समाजात आणि वैद्यकीय क्षेत्रात सर्वांत जास्त बोलबाला असलेला समज म्हणजे “डायट हार्ट हायपोथेसिस’. या समजुतीचे सर्व वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण आणि व्यवसाय यावर अधिराज्य आहे. या समजुतीवर आधारित प्रचंड मोठी औषध प्रणाली विकसित करण्यात आली आहे, ज्यानुसार रुग्णाला औषधे लिहून दिली जातात. या कल्पनेवर आधारित डॉक्टर आणि रूग्ण यांची सेवा चालत आली आहे.
पाहुयात तर खरे काय आहे हा प्रकार?
जरा समजून तर घेऊयात, नक्की काय आहे हे?
हे हायपोथॅसिस काय सांगते ?
या हायपोथॅसिस- गृहितानुसार
1 अन्नातील कोलेस्टेरॉल / सॅच्युरेटेड फॅटमुळे रक्तातील कोलेस्टेरॉल वाढते.
2 रक्तातील वाढलेल्या कोलेस्टेरॉल मुळे हृदय विकाराचा धोका वाढतो.
या समजुतीमुळे जगभरातील डॉक्टर आपल्या रुग्णाला सल्ला देतात की –
3 कोलेस्टेरॉल ही आरोग्यासाठी धोकादायक बाब आहे आणि त्यामुळेच कोलेस्टेरॉलची रक्तातील पातळी कमीतकमी असणे योग्य आहे. त्यामुळे पेशंटने अंड्याचा पिवळा भाग, तूप, मटण, इतर मांसाहार, खोबरे, शेंगदाणे इत्यादी पदार्थ खाणे टाळावे.
4 स्टॅटिन आणि तत्सम औषधे वापरल्याने कोलेस्टेरॉल कमी होते आणि हृदय विकाराचा धोका कमी होतो. सर्व डायबेटीस आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांनी ह्या गोळ्या आयुष्यभर घेतल्याच पाहिजेत.
जगातील सर्वच देशातील – भारतासहित – वैद्यकीय आणि आरोग्य संघटना या समजुतीवर आधारित उपाय योजना करत आहेत.
आता आपण या समजुतीच्या इतिहासात पाहुयात म्हणजे ही समजूत कशी प्रचलित झाली, हे कळणे सोपे होईल.
या हायपोथॅसिसची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी-
प डॉ. अन्सल केज ह्या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत पहिल्यांदा वर्ष 1950 मध्ये मांडला. त्यासाठी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधनाला “सेव्हन कंट्री स्टडी’ असे संबोधले जाते. खरेतर या मध्ये 20 देशांचा समावेश होता, 13 देशातील न जुळणारी माहिती काढून टाकण्यात आली. सात विविध देशामध्ये केलेल्या संशोधनानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की अन्नातील खाद्य पदार्थ आणि हृदय विकारामुळे होणारे मृत्यू यांचा सरळ संबंध आहे. थोडक्यात – स्निग्ध पदार्थ जास्त खाणाऱ्या माणसांमध्ये हृदय विकाराने मृत्यू होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.
प या संशोधनावर आधारित एक समिती नेमली गेली – पोषण आणि मानवी गरजा याविषयी संसद सदस्य जॉर्ज मॉक्गोव्हर्न यांच्या अध्यक्षतेखाली वर्ष 1977 मध्ये अमेरिकन संसद सदस्यांची ही समिती नेमण्यात आली. समितीने संपूर्ण अमेरिकेत लोकांना खाण्याविषयी मार्गदर्शक तत्वे सांगितली. त्याला “राष्ट्रीय आहार मार्गदर्शिका’ असे संबोधिले जाते. त्यानुसार…
1 दररोजच्या जेवणात पिष्टमय पदार्थाचे प्रमाण एकूण कॅलरीजच्या 55 ते 60 टक्के असावे
2दररोजच्या जेवणातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण एकूण कॅलरीच्या 30 टक्के पेक्षा कमी असावे.
3अन्नातील सॅच्यरेटेड फॅटचे प्रमाण एकूण कॅलरीच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी असावे. उरलेल्या 20% स्निग्ध पदार्थासाठी पॉलि-अनसॅच्युुरेटेड – झणऋअ – आणि मोनो-अनसॅच्युुरेटेड – चणऋअ – स्निग्ध पदार्थ खावेत.
4.रोजच्या जेवणात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करावे. जास्तीत जास्त प्रति दिवशी 300 ास असावे. म्हणजे जेवणातील अंडी, मटण, तूप, लोणी आणि इतर मांसाहार टाळावा.
5.साखरेचा आणि प्रक्रिया करून केलेल्या पदार्थांचा वापर कमी करावा. रोजच्या आहारातील प्रमाण 15% कॅलरीपेक्षा जास्त नसावे. म्हणजे साधारणपणे मानसी दिवसात 300 कॅलरी पेक्षा कमी खाल्ली तरी चालेल.
6.दैनंदिन जेवणातील मिठाचे प्रमाण 3 सा पेक्षा कमी असावे.
आजमितीस अमेरिकन हार्ट असोसिएशन तर्फे सल्ला दिला जातो की सॅच्युरेटेड फॅटसचा वापर कमी करून त्या ऐवजी पॉलि-अनसॅच्युुरेटेड फॅटसचा वापर वाढवावा, जेणेकरून हृदयविकार टाळला जाऊ शकतो. म्हणजे पुन्हा मांस आणि तत्सम पदार्थ खाणे टाळावे आणि व्हिजिटेबल तेल वापरावे.
दुर्दैवाने, या मार्गदर्शक सूचना अमलात आणून त्याचे अपेक्षित परिणाम झालेले दिसत नाहीत. या उलट जगामध्ये सर्वत्रच स्थूलता, डायबेटीस, हृदयविकार इ जीवनशैली संदर्भातील विकारांमध्ये खूप मोठया प्रमाणावर वाढ झालेली आहे. या गाईडलाईन्समध्ये त्रुटी आहेत, असे आता बरेच तज्ञ सांगू लागले आहेत. त्यानुसार समाज आणि वैद्यकीय व्यावसायिक यांनी योग्य ते बदल तातडीने करणे गरजेचे आहे.
आता आपण या गाईड लाईन्स मागील शास्त्रीय अभ्यास किंवा पुरावा पाहुयात…
अमेरिका आणि ब्रिटिश सरकारने नॅशनल डाएटरी गाइड लाईन्स अनुक्रमे वर्ष 1977 आणि 1983 मध्ये नागरिकांना जाहीर केल्या. याचा मूळ उद्देश होता की नागरिकांनी आहारातील स्निग्ध पदार्थ कमी केले तर हृदय विकाराचे प्रमाण कमी होईल. दुर्दैवाने आजपर्यंत या सल्ल्यामागील वैद्यकीय सत्यतेचे पुनरावलोकन करण्यात आले नाही.
हा सल्ला ज्या वेळी जाहीर करण्यात आला होता त्या वेळी उपलब्ध असलेल्या – नियंत्रित अशा सामान्य चाचण्या (ठउढ – ीरपवोळीशव लेपीीेंश्रश्रशव ीींळरश्री) यांचा अभ्यास केला गेला त्याचा निष्कर्ष असा आहे की, अमेरिकेतील 22 कोटी आणि 5.6 कोटी ब्रिटिश जनतेला सरकारने “राष्ट्रीय आहार मार्गदर्शिका’ अनुक्रमे 1977 आणि 1983 साली नागरिकांना जेव्हा जाहीर केल्या तेव्हा त्यासाठी कुठल्याही नियंत्रित अशा सामान्य चाचण्यांचा (ठउढ)आधार नव्हता. तसेच त्यावेळी 2467 पुरुषांवर निरीक्षण केले गेले होते. स्त्रियांवर कुठलेही संशोधन झालेले नव्हते.
प्राथमिक काळजी (प्रायमरी प्रीव्हेंशन) स्वरूपात कुठलेही संशोधन केले गेले नव्हते.
जेवणातील फॅट कमी करावेत अशा प्रकारच्या सल्ल्यानुसार कुठल्याही प्रकारचे ठउढ संशोधन करण्यात आले नव्हते.
इतर कुठल्याही संशोधन प्रकल्पात “राष्ट्रीय आहार मार्गदर्शिका’ तयार करण्यात याव्यात असा निष्कर्ष काढण्यात आला नाही.
थोडक्यात ह्या “राष्ट्रीय आहार मार्गदर्शिका’साठी आवश्यक असे “शास्त्रीय पद्धतीने केलेले संशोधन’ ही बाबच लक्षात घेतली गेली नाही.
आता पाहुयात आहारातील कोलेस्टेरॉल मुळे रक्तातील कोलेस्टेरॉल चे प्रमाण वाढते का ?
कोलेस्टेरॉल अन्नामधून आतड्यात गेल्यावर त्याचा संयोग लळश्रश ीरश्रीीं शी होतो. त्या नंतर आतड्याच्या पेशींद्वारे कोलेस्टेरॉल रलीीेल केले जाते. त्यानंतर कायलोमायक्रोन या कणामध्ये कोलेस्टेरॉल साठविले जाते. अन्नपदार्थातील बहुतेक कोलेस्टेरॉल हे इस्टरीफाइड स्वरूपात असल्याने कमी प्रमाणात आतड्यातून रक्तात शोषले जाते.
शरीरातील कोलेस्टेरॉल प्रमाणात ठेवण्याची प्रक्रिया – कोलेस्टेरॉल हिमोस्टॅटिस कोलेस्टेरॉल हा पदार्थ जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील सर्व पेशींमध्ये कोलेस्टेरॉल असतेच असते.
कोलेस्टेरॉलशिवाय जीवन अशक्य आहे. शरीरात अंतर्गत प्रक्रियेनुसार आवश्यक प्रमाणात कोलेस्टेरॉल तयार करण्याची क्षमता असते. शारीरिक प्रक्रियेनुसार अन्न पदार्थात जास्त कोलेस्टेरॉल आतड्यात गेले तर शरीरात कमी प्रमाणात कोलेस्टेरॉल तयार केले जाते. तसेच कमी कोलेस्टेरॉल खाल्ल्यास जास्त कोलेस्टेरॉल तयार केले जाते. यामुळे शरीरात आवश्यक ते कोलेस्टेरॉल नेहमी उपलब्ध असल्याची खात्री निसर्गत:च बाळगली जाते. यामुळे जेवणानंतर 7 ते 8 तासांनी रक्तातील कोलेस्टेरॉल पूर्ववत होते. जेवणा नंतरच्या 7 ते 8 तासांमध्ये मात्र कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण वाढलेले असते.
डॉ. अन्सल केज यांनी नंतर केलेल्या काही प्रयोगशाळा आणि फिल्ड मधील शास्त्रीय संशोधनानंतर देखील असा निष्कर्ष काढला आहे की, नैसर्गिकरित्या उपलब्ध पदार्थांमधील कोलेस्टेरॉलमुळे रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्याची आणि त्यामुळे हृदय विकार होण्याची शक्यता नगण्य आहे.
यानंतर डॉ. केज यांना टाइम्स मॅगझीनच्या मुखपृष्ठावर “ची. उहेश्रशीींशीेश्र’ म्हणून स्थान दिले गेले.
खरे तर या बदलत्या डाएट हार्ट हायपोथॅसिसला देखील वाढते समर्थन मिळाले. तरिही यानंतर देखील काही प्रश्न अनुत्तरितच राहिले – जसे की – अन्न पदार्थातील सॅच्युरिटेड फॅटमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कसे वाढते ?
रक्तातील कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार कसा वाढीस लागतो?
थोडक्यात, “अ मुळे इ वाढतें आणि इ मुळे उ’ अशी काहीशी अशास्त्रीय समजूत घातली गेली.
याच दरम्यान कोलेस्टेरॉलचे रक्तातील योग्य प्रमाण देखील 280 ास /वश्र पासून कमी करून 200 ास/वश्र करण्यात आले.
ते जाऊ द्या, आता आपण पाहुयात की रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर व्यक्तीचा हृदय विकाराचा धोका खरोखरच वाढतो का ?
डॉ जॉर्ज मान या शास्त्रज्ञाने आफ्रिकेत मसाई जमातीच्या माणसावर संशोधन केले. ह्या लोकांच्या आहारात खूप जास्त प्रमाणात सॅच्युरिटेड फॅट असतात. तरी देखील त्यांच्या शरीरात कोलेस्टेरॉल योग्य प्रमाणात असते. याहून अधिक महत्त्वाचे निरीक्षण असे की या समाजात हृदय विकार जवळपास आढळत नाही.
या संदर्भात केले गेलेले अजून एक महत्त्वाचे शास्त्रीय संशोधन म्हणजे – यामध्ये 35 ते 70 वर्षे वयोगटातील 135,335 लोकांना समाविष्ट केले होते. 18 देशातील लोकांचा यात सहभाग होता. त्यामध्ये गरीब, मध्यम आणि श्रीमंत लोकांना सहभागी केले होते. या संशोधनानुसार
आहारातील पिष्टमय पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात असल्यास मृत्यू दर जास्त असतो. आहारातील स्निग्ध पदार्थाचे सेवन जास्त असल्यास मृत्यू दर कमी असतो. आहारातील स्निग्ध पदार्थ प्रमाण आणि हृदय विकार याचा परस्पर संबंध नाही.
आहारात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असल्यास पक्षाघाताचे – प्रमाण 21% कमी होते.
प्रोफेसर सलीम युसुफ यांच्या स्पष्टीकरणानुसार, 25 – 30 वर्षा पूर्वी केलेल्या संशोधनामध्ये बऱ्याच प्रमाणात त्रुटी होत्या. तरीही त्याला समर्थन आणि मान्यता मिळाली. खरे तर त्यानंतर आजपर्यंत चांगल्या दर्जाचे अनेक संशोधन प्रकल्प असे सांगतात की आहारात फॅटचे प्रमाण जास्त असल्याने हृदय विकार बळावत नाही.
पुढे जाऊन त्यासाठी त्यांनी थोशप’ी कशरश्रींह खपळींळरींर्ळींश ीींळरश्र चा संदर्भ नमुद केला आहे. हा संशोधन प्रकल्प छरींळेपरश्र खपीींर्ळीीींशी ेष कशरश्रींह या संस्थेतर्फे करण्यात आला होता. यामध्ये 49,000 स्रियांना समाविष्ट केले होते. यातील निष्कर्ष स्निग्ध पदार्थ कमी असल्यामुळे (श्रुे षरीं वळशीं) हृदय विकार, पक्षघात या विकारात कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही.
2009 सालापर्यंत उपलब्ध संशोधनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केल्यास असे लक्षात येते की –
आहारातील स्निग्ध पदार्थ आणि हृदय विकार यांचा संबंध दाखविणारा कुठलाही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही.
सॅच्युरेटेड फॅटस वाईट नाहीत
अनसॅच्युरेटेड फॅटसही वाईट नाहीत.
आहारातील फॅट आणि हृदय विकार यांचा संबंध नाही.
याबाबत ऋीराळपसहरा र्डीींवू चे निष्कर्ष पाहणे महत्त्वाचे ठरेल – 20 वर्षे – 1997 मध्ये केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की पुरुषामध्ये आहारातील स्निग्ध पदार्थ आणि पक्षघात यांचे प्रमाण व्यस्त असते आहारात स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात खाणाऱ्या लोकामध्ये स्ट्रोक चे प्रमाण कमी असते.
आहारात स्निग्ध पदार्थ कमी प्रमाणात खाणाऱ्या मध्ये स्ट्रोक चे प्रमाण जास्त असते.
म्हणजेच स्निग्ध पदार्थ खाणे वाईट नसते तर योग्य असते.
या नंतरही प्रश्न राहतोच की मग
हृदय विकार नक्की होतो कशाने ?
हृदय विकार होण्याची शक्यता कशी ओळखता येईल ?
हृदय विकाराचा धोका कमी करण्यासाठी काय करावे?
(याविषयी पुढील लेखात वाचूया)
– डॉ. चंद्रकांत कणसे