आज आपण आजूबाजूला पाहिलं तर समाजात वाढत असलेल्या स्थूलता या आजाराचे प्रमाण लगेचच लक्षात येते. जसे जसे या आजाराचे प्रमाण वाढते आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात या आजाराविषयी गैरसमज किंवा अज्ञान पसरले आहे. खरंतर गैरसमज दूर केल्यास या आजारावर मात करणे सहज शक्य आहे. दुर्दैवाने या अज्ञानावर आधारित फार मोठया व्यवसायांची उभारणी करण्यात आली आहे.
मोठमोठ्या खाद्य आणि औषध कंपन्या यामध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये देशी आणि विदेशी सर्वच प्रकारच्या कंपन्या सापडतील. या कंपन्यांना समाजाच्या आरोग्यासाठी बांधिलकी मानण्याचे कारण नाही. हरएक प्रयत्नाने आपला माल विकून नफा कमविणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. समाजाचे आरोग्य हे त्यांचे उद्दिष्ट नाही.
व्यावसायिकांच्या जाहिरातींच्या भडीमारामुळे सामान्य माणूस चुकीच्या दिशेने ओढला जात आहे. यामुळेच बाजारात कितीतरी प्रकारच्या खाद्यपदार्थ, गोळ्या, पावडर, मलम, तेल, जडीबुटी, यंत्रे, पट्टे, काढे, रस, शस्रक्रिया तुम्हाला सापडतील. दुर्दैवाने सामान्य माणूस या जाहिरात गदारोळात हरवून जातो, आणि नेमका नको त्या मार्गाने जातो. या सर्व प्रकारच्या उपचारात अपयश नक्की असते. याउलट जीवनशैली सुधारण्यासाठी कुठलाही खर्च नसतो आणि दीर्घकाळ यश नक्की असते.
या क्षेत्रात योग्य माहिती / ज्ञान यांचा प्रसार आणि प्रचार अत्यंत गरजेचा आहे.
1 – जास्त कॅलरी खाल्याने वजन वाढते कमी कॅलरी खाल्याने वजन कमी होते.
एखादा जाडा माणूस कधी वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी गेला तर लगेचच त्याला कॅलरी प्रमाण मानून त्यानुसार सल्ला दिला जातो. त्यामुळे इतक्या कॅलरी खा आणि इतक्या कॅलरीचा व्यायाम करा अशा प्रकारे सल्ला दिला जातो.
थोडक्यात कमी खाणे आणि जास्त व्यायाम करणे – शरीं श्रशीी रपवर् ीोंश ीोश – आणि सर्वांचाच अनुभव सांगतो की अशा प्रकारे अपयश नक्की !!
वस्तुतः शरीरात कॅलरी मोजण्याची कुठलीही यंत्रणा- ीशपीीीे – नाही. थोडक्यात शरीर कॅलरी मोजत नाही आणि मोजू शकत नाही. त्यामुळे आपणही कॅलरी नाही मोजल्या तरी चालते. निरोगी राहण्यासाठी आपण शरीराची भाषा वापरली पाहिजे.
कॅलरी हे फिजिक्स मधील युनिट आहे बायोलॉजिमधील नाही हे आपण विसरता कामा नये. शारीरिक क्रिया हॉर्मोन्स द्वारे नियंत्रित केल्या जातात. हॉर्मोन्स हीच शारीरिक भाषा आहे. माणसाने खाल्लेल्या अन्न पदार्थांचे काय करायचे हे शरीरातील हॉर्मोन्स ठरवितात. कुठलेही अन्न खाल्ल्याने शरीरात – पॅनक्रियाज – इन्सुलिन तयार केले जाते. इन्सुलिन हे अत्यंत प्रभावी हॉर्मोन्स असते. या हॉर्मोन्स नुसार खाल्लेले अन्न, कॅलरीज साठवायचे की वापरायचे हे ठरविले जाते.
रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण अधिक असल्यास प्रामुख्याने कॅलरी साठविले जातात आणि इन्सुलिनचे प्रमाण कमी असल्यास कॅलरी वापरल्या जातात.
100 कॅलरी साखर, 100 कॅलरी बिस्किट, 100 कॅलरी केळी, 100 कॅलरी मेथीची भाजी या सर्व पदार्थामध्ये कॅलरी जरी सारख्याच असल्या तरी त्यामुळे शारीरिक हॉर्मोन्स प्रतिसाद पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारचा असतो. यामुळे त्याचा वजनावर वेगवेगळा परीणाम होतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी रक्तातील इन्सुलिन कमी ठेवणे गरजेचे आहे. सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ खाल्ल्याने कमी अधिक प्रमाणात इन्सुलिन तयार केले जाते.
साधारणपणे पिष्टमय पदार्थ खाल्ल्याने इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार केले जाते आणि वजन वाढते. याउलट स्निग्ध पदार्थ खाल्ल्याने पोटात कॅलरी जास्त गेल्या तरीही कमी इन्सुलिन तयार होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
सत्य – ज्या पदार्थाने शरीरात इन्सुलिन वाढते त्याने वजन वाढते. उदा. बेकरी, सर्व प्रकारची बिस्कीट आणि इतर तयार, प्रोसेस केलेले खाद्यपदार्थ, कोल्ड्रिंक्स, फळांचे रस, चॉकलेट, आईसक्रीम, जॅम, जेली, नूडल्स, वेफर्स, साखर, गूळ,मैदा, भात, बटाटा, साबुदाणा इ. दुधात घ्यावयाच्या पावडर इ.
व्यायाम केल्यानंतर काहीही खाल्लं तरी वजन कमी होईल.
शारीरिक हालचाल किंवा कष्ट हा आरोग्यासाठी आवश्यक घटक आहे. सर्वासाठी नियमित व्यायाम/कष्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींनी क्षमतेनुसार शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे. हृदय, मेंदू, सांधे त्वचा, रक्तवाहिन्या, स्नायू, हाडे, झोप, विचार, या सर्व घटकावर व्यायाम उपकारक आहे. पण वजन कमी करण्यासाठी व्यायाम फारसा उपयुक्त ठरत नाही. आपण सर्वाना आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती दिसतील की ज्यांचे चालणे, सायकल, पोहणे, जिम इ करूनही वजन कमी होत नाही.
त्याची काही शास्त्रीय कारणे-
व्यायाम केल्यानंतर इतर वेळेस माणूस जास्त आराम करतो. आपल्याही सहज लक्षात येते की, व्यायामानंतर जास्त वेळ आराम केला जातो. एका शास्त्रीय संशोधनानुसार, शाळेत खेळणारी मुले घरी आराम करतात आणि त्याउलट शाळेत न खेळणारी मुले घरी जास्त प्रमाणात खेळतात.
व्यायामानंतर भूक जास्त लागते. शारीरिक प्रक्रियेद्वारे भूक जास्त लागते आणि परिणामी व्यक्ती जास्त प्रमाणात खाते. बहुतेक लोक व्यायाम हा उपचार म्हणून काही कालावधीसाठी करतात त्यामुळे व्यायामात जास्त काळ सातत्य रहात नाही. खरे तर व्यायाम हा जीवनशैलीचा भाग आहे. त्यामुळे तो आयुष्यभर आवश्यक असतो.
बहुतेक लोक कमी तीव्रता असलेला – श्रुे ळपींशपीळीूं – लवकर दम न लागणारे व्यायाम निवडतात.उदा. योगासने, प्राणायाम, चालणे, सायकल, पोहणे इ.
वजन कमी करण्यासाठी- हळसह ळपींशपीळीूं – लवकर दम लागणारे – जास्त तीव्रता असलेले व्यायाम निवडावेत – उदा. जिम, पळणे, जिना चढणे, उड्या मारणे इ. प्रत्येकाने आपल्या आवडीचा व्यायाम प्रकार निवडावा. ठराविक काळाने त्यामधे तीव्रता वाढवत नेणे योग्य आहे.
आहार नियोजन योग्य प्रकारे नसेल तर फक्त व्यायामाने वजन कमी होणे फार अवघड आहे.
