Diwali Lakshmi Pujan : सध्या दिवाळीला (Diwali 2023) सुरुवात झाली असून, सगळीकडे आता आनंदाचे आणि मांगल्याचे वातावरण दिसून येत आहे. या सणासुदीच्या काळात लक्ष्मी आणि श्री गणेशाची (ganesh-lakshmi) पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवाळीला पुर्ण नियमांनी लक्ष्मी देवीची पूजा (Lakshmi Pujan) केल्याने याचे शुभफळ संपूर्ण वर्षभर मिळते. यासाठी मुहूर्त पाहून लक्ष्मी पूजा करणे गरजेचे असते.
यंदा उद्या म्हणजेच रविवारी (दि. १२) नरक चतुर्दशी आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटेच्या वेळी चंद्रोदय मुहूर्तावर म्हणजे ५.३३ वाजता तीळ व तेल आदी औषधी द्रव्यांच्या सहाय्याने अभ्यंग स्नान करून नरकरूपी पापवासना व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. तर याच दिवशी लक्ष्मीपूजन साजरे होते आहे.
लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त असे :
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजनाचा उत्सव साजरा होतो. यंदा उद्या (दि. १२) लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) घरोघरी केले जाणार आहे. पंचांगाच्या आधारानुसार लक्ष्मीपूजनासाठी (Lakshmi Pujan) सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त आहेत.
– सकाळी ८.२० ते १२.५० (चंचल, लाभ, अमृत)
– दुपारी १.२० ते २.५० (शुभ )
– सायंकाळी : ६.५० ते ११.२० (शुभ , अमृत , चंचल)
The post Diwali Lakshmi Pujan : उद्या कोणत्या शुभ मुहूर्तावर करावे लक्ष्मीपूजन? जाणून घ्या, शुभ मुहुर्ताची वेळ appeared first on Dainik Prabhat.