स्वस्तिक हे कल्याणकारी चिन्ह असते. बैठक स्थितीत शरीराची कल्याणकारी स्थिती घेणे म्हणजेच स्वस्तिकासन करणे होय. योगसारामध्ये त्याचे वर्णन आहे ते म्हणजे “समकाय: सुखासिन: स्वस्तिकं तत प्रचक्षते ।’ ( Benefits of Swastikasana )
हे एक बैठकस्थितीतील आसन आहे. प्रथम पाय पसरून बसावे, नंतर उजव्या पायाची टाच ठाव्या जांघेत बसवावी आणि ठाव्या पायाची टाच वरून उजव्या जांघेत बसवावी. मग ताठ बसावे. हाताची ज्ञानमुद्रा ठेवून समोर पाहावे. या आसनात कितीही वेळ स्थिर राहता येते. बैठकस्थिती सोडून प्रथम ठाव्या पायाची टाच उजव्या जांघेत बसवावी आणि ठाव्या पायावरुन उजव्या पायाची टाच ठाव्या जांघेत बसावावी. हात ध्यानमुद्रेत ठेवावी. चित्त एकाग्र होण्यासाठी हे आसन चांगले आहे. खूप श्रमाने पाय दुखत असतील तर या आसनात बसावे त्यामुळे पायातील रुधिराभिसरण चांगले होते. सुरुवातील पंधरा सेकंद बसावे नंतर कालावधी तीन मिनिटांपर्यंत वाढवावा. तीन महिने सतत जर स्वस्तिकासनात बसलात म्हणजे ठाव्या आणि उजव्या बाजूंनी केले तर तुम्हाला कित्येक तास एका ठिकाणी बसण्याची सवय लागेल. पदमासनापेक्षा बसण्यास सोपे हे आसन आहे. ( Benefits of Swastikasana )
स्वस्तिकासनात छाती आणि दंठ सरळ ठेवावेत. मन शांत आणि स्थिर राहाण्यासाठी स्वस्तिकासन प्रभावी आहे. प्रभूभक्तीत रममाण होण्यासाठी, तसेच भजन, कीर्तनसमयी स्वस्तिकासन घालण्याची पद्धत आहे. लहान मुलांच्या मनाची चंचलता या आसनाने दूर होते. करायला सोपे असे हे ध्यानात्मक आसन होय. स्वस्तिकासनामुळे हाता-पायांचे स्नायू मजबूत होतात. चेहऱ्यावर शांतता आणि प्रसन्नता येते कारण एकाग्रतेमुळे मनाचा समतोल राहातो आणि समतोल व्यक्तिमत्त्वाची माणसे नेहमी प्रसन्न असतात. मनातील विचार, विकार, भावनांची वादळं शांत करण्यासाठी सर्वांनी स्वस्तिकासन रोज करावे कारण ते करणे हे सर्वांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी योग्य आहे. ( Benefits of Swastikasana )