुगर प्रमाणात ठेवायलाही सब्जा मोलाची मदत करतो. जळजळ थांबते.
ह्या उन्हाळ्यात सब्जाला आपल्या आहारात जरूर समाविष्ट करा आणि हेल्दी राहून उन्हाळ्याचा भरपूर आनंद घ्या.