निवडुंग ही फार दिव्य औषधी आहे. निवडुंग हा धारेचा निवडुंग असतो. त्याला तीन, चार, पाच धारा असतात. साधारण मनगटाएवढे जाड असते. याच्या कडांवर काटे असतात. हा निवडुंग तोडला तर त्यातून पांढरा व दाट असा चीक निघतो, तो यातील मुख्य द्रव्य होय.पूर्वी प्लेगच्या गाठीवर चीक लावून वर निवडुंग बांधतअसत. त्यामूळे प्लेग बरा झाला. निवडुंगाच्या वाळलेल्या चिकास “फरफीयून’ असे म्हणतात. यात 38 टक्के राळ, 18 टक्के डिंक, 12 टक्के कॅलशियम हैड्रॉक्साईड वगैरे व 10 टक्के इतर द्रव्ये व 22 टक्के निवडुंगाचे सत्त्व सापडते.
जुनाट तापावर – पुष्कळ दिवस ताप लागून राहिला आहे,निवडुंगाच्या चिकाचे चार थेंब म्हणजे अंदाजे अर्धा ग्रॅम चीक घेऊन भाजलेल्या हरभऱ्या डाळीच्या पिठात हा चीक घालून गोळ्या करून त्या ताप झालेल्या व्यक्तीस खाण्यास द्याव्यात. लगेच ताप उतरेल इतका प्रभावी निवडुंगाचा चिक आहे. शौचास उत्तम होऊन हलके वाटू लागेल. तीन चार दिवस हे औषध देताच ताप कमी होतो, भूक लागते व रोग्याला हुशारी वाटते. निवडुंगाच्या चिकाने जास्त परसाकडे होण्याची भीती असते म्हणून याचे प्रमाण हळूहळू वाढवावे. ( cactus benefits )
पोटात डावीकडे प्लीहा वाढली असता – पोटात डावीकडे प्लीहा वाढली आहे,निवडुंगाच्या चिकाचे सहा थेंब म्हणजे अंदाजे दीड ग्रॅम घेऊन भाजलेल्या हरबऱ्याच्या पिठात घालून गोळ्या करून त्या खाण्यास द्याव्यात. असा अर्धा ग्रॅम चीक एका वेळेला गोळीतून द्यावा.
यकृत वाढले असता – पोटात उजवीकडे यकृत वाढले आहे अशावेळी निवडुंग चीक हरभऱ्याच्या पीठात कालवून गोळ्या कराव्यात व त्या दोनवेळा घ्याव्यात.
भूक लागत नाही – भूक लागत नाही,निवडुंग चीक हरभऱ्याच्या पीठात कालवून गोळी करावी व ती घ्यावी.( cactus benefits )
पोट भारी जड पडते – पोट भारी जड झाले आहे, अशा वेळी हा विकार नाहीसा करण्यासाठी निवडुंगाचा चीक वापरतात. निवडुंगाच्या चिकाचे पाच थेंब म्हणजे अंदाजे 1 ग्रॅम घेऊन भाजलेल्या हरभऱ्याच्या पिठात घालून गोळ्या करून त्या खाण्यास द्याव्यात. असा अर्धा ग्रॅम चीक एका वेळेला द्यावा.
शक्तीवर्धक – निवडुंगाच्या चिकाचे अंदाजे लहान 5 थेंब साजूक तूप साखरेत घालून त्याची गोळी करून दिली असता शक्ती फार चांगली येते. तसेच भूक लागते, अन्न पचते.
हृदयरोगात – हृद्रोगात हे औषध फार उपयुक्त आहे. हृदय धडधडते, हृदयात कळ येते, अशा हृदयदुखीत निवडुंगाच्या चिकाचे अंदाजे 5 थेंब तूपसाखरेत घालून त्याची गोळी करून घेतली असता हृदयाची कळ थांबते.
मूत्रविकारावर – लघवीसंबंधी विकारांवरसुद्धा निवडुंगाचा चीक देतात. लघवीतून पू जातो, लघवी होण्यास अडचण पडते व शौचास साफ होत नाही, अशा विकारात चण्याच्या पिठात एक ग्रॅम चिक घालून गोळ्या करून हा चीक घेतला असता बरे वाटते. यात मुख्यतः परसाकडे साफ होते व बरे वाटते. लघवीची आग, जळजळ थांबते.
डांग्या खोकल्यात – डांग्याखोकल्यात निवडुंगाचा चीक देतात. लोण्यामध्ये या चिकाचे दोन थेंब टाकून चाटले असता डांग्या खोकल्याचा कफ सुटून, कफ पडून घसा मोकळा होऊन डांग्या खोकला एकदम कमी होतो. कोणी कोणी मीठ घालून निवडुंगाचा चिक डांग्या खोकल्यात देतात.
दम्यामध्ये – दम्यामध्येसुद्धा लोण्यामध्ये निवडुंग चिकाचे दोन थेंब टाकून चाटले असता दमा विकारात आराम पडतो.( cactus benefits )
मूतखड्यातही – मूतखड्यातही परसाकडे व लघवीला साफ करण्यास निवडुंगाचा चीक देतात. अंदाजे तीन थेंब चीक दुधातून घ्यावा. शौचास साफ होऊन लघवी होते व लघवीची कळ थांबते.
पोटदुखीवर – पोटदुखी हा चीक घेतल्याने थांबते. साधी व कसलीही पोटदुखी हा चीक घेतल्याने बरी होते. वायु सरून कमी होते. पोटफुगी याने कमी होते. रोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा रसायनविरहित गुळात निवडुंगाच्या चिकाच्या दोन थेंबाच्या गोळ्या करून घ्याव्यात.,
शौचशुद्धी – परसाकडे साफ होऊन पोट हलके वाटून बरे वाटते. निवडुंगाच्या चिकाचा मुख्य उपयोग साफ शौचशुद्धी हा आहे.
काविळीत – काविळीत निवडुंगाचा चीक चांगले काम करतो. रोज सकाळी दोन थेंब चीक रसायनविरहीत गुळात गोळी करून घेतली असता एक दोन दिवसात कावीळ बरी होते. यावेळी पथ्य म्हणून नुसता दुधभात खावा.
जलोदरात – पोटात पाणी झाले असता निवडुंगाचा चीक पोटात घेऊन निवडुंगाचा वरून लेप लावल्याने पोटातील पाणी नाहीसे होते. बाहेरूनही लावण्यास याचा उपयोग होतो.
सांधेदुखी खरूज, गजकर्ण अशा अनेक व्याधींवर संजीवनी असलेले निवडुंगाचे तेल कसे बनवावे हे सांगितले आहे.( cactus benefits )
सुजेवर – सुजेवर तर निवडुंगाचे तेल हे रामबाण औषध आहे. तसेच सूज मग ती कोठेही आलेली असो, निवडुंग ठेचून, बारीक वाटून कोमट करून सुजेवर बांधल्याने सूज ताबडतोब कमी होते.
मूळव्याधीवर – मूळव्याधीवर निवडुंग ठेचून, बारीक वाटून कोमट करून बांधल्याने मूळव्याधही बरी होते.
चिघळलेली किडे पडलेली जखम बरी करण्यासाठी – जखमेत जर घाण झाली असेल, किडे पडले असतील तर, निवडुंग वाटून कोमट करून वर बांधावा, किडे नाहीसे होतात.
अवघड जागी गळू, गाठ आली असता – अवघड जागी गाठी येतात त्यावर निवडुंग लावावा. निवडुंगाचा चीक लावून त्यावर निवडुंग वाटून, कोमट करून बांधावा.. गाठ ताबडतोब फुटते. नवीन असली तर जाते.
निवडुंगाचे तेल( cactus benefits )
निवडुंगाचे तुकडे करून ते चांगले ठेचून त्याच्या म्हणजे निवडुंगाच्या आठपट खोबरेल तेल घालून, तेलाच्या आठपट दह्याचे पाणी किंवा ताक घालून भिजवावे, पाणी आटून नुसते तेल होताच गाळून घ्यावे. हे निवडुंगाचे तेल सांधे धरले असता त्यावर लावावे. गजकर्णास हे तेलात मिसळून लावतात, गजकर्ण बरे होते. कोणत्याही तऱ्हेची खरूज हे तेल लावल्याने बरी होते.