Tuesday, September 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Dinner Tips: रात्रीच्या जेवणातील ही एक चूक वाढवू शकते वजन आणि आजारांचा धोका; जाणून घ्या डिनरची योग्य वेळ

by
June 8, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Dinner Tips: नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे तिन्ही आहार आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. अनेकजण वजन कमी करण्यासाठी किंवा व्यस्त दिनचर्येमुळे रात्रीचे जेवण टाळतात, मात्र तज्ज्ञांच्या मते कोणतेही जेवण वगळणे आरोग्यासाठी योग्य नाही. शरीराला आवश्यक असलेल्या उष्मांकांसह विविध पोषक घटक मिळण्यासाठी दिवसातील सर्व जेवणे योग्य वेळी घेणे गरजेचे असते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीराचे चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम योग्य ठेवण्यासाठी जेवणाच्या वेळेचे विशेष महत्त्व आहे. आपण शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळानुसार आहार घेतल्यास त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. विशेषतः रात्रीचे जेवण योग्य वेळी घेतल्यास अनेक आरोग्यविषयक समस्या टाळता येऊ शकतात.

अभ्यासानुसार, वेळेवर रात्रीचे जेवण केल्याने टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. तसेच रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय वजन नियंत्रण, चांगले पचन, शरीरातील ऊर्जा टिकून राहणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढणे आणि चयापचय सुधारण्यासही मदत होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फक्त काय खातो यापेक्षा ते कोणत्या वेळी खातो हेही तितकेच महत्त्वाचे असते.  (Dinner Tips)

आजकाल अनेक लोक सकाळच्या धावपळीमुळे नाश्ता व्यवस्थित करत नाहीत. काहीजण दुपारच्या जेवणातही हलका आहार घेतात आणि दिवसातील सर्वात मोठे जेवण रात्री करतात. हीच सर्वात मोठी चूक मानली जाते. कारण रात्रीच्या वेळी शरीराची पचनक्रिया तुलनेने मंदावलेली असते. अशा वेळी जड आणि भरपूर प्रमाणातील अन्न खाल्ल्यास ते व्यवस्थित पचत नाही. परिणामी वजन वाढणे, अॅसिडिटी, अपचन आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.  Dinner Tips

तज्ज्ञांच्या मते, दिवसातील सर्वात भरपूर आणि पौष्टिक जेवण दुपारचे असावे. त्या वेळी पचनसंस्था अधिक सक्रिय असते. रात्रीचे जेवण मात्र हलके आणि मर्यादित प्रमाणात असावे. त्यामुळे शरीराला अन्न पचविणे सोपे जाते आणि झोपही चांगली लागते.

डिनरच्या योग्य वेळेबाबत अनेक मतभेद आढळतात. काही लोक सूर्यास्तापूर्वी जेवण्याचा सल्ला देतात, तर काहीजण रात्रीचे जेवण टाळण्याचा सल्ला देतात. मात्र प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली वेगळी असल्याने योग्य वेळ ठरवताना स्वतःची दिनचर्या लक्षात घेणे आवश्यक आहे.  (Dinner Tips)

सामान्यतः रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये किमान तीन तासांचे अंतर असावे. त्यामुळे शक्यतो रात्री ८ वाजण्यापूर्वी जेवण करणे फायदेशीर मानले जाते. उशिरा जेवण केल्यास किंवा जेवणानंतर लगेच झोपल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. तसेच रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यास पुन्हा भूक लागते आणि अतिरिक्त खाल्लेले अन्न शरीरात चरबीच्या स्वरूपात साठण्याची शक्यता वाढते.  (Dinner Tips)

रात्रीच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि तंतुमय पदार्थ यांचा समतोल असणे आवश्यक आहे. झोपताना पोटाशी संबंधित त्रास होऊ नये यासाठी तेलकट आणि जास्त मसालेदार पदार्थ टाळावेत. पोळी, डाळ, भाजी, खिचडी, ओट्स, बेसन चिल्ला, ब्राऊन राईस पुलाव, दही किंवा रायता यांसारखे पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी चांगले पर्याय मानले जातात. मात्र त्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात रात्रीचे जेवण केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि पचनाच्या अनेक समस्या टाळता येतात. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी रात्रीच्या जेवणाची वेळ आणि गुणवत्ता याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar