तोंड (mouth) येणे ही अनेकांसाठी अगदी सामान्य समस्या आहे. कधी रात्री झोपेतून उठल्यावर तोंडाची (mouth) अचानक आग होते तर कधी खाताना कोणताही पदार्थ तिखट लागायला लागतो. तोंड (mouth) आल्याने अनेकांना इतका त्रास होतो की खाणे-पिणे तर बंद होतेच पण साधे बोलताही येत नाही.
चुकीची जीवनशैली, जागरण, पोट साफ नसणे, विविध प्रकारची व्यसने, पित्त प्रकृती, सतत मसालेदार, तेलकट आणि जंकफूड खाणे या गोष्टींमुळे तोंड (mouth) येण्याची समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे दिसते.
तोंड (mouth) येण्याबाबत आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज वेळीच दूर करून आपल्याला तोंड (mouth) येण्यामागच्या समस्येचे कारण लक्षात घेणे आणि त्यावर वेळीच काय उपाय करता येतील याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
तोंड (mouth) साफ ठेवणे हा तोंड (mouth) न येण्यावरील एक उपाय आहे. प्रत्येक खाण्यानंतर ब्रश करणे, कोमट पाण्याच्या गुळण्या करणे असे उपाय तोंड (mouth) स्वच्छ ठेवण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकतात.
विड्याचे पान हे अनेक अर्थांनी औषधी असते. तोंड (mouth) आल्यावर या पानाचा रस काढून तोंड (mouth) आलेल्या ठिकाणी लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
तुळस ही भारतीय परंपरेत अतिशय महत्त्वाची वनस्पती मानली जाते. तुळशीच्या पानांचा रस किंवा कच्ची तुळस तोंड (mouth) आलेल्या ठिकाणी काही काळ ठेवल्यास त्याठिकाणी नक्कीच काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
भरपूर पाणी पिणे हा अतिशय उत्तम उपाय आहे. सतत तोंड (mouth) येत असेल तर पोट साफ नसणे ही मुख्य समस्या असू शकते. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य झाल्यास पोट साफ होण्यास मदत होते आणि तोंड (mouth) येण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
दीर्घकालीन किंवा काही गंभीर आजारांवरील विशिष्ट प्रकारची औषधे सातत्याने घेत असल्यास त्यामुळेही तोंड (mouth) येण्याची शक्यता असते. अशावेळी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन औषधोपचारांमध्ये बदल करता येऊ शकतात.
सतत चहा-कॉफीचे सेवन तसेच दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू, पान यांसारख्या व्यसनांमुळेही तोंड (mouth) येऊ शकते. त्यामुळे वेळीच या गोष्टींच्या सेवनावर बंधने घालून तोंड (mouth) येण्यापासून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता. अशाप्रकारे घरगुती उपाय करूनही तोंड (mouth) येणे कमी होत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.