सध्या स्मुदीजची मोठी चलती आहे. तरुणाईसोबतच आहाराबद्दल सजग असलेल्यांना या पदार्थाचे आकर्षण असल्याचे दिसते. एक पिढी वेगाने पुढे जात असताना हे एक फॅड त्यांना लागलेले आहे. लोकांना झटपट, पटापट आणि सो कॉल्ड हेल्दी ऑप्शन पाहिजे असतो. त्यांची स्मार्ट फूड आणि पोषक पदार्थाना पसंती असते.
एका चांगल्या स्मुदीमध्ये शक्तिवर्धक तीन ते पाच पदार्थ किंवा पोषक घटकांचा समावेश असतो. भाज्या किंवा फळांसमवेत प्रोटिन किंवा बोरं, अळशी, सब्जासारख्या अॅन्टी-ऑक्सिडंट्ससोबत भाज्या असे मिश्रण असू शकते. ओट्स आणि तिळाप्रमाणे जटिल काबरेहायड्रटसचा समावेश करता येतो. त्यामुळे अशा घटकांचे कमी प्रमाणही आहाराला संपूर्ण बनवते.
स्मुदीजचे फायदे
1. स्मुदीज हे घट्ट आणि मिश्रित पेय असून कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना ते अत्यंत सुलभतेने गिळता येते.
2. शरीराला गरजेची असलेले पोषकद्रव्ये पुरवण्यासाठी ते मदत करते.
3. भूक शमवते.
4. प्रवासामध्ये सोबत नेण्यासाठी अत्यंत सोयीचे आहे.
ज्या व्यक्तींना अन्नपदार्थावर प्रयोग करायला आवडतात, ते स्मुदीजपासून विविध प्रकारचे अन्नपदार्थ, चवी, विविध रंग वापरून किंवा त्यांतील पोषक पदार्थाचे विविध प्रयोग करू शकतात.
1. स्मुदीजची पौष्टिकता वाढवण्यासाठी तुम्ही यातील अंतर्गत पदार्थामध्ये बदल किंवा वाढही करू शकता.
2. स्मुदीजमध्ये वापरण्यात येणा-या खाद्यपदार्थामुळे तसेच, त्यांच्या मिश्रणामुळे स्मुदीजमध्ये पोषणमूल्ये मोठय़ा प्रमाणात आढळतात.
3. स्मुदीजमध्ये अक्रोड व बियांच्या वापरामुळे मेदाम्ले, जीवनसत्त्वे आणि अॅन्टी-ऑक्सिडंट्सची वाढ होण्यास मदत होते.
4. पनिरजल प्रथिने, सोया दूध, दही यांसारखे जैविक प्रथिनेयुक्त घटक आपली प्रतिकारशक्ती वाढवतात, तसेच त्वचेचा पोत व केस सुधारण्यास मदत करतात.
5. लिंबूवर्गीय फळं / बोरं, संत्रे यांसारखी अॅन्टी-ऑक्सिडंट्सयुक्त फळांमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, तसेच वाढत्या वयासोबत येणा-या आरोग्याच्या समस्याही दूर होतात.
6. आपल्याला साधारणत: जेवणात वापरण्यासाठी कठीण वाटणा-या विविधरंगी भाज्यांमुळे डिस्लिपिडेमियासारखा आजार रोखता येतो.
स्मुदीज कधी घ्याव्यात?
स्मुदीज घेण्याची उत्तम वेळ म्हणजे आहाराच्या मधल्या वेळी. साधारणपणे एखाद्याने आहार घेतला नाही किंवा व्यायामानंतर भूक लागल्यावर हा आहार प्रकार कमाल पोषण पुरवतो. अनेकांना नाश्ता म्हणून हा प्रकार योग्य वाटतो. दिवसातला पहिला-वहिला आहार म्हणूनही हा पर्याय योग्य आहे.
स्मुदीज तयार करताना काय काळजी घ्यावी?
1. स्मुदीजची खरेदी करताना किंवा बनवताना काळजी घ्यावी. त्यासाठी वापरण्यात येणारे ब्लेंडर हे स्वच्छ असावेत. अन्यथा पदार्थ दूषित होण्याचा धोका वाढू शकतो. हे तयार झाल्यांनतर दीर्घकाळ, अगदी तासभर ठेवल्यास त्यातील पोषक मूल्यांचा ऱ्हास होतो. दीर्घकाळ, दोन तासांपेक्षा जास्त काळ वेगळ्या तापमानात ठेवल्यास त्याचे सेवन असुरक्षित ठरू शकते. व्यावसायिकदृष्टय़ा विकण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्मुदीज पोषणाची गरज भरून काढू शकत नाही. यात मोठय़ा प्रमाणात कॅलरीज असतात, प्रोटिन कमी असते. एखाद्या प्रसंगी अॅलर्जी झाल्यास एखाद्याने मिश्रण तयार करण्याकरिता वापरलेले घटक पदार्थ लेबलवर वाचावेत. तसेच त्यात समाविष्ट इतर साहित्यही तपासून पाहावे.
स्मुदीची काही मिश्रणे
1. ओट्स-सोया-स्ट्रॉबेरी-सोया मिल्कसोबत मिसळून
2. हिरव्या पालेभाज्या-दही-अळशी आणि आलं
3. गाजर-संत्रे-किलगडाच्या बिया-नारळ पाण्यातून.
4. ताजे घटक वापरा-चिरल्यावर धुऊ नका किंवा साठवणूक करून ठेवू नका. त्यातील पोषण आणि फायदे नष्ट होतात.
5. स्मुदीज बनवण्यासाठी सुचवलेली पद्धत-स्मुदी हा ब्लेंड केलेला झटपट असा घट्ट द्राव असतो. त्यामुळे अगदी पटापट गिळू नये. उलट ते हळूहळू प्यावे!