Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कंबरदुखीचा त्रास दूर करण्यासाठी ‘हे’ आसन कराच

by प्रभात वृत्तसेवा
May 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हे आसन भगवान विष्णुच्या नावाचे आहे. प्रथम शयनस्थिती घ्यावी. डावा हात डोक्‍याच्या दिशेने सरळ ताणावा. मग डाव्या कुशीवर होत उजवा हात छातीजवळ जमिनीवर ठेवावा. उजवा पाय डाव्या पायावर ठेवावा म्हणजेच उजव्या व डाव्या पायांची टाचेवर टाच, पोटरी वर पोटरी, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी अशी स्थिती घ्यावी. डोके, खांदे, मान उचलून डावा हात कोपऱ्यात वाकवून डाव्या कानाखाली, डाव्या तळहाताला आधार द्यावा. 

मग उजवा पाय गुडघ्यात वाकवावा. डाव्या मांडीच्या आतल्या बाजूवर उजवा तळपाय ठेवावा. मग उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडावा आणि उजवा गुडघा डाव्या मांडीवर सरळ उभा करावा. मग गुडघा सरळ करीत उजवा पाय वर आकाशाच्या दिशेने ताणावा. उजव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने पकडावा. ही आसनस्थिती एकदा उजव्या पायाने, एकदा डाव्या पायाने अनुक्रमे घेता येते. एकदा डाव्या कुशीवर एकदा उजव्या कुशीवर होऊन विष्णु आसन करता येते. आसनस्थिती घेतली असता श्‍वसन संथ ठेवावे.

आसन सोडताना उजवा पाय गुडघ्यात वाकवून उजवा तळवा डाव्या मांडीवर ठेवावा. उजवा हात छातीसमोर जमिनीवर ठेवावा. त्याचवेळी उजवा पाय सरळ करावा. जो डाव्या पायावर असेल. डाव्या कानाखालचा आधार काढून डावा हात डोक्‍याच्या दिशेने सरळ घ्यावा. डोके खांदे जमिनीवर ठेवावे. उजवीकडे वळून पाठ बैठका जमिनीवर टेकवावी. डावा हात मांडीजवळ न्यावा आणि शयनस्थिती घ्यावी. असे अनुक्रमे एकदा डावीकडून व एकदा उजवीकडून केलेले आसन सोडता येते.

पाय ताणल्यावर पायाचा अंगठा पकडता येत नसल्यास घोटा पकडावा किंवा पोटरी पकडावी. पोटरीही सापडत नसेल तर सलवारचे टोक पकडावे. परंतु तो पाय वाकवून देऊ नये. आसन कालावधी सुरूवातीला पंधरा सेकंदावरून स्थिरता राखत वाढवता येते. अगदी आठ मिनिटांपर्यंतसुद्धा काही लोक हे आसन करतात. पण आपल्याला झेपेल एवढेच करावे. या आसनामुळे अनेक फायदे होतात. मलाशय, गर्भाशय, मुत्राशय यांचे कार्य सुधारते. अंतर्गळाला प्रतिबंध होतो. त्याचप्रमाणे गुडघे, मांड्या यांच्या मागील शिरा चांगल्या ताणल्या जातात व स्नायूपण ताणल्या गेल्यामुळे मांड्या नितंब यांचा मेद झडतो.

दोन्ही पायांनी आपण हे आसन करतो त्यामुळे रक्‍ताभीसरण सुधारते. शरीर लवचिक होते. तरूण मुलींनी विशेषतः हे आसन जरूर करावे कारण त्यांच्या अवयवाची लवचिकता, नितंबाचा व एकूणच शरीराचा बांधेसूदपणा डौलदार होतो व चौदा वर्षानंतरच्या मुला-मुलींनी हे आसन केल्यामुळे त्यांच्या शरीरातील सर्व अवयवांची योग्य वाढ होते. मात्र ज्यांना सायटिका, मानेचे विकार, स्लिप डिस्क, मणक्‍या विकार असतील त्यांनी विष्णु आसन करू नये. नुकतीच जर कंबरदुखीची सुरुवात असेल हे आसन नियमित केल्यामुळे त्याचा फायदा होतो. कंबरदुखी थांबते.

 

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyablood pressurefitnesshealthआरोग्य जागर
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar