Monday, February 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तुम्हालाही होतोय का जांघेमध्ये खूप त्रास ? तर या बातमी वाचाच

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2021
in आरोग्य वार्ता
A A
तुम्हालाही होतोय का जांघेमध्ये खूप त्रास ? तर या बातमी वाचाच
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे डीवीटी ही नेहमीसाठी एक अज्ञात असलेली रोगविषयक स्थिती आहे. जिथे मुख्य शिरेमध्ये (नस) रक्त जमा होते. आणि त्यामुळे रक्ताचा प्रवाह पूर्णपणे किंवा अंशता थांबून जातो. याचा सर्वात जास्त प्रभाव पायांवर पडतो. पायात सूज, विशेषता आपल्या पायाच्या पोटऱ्यावर किंवा टाचेमध्ये बघितली जाते. जे व्यक्ति डीवीटीने ग्रस्त असतात, त्यांच्यासाठी हे एक नेहमीचे लक्षण आहे. काही रुग्णांना तर असाही अनुभव असेल की, ते जेव्हा जेव्हा उभे रहातात किंवा चालतात तेव्हा त्यांच्या पोटऱ्या किंवा जांघेमध्ये खूप त्रास होतो.

डीवीटीची सर्वात मोठी जोखीम ही आहे की, रक्ताच्या गाठीचे तुकडे होऊन ते शेवटी रक्ताबरोबरच फुफ्फुसांपर्यंत पोहचतात. ही प्रक्रिया म्हणजे पलमोनरी एम्बोजिम. ही एक अशी स्थिती आहे की, आपल्या जीवनासाठी ती खूप घाबरवणारी आहे. रक्ताचे तुकडे फुफ्फसांमध्ये जायच्या वेळेपासून ते 30 मिनिटांपर्यंत कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये असे आढळून आले आहे की, या आजाराचे कुठलेही लक्षण दिसून किंवा जाणून येत नाही. काहीही असलं तरीही हा रोग या रोगाच्या विशेषज्ञांसाठीही एक गुप्त रोगासारखाच आहे. याचबरोबर याला एक संभाव्य आव्हान मानून लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.  ( deep vein thrombosis )

किंवा यांच्या बाबतीतली अजून विस्तृत माहिती मिळवली गेली पाहिजे. डीवीटी एक आयुष्यभर घाबरवणारी स्थिती आहे. कधी कधी याला इक्‍नॉमी क्‍लॉस सिंड्रोम असेही म्हटले जाते डीवीटीच्या विकासाबरोबर इक्‍नॉमी क्‍लॉस सिंड्रोम वाढण्याची शक्‍यताही तितकीच वाढते, जेव्हा शरीरातील विभिन्न हलचाली थांबून जातात, जसे की, जेव्हा तुम्ही लांब विमान प्रवास करता त्यावेळी प्रवासात पायांचे सुन्न पडणे. अशी स्थिती तेव्हाच उत्पन्न होते जेव्हा शरीरात कुठल्यातरी भागात एके ठिकाणीच रक्त जमा होत जातं. पायांच्या लांब शिरांमध्ये, खांदे किंवा हातांत असे होते.

डीवीटीच्या तीन रुगणांपैकी फक्त दोनच रुग्ण वाचवले जाऊ शकतात. भारतीय वैद्यकशास्त्राच्या परिमाणानुसार केलेल्या अभ्यासातून हे तथ्य समोर आले आहे की, भारतीय रुग्णांमध्ये डीवीटी होणे हा एक नित्यक्रम आहे, विशेष करून तो रुग्ण ज्या इस्पीतळात भरती होतात तिथे. अन्य अभ्यासातून हे समजून येते की, भारतीय रुग्णांमध्ये पोस्ट-ऑपरेटिव डीवीटीची घटना पश्‍चिमी भागांत लोअर लींब सर्जरीच्या रूपात जास्त प्रमाणात बघावयास मिळत आहे. याचे कारण म्हणजे तपासणीसाठी माहितीची कमी असणे, यामुळे आजाराच्या प्रमाणाचा अंदाज लावला जाऊ शकतो.
जवळ जवळ 60 टक्के रुग्णांना डीवीटी रोगाचा प्रतिबंध झाला नाही, म्हणून त्यांना लॉवर लिंब सर्जरी करावी लागली. आजकाल एवढ्या प्रगतशील मेडिकल क्षेत्रात जर योग्य वेळी योग्य उपचार केला गेला तरच डीवीटीपासून बचाव केला जाऊ शकतो.( deep vein thrombosis )

निदान आणि उपचार ( deep vein thrombosis )
आज काल डीवीटीचा अल्ट्रासाउंडद्वारे पण माहीती मिळूअ शकते. डॉक्‍टरांचा विश्‍वास आहे की, या प्रकारचा प्रयोग करून ते छोट्या छोट्या रक्ताच्या गाठींचा पत्ता लावू शकतात. थ्रोम्बोसिसचा रक्ताची चाचणी घेऊनसुद्धा पत्ता लावला जाऊ शकतो, जो की एक खूप चांगला पर्याय मानला जातो.

