पुणे – योग्य योगतज्ञाच्याच मार्गदर्शनाखाली त्रिबंधासमवेत अंर्तकुंभक प्राणायामाची प्रॅक्टिस करावी. यामुळे शरीरशुद्धी होते. आपले शरीर विकारमुक्त होते. नियमित सरावाने वजन नियंत्रित करता येते. पोटाचे विकार बरे होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते. श्वसनाचे विकारही बरे व्हायला मदत होते. पचनक्रिया सुधारते. श्वसनाचे विकारही बरे व्हायला मदत होते. फुफ्फुसांना मुबलक प्राणवायू प्राप्त झाल्यामूळे शरीर निरोगी आणि चित्त प्रसन्न राहते. मात्र प्राणायाम प्रक्रियेचे योग्य ज्ञान घेऊनच सराव करावा.
प्राणायाम म्हणजे श्वासाला निरोध करणे. योगशास्त्रात सूर्यभेदन हा महत्त्वाचा प्राणायाम सांगितला आहे. तो कसा करतात ते आपण पहाणार आहोत.सूर्यनाडी किंवा पिंगळा नाडीचे भेदन इथे केले जाते.या प्राणायामामुळे उष्णता निर्माण होते. मस्तकाचा पुरुषशक्ती भाग जागृत होतो.या प्राणायामाने उष्णता निर्माण होत असल्यामुळे तो नेहमी थंडीतच करावा. म्हणजे याचा फायदा अधिक मिळेल.
पावसाळ्यात सूर्यभेदन प्राणायाम करताना तो सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात केला असता जास्त फायदा होतो. काही वेळा संध्याकाळच्या सौम्य सूर्यप्रकाशातही हा प्राणायाम केला तरी त्याचा आरोग्याला हितकारक उपयोग होतो.
प्रत्यक्ष कृती
बैठकस्थितीत पद्मासन, वज्रासन, सिद्धासन, सुखासन किंवा योग्य ते आसन घालावे. हाताची ध्यान किंवा ज्ञानमुद्रा करावी. आपले डोळे बंद करावेत. हाताची प्रणव मुद्रा बांधावी. डावी नाकपुडी करंगुलीने बंद करावी. त्यानंतर उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास घ्यावा. मग उजवी नाकपुडी बंद करून डावीने सावकाश श्वास सोडावा. सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन मग थोडा रोखून डावीने सोडणे होय. रोज नियमित सूर्यभेदन प्राणायाम केल्यामुळे जठाराग्नि प्रदिप्त होऊन भूक चांगली लागते.
सूर्यभेदन प्राणायाम हा अतिशय प्रभावशाली आहे. जो कोडासारखे गंभीर आजार जे जन्मजात काहीजणांना असतात. ते बरे करतो. हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.
त्रिबंधात्मक सूर्यभेदन प्राणायामाचा सतत सराव केल्याने शारीरिक तसेच मानसिक शांती लाभते. वातापासून उत्पन्न होणारे अनेक विकार सूर्यभेदन प्राणायाम बरे करते.
तसेच सूर्यभेदन रक्तदोष घालवते. मात्र त्रिबंधात्मक सूर्यभेदन प्राणायाम करताना योग्य योगतज्ञाचे मार्गदर्शन आवश्यक असते.
सुरुवातीला योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यभेदन प्राणायाम करावा. पहिल्यांदा फक्त जालंधर बंध बांधूनच सूर्यभेदन प्राणायाम शिकविला जातो पण नंतर मात्र तीनही बंध बांधून कुंभकाचा कालावधी वाढवून कुंभकात असतानाच बंध तपासून शेवटी जालंधरबंध सोडावा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडावा. प्रथम मूल, मग उडियान आणि शेवटी जालंधरबंध सोडावा.
सूर्यभेदन प्राणायाम हा भस्त्रिका प्राणायामानंतर केला जातो. पहिल्यांदा याची प्रॅक्टिस एकदम करू नये. हा प्राणायाम पिंगला नाडी जागृत करत असतो. हा प्राणायाम करताना उष्णता ही जास्त प्रमाणात निर्माण होते म्हणून उन्हाळ्यात हा प्राणायाम करण्याचे टाळावे. जर व्यवस्थित शिकले तर सूर्यभेदन 15मिनिटे सहज करता येण्यासारखा प्राणायाम आहे.
या प्राणायामाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचे फायदे थोडक्यात असे…
– अशक्त यकृत सशक्त बनते.
– यकृतात योग्य प्रमाणात पित्तरस स्त्रवतो.
– सर्व इच्छा पूर्ण करणारी कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते पण त्यासाठी साधना आवश्यक आहे.
– सूर्यभेदन प्राणायामामुळे जठाराग्नी प्रदिप्त होऊन भूक चांगली लागते.
– अशक्त व्यक्तींनी हा प्राणायाम जरूर करावा.
– ज्यांना संधीवात झाला असेल त्यांनी सूर्यभेदन प्राणायाम नियमित करणे आवश्यक आहे.
– सूर्यभेदन प्राणायाम हा अतिशय प्रभावशाली आहे. जो कोडासारखे गंभीर जे जन्मजात काहीजणांना असतात. ते बरे करतो. हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.
– सूर्यभेदन प्राणायामाचा सतत सराव केल्याने शारीरिक तसेच मानसिक शांती लाभते.
– वातापासून उत्पन्न होणारे अनेक विकार सूर्यभेदन प्राणायाम बरे करते.
– काही वेळा वायुप्रकोपामुळे आतड्यात रोगजंतू निर्माण होतात जे अनेक रोग निमंत्रित करतात. हे रोग नियमित सूर्यभेदनामुळे नाहिसे होतात.
– सूर्यभेदन रक्तदोष घालवते.
निरोगी व्यक्तीने रोज हा प्राणायाम केला तरी चालू शकते पण शक्यतो सूर्यभेदन हे थंडीत अधिक लाभदायक आहे. कारण ते शरीरात उष्णता निर्माण करते. तसा सूर्यभेदन प्राणायाम हा प्रकार सर्वसामान्यांमध्ये विशेष लोकप्रिय नाही पण योगशास्त्रात मात्र त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे व सखोल अभ्यासक तो करतातच. मात्र आपण करताना तो योग्य अशा योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करणे इष्ट ठरते. अनेक रोगांवर रामबाण उपाय असलेला नाडीशुद्धी प्राणायाम रोज नियमित करावा
त्रिबंधासमवेत बाह्य कुंभक
सिद्धासन किंवा पद्मासनामधे शास्त्रोक्त पद्धतीने बसावे आपल्या शक्ती किंवा कुवतीनुसार जास्तीत जास्त श्वास बाहेर सोडावा श्वास बाहेरच सोडून श्वास रोखून म्हणजे बाहेरचा श्वास आत येऊ न देता रोखून, प्रथम जालंधर बंध मग मूलबंध व उडियान असे त्रिबंध बांधावेत. जेवढावेळ शक्य होईल तेवढा वेळ श्वास बाहेरच रोखावा. बंध नीट बांधले गेले आहेत का हे तपासून पहावे.
शक्यतो योगशिक्षकाच्याच मार्गदर्शनाखाली हे करावे. ज्यावेळी श्वास घ्यायची इच्छा होईल तेव्हा त्रिबंध सोडावेत व श्वास घ्यावा. प्रथम जालंधर बंध मग उडियान व शेवटी मूलबंध बांधण्याचा चढता क्रम श्वास सोडताना उतरता करावा लागतो म्हणजे प्रथम मूलबंध नंतर उडियान व शेवटी जालंधर बंध सोडावा.
श्वास आत कोंडून पूर्ववत श्वसन क्रिये द्वारे बाहेर टाकावा मग बंध बांधून सोडावा रोज दिवसातून 21 वेळा असे करणे प्रथम तरी शक्य होत नाही. तेंव्हा योग्य योगतज्ञाच्याच मार्गदर्शनाखाली त्रिबंधासमवेत बाह्यप्राणायामाची प्रॅक्टिस करावी.
बाह्यप्राणायाम करताना आपण एक संकल्प करावा. तो असा…
संकल्प – या प्राणायामात कपालभाती सारखा श्वास बाहेर टाकताना सगळे विकार दोष हे माझ्या शरीर व मनातून बाहेर पडत आहेत अशा मानसिक चिंतनाचा स्त्रोत हवा ही विचारशक्ती जेवढी प्रबळ, तीव्र तेवढे आपले शारीरिक व मानसिक कष्ट कमी होऊन शांती व विश्रांती मिळते. मनात हा जीवा शिवाचा दृढसंकल्प हा प्रत्येक प्रकारची व्याधी नष्ट करून यशस्वीता प्रदान करीत असतो. बाह्य प्राणायाम हा हानीरहित आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. तो मनाची चंचलता दूर करतो.
तसेच बाह्यप्राणायामाने जठराग्नि प्रदीप्त होतो. पोटाच्या विकारात या प्राणायामामुळे इष्ट फरक पडतो. एवढच नव्हे तर बुद्धी सूक्ष्म व तीव्र होते, शक्ती ही उर्ध्वगतीने प्रवाहित होते व स्वप्नदोष तसेच संभोगसमयी शीघ्रा पतनाचे विकार बरे होतात. बाह्य प्राणायाम केल्यामूळे पोटातील सर्व ग्रंथीना व्यायाम होतो. काहीजणांना सुरुवातीला बाह्यप्राणायामामुळे पोटात दुखते पण त्याने घाबरून जाऊ नये. त्रिबंध म्हणजेच जालंधर उडियान व मूलबंध बांधून हा प्राणायाम शास्त्रोक्त पद्धतीने तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करणे इष्ट असते.
त्रिबंधासमवेत अंतर्प्राणायाम
सिद्धासन किंवा पद्मासनामधे शास्त्रोक्त पद्धतीने बसावे आपल्या शक्ती किंवा कुवतीनुसार जास्तीत जास्त श्वास दोन्ही नाकपुड्यांनी आत घ्यावा. श्वास आत शरीरात घेतल्यावर श्वास रोखून म्हणजेच कुंभक करून म्हणजेच दोन्ही नाकपुड्या बंद करून प्रथम जालंधर बंध मग मूलबंध व उडियान असे त्रिबंध बांधावेत.जेवढावेळ शक्य होईल तेवढा वेळ श्वास आतच रोखावा. बंध नीट बांधले गेले आहेत का हे तपासून पहावे. ज्यावेळी श्वास घ्यायची तीव्र इच्छा होईल तेव्हा त्रिबंध अनुक्रमे सोडावेत व श्वास घ्यावा.
प्रथम जालंधर बंध मग उडियान व शेवटी मूलबंध बांधण्याचा चढता क्रम श्वास घेताना उतरता करावा लागतो म्हणजे प्रथम मूलबंध नंतर उडियान व शेवटी जालंधर बंध सोडावा.अशा प्रकारे श्वास आत घेऊन पूर्ववत श्वसन क्रिये द्वारे बाहेर टाकावा मग बंध बांधून सोडावेत. रोज दिवसातून एकवेळा तरी अंर्तकुंभक बंधात्मक असे करावे. प्रथम अवघड वाटेल कदाचित् शक्यही होणार नाही. पण घाबरून जाऊ नये. योग्य योगतज्ञाच्या मार्गदर्शनाने हा प्राणायाम हळूहळू जमू लागेल व रोज अगदी 21 नाहीतर 11 वेळाही आपण करू शकाल.
तेंव्हा योग्य योगतज्ञाच्याच मार्गदर्शनाखाली त्रिबंधासमवेत अंर्तकुंभक प्राणायामाची प्रॅक्टिस करावी.यामूळे शरीरशुद्धी होते. आपले शरीर विकारमुक्त होते. नियमित सरावाने वजन नियंत्रित करता येते. पोटाचे विकार बरे होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते. श्वसनाचे विकारही बरे व्हायला मदत होते.
फुफ्फुसांना मुबलक प्राणवायू प्राप्त झाल्यामूळे शरीर निरोगी आणि चित्त प्रसन्न रहाते. मात्र प्राणायाम प्रक्रियेचे योग्य ज्ञान घेऊनच सराव करावा. अशा प्रकारे सूर्यभेदन हे अंर्तकुंभकाने तसेच बाह्यकुंभकानेदेखील करता येते. जे आपले अनेक विकार बरे करते. मात्र तज्ज्ञ अनुभवी योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली प्राणायामाचे हे प्रकार करावेत.
– सुजाता टिकेकर