Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

असा करा, तुमच्यातील मानसिक ताणाचा निचरा…

by प्रभात वृत्तसेवा
December 16, 2020
in आरोग्य वार्ता, मानसिक आरोग्य
A A
असा करा, तुमच्यातील मानसिक ताणाचा निचरा…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

ताणाचा निचरा होण्यासाठी प्रभावी मार्ग म्हणजे व्यायाम. मात्र ताण असताना कोणताही व्यायाम करण्यापेक्षा असाच व्यायामप्रकार निवडावा की ज्यामध्ये शरीराच्या अनेक सांध्यांची हालचाल होईल, पण दमछाक होणार नाही.

अशा प्रकारात संथ गतीनं दीर्घकाळ पायी चालणं, संथ गतीनं सायकल चालवणं किंवा संथ गतीने पोहणं, योगासने इ. समावेश होतो. व्यायामात स्नायूंचे आकुंचन-प्रसरण होणं जसं अभिप्रेत असतं तसंच स्नायूंच्या कमाल शक्तीच्या दोनतृतीयांश एवढी शक्ती वापरून स्नायूंचे जे आकुंचन होईल ते सहा सेकंद टिकवून धरणं म्हणजे व्यायाम होय.

ताणाच्या परिस्थितीत स्नायूंचे आकुंचन दीर्घकाळ टिकून राहतं त्यामुळे त्यातं नेहमीएवढं रक्त जाऊ शकतं नाही. शिवाय स्नायूंमध्ये तयार होणारं लॅक्‍टिक ऍसिड रक्तप्रवाहाबरोबर बाहेर न पडल्याने अंगही दुखू लागतं व स्नायूंवर विपरीत परिणाम होतो. ताणाच्या परिस्थितीत होणारे हे विपरीत परिणाम टाळण्यासाठी स्नायूंना पुरेसा प्राणवायू आणि ऊर्जा मिळायला हवी. त्यासाठी स्नायूंची हालचाल म्हणजेच आकुंचन-प्रसरण होण्याची नितांत गरज आहे. म्हणूनच व्यायामाला पर्याय रहात नाही.

दूरपर्यंत पायी फिरायला जाणं हा पण एक ताणाचा निचरा करण्यासाठी उत्तम मार्ग ठरतो. पण या प्रकारात मानसशास्त्रीयदृष्ट्या आणखी एक फायदा होतो तो म्हणजे समस्या निर्माण झालेल्या ठिकाणापासून शरीरदृष्ट्या आपण दूर जातो. अशाप्रकारे दूर गेल्यानंतर आपलं मनही त्या समस्येपासून दूर जातं.

मनासाठी हा बदल आवश्‍यक असतो, गरजेचा असतो. मनाला रंजन हवं असतं. आपण लांब फिरायला गेलो की तेथे वारा वाहत असतो, झाडांची पानं हालत असतात. काही गळत असतात ताणाच्या परिस्थितीपेक्षा हे वातावरण वेगळं असतं. त्यामुळे या बदलाचा मनावर परिणाम होतो आणि ते उल्हासित होतं.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedablood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagarMAHARASHTRAmaharshtraमानसिक ताण
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar