पुणे – जमिनीवर उताणे झोपावे. दोन्ही पाय सावकाश वर उचलून काटकोनात उभे करा. श्वास सोडत सोडत पाय कमरेत वाकवा. पाठीचा कणा व कंबर फार न उचलता पायांचे अंगठे मागच्या बाजूला नेऊन जमिनीवर टेकवा. यामुळे पायांची कमरेत अधिकाधिक घडी होते. हलासनामुळे (halasana yoga benefits) कंबर, पाठ यांना चांगला व्यायाम होतो.
तोल नीट सांभाळला तरच हे आसन व्यवस्थित होऊ शकते. पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. पोटाच्या स्नायूंवर दाब येतो त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य चांगले होते. हे आसन खरोखरच सौंदर्यांचेच आसन आहे. यामुळे हातपायसुद्धा कणखर बनतात. यात जालंधरबंधाचे फायदे मिळतात. जालंधरबंध बांधल्या गेल्यामुळे सांध्यांची कार्यक्षमता वाढते. मूत्रपिंडाचे विकार कमी होतात.
हलासन (halasana yoga benefits) हे थोडा थोडा वेळ स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. कंबरेतील पायांची घडी लगेच अधिक होत नाही. सुरुवातीला पाय गुडघ्यात सरळ ठेवणे आवश्यक आहे. 15 ते 30 सेकंदापर्यंत स्थिर ठेवणे फायद्याचे आहे. पाय जास्तीत जास्त डोक्यावरून मागे गेले की स्थूल व्यक्तींचा जीव थोडासा घाबरा होतो. पण तरीही हळूहळू या आसनाचा कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. आसन चालू असताना संथ श्वसन करावे.
हलासन (halasana yoga benefits) केल्यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. तसेच विशिष्ट दिशेने कंबरेच्या सांध्यांना ताण मिळतो. त्यामुळे सांध्यांची कार्यक्षमता वाढते व तेथील विकार बरे होतात. सांध्यांची पुढे मागे हलविले जाण्याची क्रिया, सांध्याची कार्यक्षमता वाढविते.
हलासन (halasana yoga benefits) करताना सावकाश करावे. शरीराला कोणत्याही प्रकारचा झटका देऊ नये. सोडताना हे हळूहळू सोडावे. या आसनात आपले ध्यान विशुद्धचक्रावर म्हणजेच गळ्याजवळ असावे. पहिल्याच दिवशी पाय जमिनीला टेकले पाहिजे असा प्रयत्न करू नये. तर योग्य तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे. या आसनामुळे केवळ विशुद्धचक्रच नव्हे तर शरीरातील सर्व चक्र विकसित होतात. पचनक्रिया सुधारते. गळ्यातील ग्रंथीचे कार्य सुधारते. पोटाची आणि कंबरेची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत करणारे हलासन हे रक्ताभिसरणाची क्रिया गतिमान करते.
म्हणूनच हलासन करणाऱ्याचे शरीर आणि मन दोन्ही संतुलित असते. हे आसन रोज केल्याने भूक वाढते. नाडीसंस्था चांगल्याप्रकारे कार्य करू लागते. असं म्हणतात आपल्या शरीरातील नाडीसंस्था स्वस्थ्य असेल तर आपले शरीर सुदृढ असते. या आसनामुळे नाडीशुद्धीकरण होते. रोज हे आसन दोन-तीन वेळा करावे. आसन करताना पोट रिकामे हवे. म्हणून शक्यतो पहाटे किंवा संध्याकाळी ज्यावेळी पोट रिकामे असेल तेव्हाच हे आसन करावे. ज्यांना पोटाचे, कंबरेचे, मणक्याचे विकार असतील त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच हे आसन करावे. स्त्रियांनी गर्भावस्थेमध्ये हे आसन करू नये.
या आसनाने शरीरांतर्गत ग्रंथींना तसेच स्नायूंना चांगल्याप्रकारे मसाज होतो. त्यामुळे मज्जासंस्था चांगल्याप्रकारे कार्य करते. शरीराची शक्ती वाढते, तसेच शरीर लवचिक बनते. अजीर्ण, करपट ढेकरा येणे, तसेच कफ, दमा, रक्तदोष या विकारांपासून मुक्ती मिळते. थायरॉईड (Thyroid) ग्रंथींच्या वाढीवर परिणाम करणारे हे आसन आहे. यकृत बलवान करते म्हणून रोज करावे. हे आसन करताना योगतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. या आसनात तोल सांभाळायचा आहे. त्यामुळे मार्गदर्शन हवे. हनुवटी कंठखुपात गच्च टेकणे व नैसर्गिकपणे आसन करताना जालंदरबंध बांधला गेला पाहिजे. त्यामुळे थायरॉईड (Thyroid) ग्रंथींवर दाब येतो. 15 ते 20 सेकंद नियमित टिकवून हलासन केले असता थायरॉईड (Thyroid) चा प्रॉब्लेम कमी होतो.