हे आसन करताना दोन्ही पाय गुडघ्यात दुमडावे. वज्रासनात बसावे. पायाच्या टाचा एकमेकांना चिकटवून त्यावर बसावे. दोन्ही हात कोपरामध्ये दुमडून मनगटावर मनगट ठेवून शरीराच्या पाठीमागे विरुद्ध दिशांनी हात एकमेकांवर ठेवून ते हात पायांच्या अंगठ्याजवळ न्यावेत. जमल्यास अंगठे पकडण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही नाकपुड्यांनी भरपूर श्वास घेऊन श्वासानी छाती भरावी आणि श्वास रोखावा. आपल्या कुवतीनुसार हळूहळू श्वास सोडावा. ( guptasana yoga benefits)
या आसनामुळे हातापायांचे स्नायू मजबूत होतात. दमा असलेल्या लोकांनी हे आसन नियमित केल्यास त्यांना त्याचा फायदा होतो. या आसनामुळे अनेक फायदे होतात. पोट साफ राहते. तसेच रक्तशुद्धी होते. श्वासनलिका शुद्ध होऊन त्यांचे कार्य उत्तम प्रकारे होऊ लागते. शरीर तेजस्वी बनते. ज्यांना शरीरात गाठी झाल्या असतील त्यांनी गाठी दूर करण्यासाठी शरीराला तेलाचे मर्दन करून हे आसन करावे.
यामुळे गाठींचा आजार दूर पळतो. संभोगशक्ती वाढवणारे हे आसन आहे. दोन्ही पाय मजबूत होतात. एखादी व्यक्ती अशक्त असेल तर ती हस्तपादगुप्तासन करून आपली शक्ती वाढवू शकते. या आसनाचा कालावधी पाच ते सात मिनिटे असला तरी सुद्धा सातत्याने हे आसन केले असता फायदा मिळतो.( guptasana yoga benefits)
हे आसन पहिलवानांनी जरूर करावे. ज्यांना आपले शरीर पिळदार, घाटदार करायचे आहे अशा पुरुषांनी हे आसन नियमित करावे. आसन करण्यापूर्वी जर तैलमर्दन केले आणि मग आसन केले तर त्याचा परिणाम चांगला होतो. शरीरामध्ये काहीवेळा अशुद्ध रक्तामुळे गाठी निर्माण होतात त्या गाठी जायला हे आसन मदत करते. त्याचप्रमाणे आसन करताना श्वासाचे तंत्र योग्य हवे. आसनाची आदर्श आवस्था घेतली असता श्वास रोखता आला पाहिजे व ते कुंभक टिकवता आले पाहिजे. बाह्यकुंभकाचा सराव हा योग्यतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करावा. श्वासनलिकेची शुद्धता या आसनाने होते.( guptasana yoga benefits)