एक अशी परीक्षा की जी क्‍लोटिंग नंतरच्या बाय-प्रोडक्‍ट्‌सच्या प्रमाणालासुद्धा मोजते. त्याला डी-डीमर असे म्हणतात. त्याचा उपयोग आज काल सर्वत्र केला जातो. डीवीटी चे चांगल्या प्रकारच्या प्रबंधनासाठी त्याचे लवकर निदान आणि लगेच रोग निरोधन आणि संपूर्ण उपचार हेचनिर्णायक आहेत. डीवीटी पासून बचाव मिळवण्यासाठी काही गोष्टींना आपलेसे केले पाहिजे.

सर्व हॉस्पिटल्स मध्ये डीवीटी तपासणीची व्यवस्था करणे. ( deep vein thrombosis )
डीवीटीपासून बचाव करण्यासाठी चांगल्या दवाखान्यामधून माहिती घेणे.
लोकांना डीवीटी ची योग्य ती माहिती देऊन त्यांना यासंबधीच्या बाबतीत योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देणे
रुग्णांना डीवीटीच्या जोखिमांची माहिते देऊन सल्ले दिले पाहिजेत. कारण जास्त त्रासाच्या वेळी ते डीवीटीच्या वेगवेगळ्या पायऱ्यांना ओळखू शकतील.
जास्तीत जास्त मात्रेमध्ये पाणी व फळांचा रस पिणे.
दारू न पिणे
सकाळी लवकर उठणे व जेवढे शक्‍य आहे तेवढे फिरणे.
जेव्हा तुम्ही बसलेला असता तेव्हा प्रयत्न करा की, आपल्या पायांना व आपापल्या पायांच्या बोटांना वरती व खालच्या दिशेने फिरवा.
रक्ताच्या प्रवाहाला सुधारण्यासाठी इलॅस्टिकचा योग्य दबाव असणारे कपडे वापरा.
पायांना मोडून बसण्याचा कमीत कमी प्रयत्न करा आणि जास्त तंग किंवा कसलेले कपडे वापरण्या पासून बचाव करा.

खबरदारी … ( deep vein thrombosis )
जे लोक पहिल्यापासून डीवीटीने ग्रस्त आहेत त्यांनी यांच्या सहन न होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी काही सावधानी बाळगली पाहिजे. शरीरात तयार होणाऱ्या रक्ताच्या गाठी बनण्याच्या प्रक्रिये पासूनसुटका मिळवण्यासाठी रक्त पातळ करण्याच्या औषधी जसे कि एस्परीन एक खूप चांगली गोळी आहे. लांब प्रवास करायच्या अगोदर थोडी ऍस्पिरीन घेतली पाहिजे. यामुळे डीवीटी होण्याची संभावना खूप कमी होते. जेव्हा तुम्ही बसता तेव्हा पायांचा विशिष्ट व्यायाम करणे जसे टाचा फिरवणे, पायाची बोटे हालवणे असे व्यायाम केले गेले पाहिजेत त्यामुळे जेणे करून पायांमध्ये रक्त एकत्र होणार नाही आणि त्यानंतर शरीररात रक्ताचा प्रवाह एकसारखा होत राहील. ऑपरेशननंतर लोकं लगेचच लवकरात लवकर अंथरूण सोडण्यासाठी जागरूक असतात या कारणामुळेसुद्धा लोकांना डीवीटी होण्याची शक्‍यता असते…

डीवीटीच्या निदानासाठी सुरुवातीला नेहमीसाठी इंजेक्‍शनच्याद्वारे हैपरीनची उच्च मात्रा दिली जाते. रुगणाला वारफैरीनची पण औषधे काही महिन्यांसाठी सेवन करण्याचे निर्देश देण्यात येतात. जोपर्यंत ह्या रक्त पातळ करण्याच्या औषधी घेतल्या जातात, तोपर्यंत रुग्णाला आपल्या रक्ताची चाचणी रोज करायलाच लागते, कारण रुग्ण रोज सांगितलेल्या पद्धतीने रोजच्या रोज वेळेवर औषधी घेतो की नाही अथवा हिमोरेजचा धोका तर नाही, हे पहावे लागते.

डीवीटीच्या लक्षणांपासून वाचण्यासाठी वेदनाशामक व त्या स्थानाला उष्णता पोहचवणारी औषधं घेण्यासाठी डॉक्‍टरांकडून सल्ला दिला जातो. त्यानंतर रुग्ण कुठेही जाऊ-येऊ शकतो. तरुणांमध्ये डीवीटीची संभावना खूप कमी असते, ज्यांचे वय 40 पर्यंत असते त्यांना हा आजार सर्वसाधारणपणे होतो. या करता आपल्याला सूचित केले जाते की आपण जर असा विचार करत असाल तर आपणसुद्धा डीवीटीच्या धोक्‍याते असाल तर ताबडतोब तुमच्या डॉक्‍टरांना संपर्क साधा.( deep vein thrombosis )

Tags: aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnews
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar