Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी कसा होईल?

by प्रभात वृत्तसेवा
December 2, 2020
in आरोग्य वार्ता, आहार
A A
ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी कसा होईल?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आहारातील काही घटक ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासही मदत करतात. स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) हा महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात दिसून येणारा कर्करोग आहे. असे लक्षात आले आहे की साधारण एक तृतियांश महिलांमध्ये होणारा ब्रेस्ट कॅन्सर हा त्यांच्या जीवनशैलीशी संबंधित असतो. जीवनशैली म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो आपला आहार. आहार आणि ब्रेस्ट कॅन्सर यातील परस्परसंबंध तपासून पहाण्यासाठी जगभर खूप संशोधन सुरू आहे. अजून कोणतेही ठोस निष्कर्ष जरी समोर आले नसले तरी आहारातील काही घटक ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतात तर काही घटक हा धोका कमी करतात अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. या घटकांबाबतची माहिती आपण घेऊया.

चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ
ओमेगा- प्रकारची मेदाम्ले – विशेषतः अल्फा लिनोलेनिक ऍसिड (ALA) ब्रेस्ट कॅन्सरचा प्रतिबंध करू शकते. यासाठी तेलबियांपेक्षा किवी, पालक, टोमॅटो, मटार अशा फळे आणि भाज्यांमधून मिळणारे ALA जास्त उपयुक्त असते असेही लक्षात आले आहे. मांसाहारी व्यक्तींना मासे खाऊन त्यातून मिळणारे स्निग्ध पदार्थ (EPA आणि DHA) देखील ब्रेस्ट कॅन्सरचा प्रतिबंध करणारे आहेत.

तंतूमय पदार्थ
आपल्या आहारात तंतूमय पदार्थांना अनन्यसाधारण महत्व आहे. ब्रेस्ट कॅन्सरबरोबरच कॅन्सरच्या इतर काही प्रकारांचाही तंतूमय पदार्थ प्रतिबंध करू शकतात अशी शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. असे आढळले आहे की आहारात 20 ग्रॅम तंतूमय पदार्थ वाढवले तर ब्रेस्ट कॅन्सरची शक्‍यता 35% नी कमी होते. बेरी वर्गातील फळांमधील (स्ट्रॉबेरी, तुती, करवंद, जांभूळ, क्रॅनबेरी इ.) तंतूमय पदार्थ अधिक फायदेशीर आहेत असेही दिसून आले आहे.

ड जीवनसत्व
ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रतिबंधाबरोबरच ब्रेस्ट कॅन्सर झाला असताना तो पसरू न देऊन ड जीवनसत्व दुहेरी भूमिका बजावते. असे लक्षात आले आहे की रक्तातील दर 1 mg/ml ड जीवनसत्व वाढल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची शक्‍यता साधारण 40% नी कमी होऊ शकते. ड जीवनसत्व आहारात फक्त मांसाहारी पदार्थातून थोड्या प्रमाणात मिळते. उन्हामध्ये आपल्या त्वचेखाली ड जीवनसत्व तयार होते. त्यामुळे दररोज किमान 10 ते 15 मिनिटे आपल्या जास्तीत जास्त त्वचेवर सूर्यकिरणे घेणे चांगले आहे (खूप कोवळे / प्रखर ऊन नको, मध्यम प्रखर ऊन घ्यावे). आपल्या रक्तातील ड जीवनसत्वाची पातळी तपासून पाहून गरज असल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार घेणेही श्रेयस्कर!

अ जीवनसत्व
अ जीवनसत्व हे ऍन्टिऑक्‍सिडंटचे काम करून शरीरातील विषारी घटक नष्ट करते. याच गुणधर्माचा वापर ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी होऊ शकतो. अ जीवनसत्व मिळण्यासाठी आहारात लाल-पिवळ्या भाज्या व फळे (गाजर, लाल भोपळा, पपई, आंबा, पीच, टोमॅटो, रताळी) आणि पालेभाज्यांचा समावेश करायला हवा.

फोलिक ऍसिड
आहारात पुरेसे फोलिक ऍसिड घेणे ब्रेस्ट कॅन्सरला दूर ठेवू शकते. सर्व पालेभाज्या, भेंडी, गाजर, बीट, फ्लॉवर, मटार, बीन्सवर्गीय भाज्या, लिंबूवर्गीय फळे यांमधून फोलिक ऍसिड मिळते. याऊलट गरज नसताना सप्लीमेंट्‌सद्वारे घेतलेले फोलिक ऍसिड त्रासदायक ठरून ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवू शकते! आपल्या मनाने सप्लीमेंट्‌स घेण्याचे सर्वांनीच व विशेषतः रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांनी टाळायला हवे.

फायटोइस्ट्रोजेन
फायटोइस्ट्रोजेन हा इस्ट्रोजेन हर्मोनसारखा घटक मुख्यत्वे करून सोयाबिनमध्ये असतो. या घटकामुळे रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांमधील ब्रेस्ट कॅन्सर टाळता येऊ शकतो असे समोर येत आहे. त्यामुळे अशा स्त्रियांनी सेंद्रिय सोयाबिनचा आहारात समावेश करायला हरकत नाही.

सारांश सांगायचा झाला, तर अजूनही ब्रेस्ट कॅन्सर होण्यामधील / टाळण्यामधील आहाराची अचूक भूमिका स्पष्ट झाली नाही; पण आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार आहारातील काही घटक ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवू शकतात तर काही कमी करू शकतात असे लक्षात आले आहे. आहारातून मद्य, जास्त तापमानावर शिजवलेले मांस, संपृक्त स्निग्ध पदार्थ, कॅफेन, साखरयुक्त पेये वर्ज्य करणे आणि चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ, तंतूमय पदार्थ (ताजी फळे, भाज्या), अ व ड जीवनसत्वयुक्त पदार्थांचा समावेश करणे ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी मदत करू शकते. कोणतीही सप्लिमेंट्‌स घेण्यापूर्वी आहारतज्ञांचा आणि डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आणि दिलेली सप्लिमेंट्‌स सांगितलेल्या काळापुरतीच घेणे अतिशय महत्वाचे आहे. सर्वात महत्वाचे – आपले वजन आटोक्‍यात ठेवणे! हे फक्त ब्रेस्ट कॅन्सरचाच नव्हे तर इतर अनेक आजारांचा प्रतिबंध करण्यास तुम्हाला मदत करेल!!

Tags: breats cancerdietvitamin b-12
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar