Diwali Lakshmi Pujan : सध्या दिवाळीला (Diwali 2023) सुरुवात झाली असून, सगळीकडे आता आनंदाचे आणि मांगल्याचे वातावरण दिसून येत आहे. या सणासुदीच्या काळात लक्ष्मी आणि श्री गणेशाची (ganesh-lakshmi) पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवाळीला पुर्ण नियमांनी लक्ष्मी देवीची पूजा (Lakshmi Pujan) केल्याने याचे शुभफळ संपूर्ण वर्षभर मिळते.
असे करा लक्ष्मीपुजन…
1. दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी घराचा ईशान कोण म्हणजेच पूर्व-उत्तर दिशा निवडा. ही दिशा लक्ष्मी पूजनासाठी खुप खास मानली जाते.
2. देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी पूजा बेडरुम किंवा किचन रुम बिल्कुल नसावी.
3. पूजा कक्षाच्या भींती आणि फरशीचा रंग पांढरा, पिवळा किंवा फिकट नीळा खुप शुभ मानला जातो. असे नसल्यास या जागी या रंगाचा कपडा अंथरुन देखील पूजा करता येते.
4. पूजन कक्षात हवन कुंड आग्नेय कोण म्हणजेच पूर्व-दक्षिण दिशेला असावे.
5. पूजा करण्याची व्यवस्था अशी करा की, पूजा करताना कुटूंबातील लोकांचे मूख पूर्व उत्तर दिशेला असेल.
6. पूजा घरात युध्द किंवा पशु पक्षांचे चित्र लावणे वास्तुसाठी शुभ मानले जात नाही.
7. पूजेच्या वेळी डस्टबीन घराच्या ईशान कोण म्हणजेच पूर्व-उत्तर दिशेला किंवा पूजाकक्षाच्या आजूबाजूला असु नये.
8. देवी लक्ष्मीची मूर्ति स्थापित करण्याअगोदर त्या ठिकाणी झाडून-पुसून घ्यावे आणि त्या जागेवर कुंकवाने स्वस्तिक काढावे, त्यावर लक्ष्मी देवीची मूर्ति स्थापित करावी.
पूजेवेळी लक्ष्मीला काय अर्पण करावे…
– गृहस्थ कमळ, पांढरे फूल पूर्व
– शेतकरी पंचखाद्याचा नैवेद्य पश्चिम
– व्यापारी कमलाक्ष(कमलगट्टा)माळ पूर्वोत्तर
– विद्यार्थी धर्मग्रंथ, डाळिंब, तीळ उत्तर
– उद्योगपती कमलाक्ष(कमलगट्टा)माळ पश्चिम
लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त असे…
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजनाचा उत्सव साजरा होतो. यंदा उद्या (दि. १२) लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) घरोघरी केले जाणार आहे. पंचांगाच्या आधारानुसार लक्ष्मीपूजनासाठी (Lakshmi Pujan) सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त आहेत.
– सकाळी ८.२० ते १२.५० (चंचल, लाभ, अमृत)
– दुपारी १.२० ते २.५० (शुभ )
– सायंकाळी : ६.५० ते ११.२० (शुभ , अमृत , चंचल)
The post Diwali Lakshmi Pujan : लक्ष्मीपूजन कसे करावे? लक्ष्मी पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त वाचा…. appeared first on Dainik Prabhat.