पुणे – भारतात तांबडा भोपळा सर्वत्र होतो. चांगली निचरा होणारी जमीन भोपळ्याला अनुुकूल ठरते. भोपळ्याची उन्हाळी व पावसाळी अशी दोन पिके घेतली जातात. भोपळा शीतल, रूचिवर्धक, पित्तशामक, बलदायक, पौष्टिक आहे. भोपळा सर्वदोषनाशक तसेच नाजूक प्रकृतीच्या व उष्ण प्रकृतीच्या लोकांसाठी आरोग्यदायक आहे.
भोपळा पिकून त्याचा वेल सुकू लागेल तेव्हा वेलीवरचे भोपळे तोडावेत. चांगला पिकलेला जुना भोपळा गुणकारी असतो. तो जास्त काळ टिकतो. कच्चा भोपळा विषासमान समजला जातो. त्यामुळे त्याचा भाजीत वापर करू नये.
हृदय विकार कमी होतात : हृदयाला रक्तपुरवठा करणार्यात रक्तवाहिन्यांमध्ये बॅड फॅट्स साचून राहिल्याने हृद्यविकार जडतात. भोपळ्यातील फायबर घटक ब्लॉकेजेस मोकळे करण्यास मदत करतात. तसेच कमी प्रमाणात कॅरोटेनॉईड आहारात घेतल्यास हृद्यविकार वाढतात. त्यामुळे आहारात भोपळा टाळू नका.
– भोपळ्याच्या रसात हिंग व जवखार घालून घेतल्याने मूतखड्याच्या विकारात फायदा होतो.पभोपळ्याच्या बियांचा गर दुधात वाटून गाळून त्यात थोडा मध घालून प्यायल्यास पोटातील चपटे कृमी नाहीसे होतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढते : भोपळ्यामध्ये व्हिटामिन ए, इ, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. चांगल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे संसर्ग दूर ठेवण्यास तसेच वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते. भोपळ्यातील बीटा कॅरोटीन घटकांमुळे दाह कमी होण्यास मदत होते.
पचनमार्ग सुधारतो
कपभर वाफवलेल्या भोपळ्यामुळे नियमित 11% फायबरची गरज पूर्ण होते. त्यामुळे पचनमार्ग आरोग्यदायी राहतो तसेच बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होण्यास मदत होते.भोपळ्याच्या रसात साखर घालून प्यायल्याने आम्लपित्ताचा त्रास दूर होतो.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
भोपळ्यामधून शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटामिन ए चा पुरवठा होतो. कपभर वाफवलेला भोपळा म्हणजे अंदाजे 100 ग्रॅम भोपळ्यातून 245% व्हिटामिन ए ची दैनंदिन गरज पूर्ण होते. तसेच मुबलक बीटा कॅरोटीन मिळते. यामुळे मोतिबिंदू आणि वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या कमजोर होणार्या स्नायूंची समस्या कमी होते.
मधुमेहींसाठी योग्य पर्याय : चवीला गोड असले तरीही भोपळा शरीरात साखरेचे प्रमाण वाढवत नाही. त्यामुळे मधूमेहींबरोबरच इतरांमध्येही रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. म्हणूनच भोपळा आहारात ठेवल्यास इन्सुलिनच्या निर्मितीचे प्रमाण नियंत्रणात राहते. मधुमेह नियंत्रित करणारे ’१०′ रामबाण उपाय
रोगप्रतिकारशक्ती वाढते
भोपळ्यामध्ये व्हिटामिन ए, इ, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. चांगल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे संसर्ग दूर ठेवण्यास तसेच वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते. भोपळ्यातील बीटा कॅरोटीन घटकांमुळे दाह कमी होण्यास मदत होते
वजन घटवते
भोपळ्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात कॅलरीज असतात. 100 ग्रॅम भोपळ्यातून 26 कॅलरीज मिळतात. सोबतच त्यात फायबर असल्याने शरीरात फॅट्स न वाढवता भूकेवर नियंत्रण मिळते.
थकवा कमी होतो : व्यायामादरम्यान जाणवणारा थकवा कमी करण्यास भोपळा मदत करतो. भोपळ्यामुळे रक्तातील लॅक्टीक अॅ सिड आणि अॅ्मोनिया घटक कमी होणयास मदत होते.
तुम्हांला हायड्रेटेड ठेवते : फायबरच्याबरोबरीने भोपळ्यात पाण्याचा अंशदेखील मुबलक असतो. भोपळ्यात 90% पाणी असते. यामुळे भोपळा खाल्ल्याने तुम्ही हायड्रेटेड राहण्यासोबतच रिफ्रेशही राहता.