सत्य – योग्य आहाराबरोबर व्यायाम करणे योग्य. म्हणजे 30% व्यायाम, झोप, तणाव आणि 70% आहार.
जास्त वेळा थोडे थोडे खाल्ल्याने वजन कमी होते.
खरे तर ज्या ज्या वेळी आपण खातो त्या वेळी शरीरात इन्सुलिन तयार केले जाते. इन्सुलिनचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे कॅलरी साठवून ठेवणे. जर आपण 6 ते 7 वेळा खाल्ले तर ही प्रक्रिया 6 ते 7 वेळा पार पाडली जाते. त्यामुळे वजन वाढण्यास मदतच होते.
या सल्ल्यानुसार जास्त वेळा खाल्ल्याने शारीरिक बदलामुळे बॉडी-मास-इंडेक्स वाढतो आणि वजन कमी होते, असा तर्क आहे. शास्त्रीय संशोधन तपासले तर या तर्काला समर्थन सापडत नाही. भूक लागली नसेल तर नाही खाल्ले तरी योग्य. जेवणाची वेळ आहे म्हणून खाण्याचे काहीही करण नाही. जरा आठवून पहा मंडळी आपल्याला कडकडून भूक कधी लागली होती?
भूक लागली तरच जेवण करावे. बऱ्याचदा आपण जेवणाची वेळ झाली किंवा, खाद्यपदार्थ डोळ्यासमोर आहे किंवा आपल्या आवडीचा पदार्थ आहे किंवा दुसरा कोणीतरी खातोय म्हणून खातो. खरेतर आपल्याला भूक लागलेली नसते. हा अतिरेक टाळणे केव्हाही योग्यच.
जेवताना पोटभर जेवावे. अधेमधे खाणे पूर्णपणे टाळावे. सामान्य माणसाला दिवसात दोन वेळा जेवण केले तरी पुरे. हाय इंटेनसिटी व्यायाम/ कष्ट असेल तर 3 वेळा जेवण्याची गरज भासू शकते.
सत्य – जास्त वेळा खाणे होते पण कमी खाणे होत नाही. असा आहार काही विशेष परिस्थितीत
योग्य – लहान मुले, गरोदर माता, आजारी व्यक्ती इ. साठी योग्य
कमी कॅलरीज खाल्याने वजन कमी होते. सर्वात मोठा गैरसमज. वजन म्हणजे खाल्लेल्या कॅलरी वजा वापरलेल्या कॅलरी याला “कॅलरी थिअरी’ म्हणतात. बेरीज वजाबाकीच्या पद्धतीने सांगितल्याने ही गोष्ट लगेचच समजावून सांगणे सोपे जाते. या थिअरीमध्ये शारीरिक प्रक्रिया दुर्लक्षित केली जाते. म्हणजे असे की, समजा एका 70 किलो वजनाच्या पुरुषाला दिवसाला साधारणपणे 2000 कॅलरी घेण्याची गरज असते. त्याचे वजन जास्त असेल तर त्याला सल्ला देतात की 1600 कॅलरी खा; म्हणजे वजन कमी होईल.
यामध्ये होतं काय की, जेंव्हा तो 1600 कॅलरी खायला सुरुवात करतो तेव्हा त्याचे शरीर आपल्या सर्व अनावश्यक क्रिया मंदावते.
उदा. केस गळणे सुरू होते; नखे कमकुवत होतात, शारीरिक तापमान कमी होते; थंडी वाजू लागते; उत्साह कमी वाटतो; आळसावल्यासारखे वाटते; शारीरिक हालचाली मंदावत जातात; झोप जास्त येते यासारख्या शारीरिक बदलामुळे शरीर 1600 कॅलरी वापरते. त्यामुळे वजन कमी होत नाही. ज्या लोकांनी अशा पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना विचारले तर हाच अनुभव ऐकायला मिळतो.
सत्य – कमी खाल्ल्याने शरीर मंदावते. कमी होतो त्यामुळे वजन कमी होत नाही.
डॉ. चंद्रकांत कणसे