Saturday, March 7, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मधुमेह असतानाही उपवास करताय? मग ‘ही’ काळजी नक्की घ्या

by प्रभात वृत्तसेवा
March 7, 2021
in आरोग्य वार्ता
A A
पुणे-मुंबईत डायबेटीसच्या प्रमाणात वाढ
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सणासुदीच्या दिवशी आपल्यासमोर अनेक खाण्याचे पदार्थ असतात आणि शक्‍यतो आपण मोह आवरू शकत नाही. यावेळी रुग्णांनी आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. सातत्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी तपासून पाहावी. मुख्य म्हणजे वेळेवर औषधं घ्यावीत.

जर तुम्हाला औषधांची वेळ बदलावी असं वाटतं असेल, तर डॉक्‍टरांचा सल्ला जरूर घ्यावा. जर तुम्ही इन्सुलिनवर असाल, तर डॉक्‍टरांना विचारून तुमच्या जेवणाच्या वेळेनुसार इन्सुलिनचा डोस घ्यावा. उपवासादरम्यान शरीर ग्लुकोजचा साठा वापरते. त्यानंतर ऊर्जेचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी शरीरातील चरबीचे विभाजन सुरू होते.

हा कालावधी 12 तासांहून अधिक असल्यास शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी-जास्त होऊ शकते. त्यामुळे उच्च-कमी रक्तशर्करा (हायपरग्लासेमिया, हायपोग्लासेमिया), शरीरात किटोन्स व ऍसिडचे प्रमाण वाढणे, पाणी कमी होणे आदी आरोग्य समस्या उद्भवतात.

सणासुदीच्या कालावधीत एकीकडे केले जाणारे उपवास, तर दुसरीकडे गोडधोड खाद्यपदार्थावर मारलेला ताव अशा दोनही गोष्टी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या ठरतात. विशेषत: मधुमेहींना या काळात आपल्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष देत रक्तातील साखरेची पातळीमध्ये सामतोल साधणे आवश्‍यक असते. असे केले तरच मधुमेहींना सण-उत्सवाचा खरा आनंद लुटता येणे शक्‍य होते.

टाईप-2 या प्रकारच्या मधुमेहामध्ये जीवनशैलीतील बदल हा उपचारांसाठी प्राथमिक घटक असतो. तसेच, उपवास करणे हा देखील जीवनशैलीतील बदल ठरतो. योग्य पद्धतीने उपवास केल्यास, अधूनमधून उपवास करणे आरोग्याशी संबंधित अनेक फायदे मिळू शकतात. सामाजिक-धार्मिक उद्दिष्टांव्यतिरिक्त असे फायदे मिळत असतात.

त्याऐवजी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने सौम्य स्वरूपाचा विखंडित उपवास केल्यास मधुमेही रुग्णांचे वजन, रक्तातील ग्लुकोज, रक्तदाब व कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रित राहू शकते. त्यामुळे उपवास करताना व सोडताना खाण्याचे आरोग्यकारक पर्याय निवडावेत, ग्लुकोमीटरद्वारे नियमित साखरेची पातळी तपासावी, उपवास काळात शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवणं अत्यावश्‍यक असतं. या काळात दैनंदिन जीवनातील हालचाली करण्यास हरकत नसते.

मात्र, मध्यम ते कठीण प्रकारचा व्यायाम, हालचाली यांच्या वेळा बदलणं आवश्‍यक असतं. औषधाशिवाय मधुमेहविषयक काळजी घेत असताना मानसिक ताणतणावांचे व्यवस्थापन करणे, हा महत्त्वाचा घटक ठरतो. हे चांगल्याप्रकारे ग्लायसेमिक नियंत्रणासह उपचारपद्धती कितपत लागू होते, हे तपासण्याची संधी देतात, ताण-तणावही कमी करतात.

मधुमेहींना उपवास करायचा असेल, तर मधुमेहासंदर्भातील आणि उपवासासंदर्भातील सल्ले महत्त्वपूर्ण ठरतात. यातून निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या म्हणजे हायपोग्लासेमिया, हायपरग्लासेमिया, डिहायड्रेशन आणि चयापचयात डायबेटिक केटो ऍसिडोसिससारखी गंभीर स्वरूपाची गुंतागुंत निर्माण होणे. उपवासादरम्यान शरीरातील व्यवस्थांवर खूप ताण येतो आणि सलग किती काळ उपवास केला जातो, यावर हा ताण अवलंबून असतो.

आपण उपवास करतो तेव्हा शरीर ग्लुकोजचा साठवलेला स्रेत वापरते आणि नंतर ऊर्जेचा स्रेत निर्माण करण्यासाठी शरीरातील चरबीचे विभाजन सुरू होते. उपवासादरम्यान शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण रक्तातील ग्लुकोजची पातळी उपवासामुळे खूप खालावण्याची शक्‍यता असते. ( diabetes )

Tags: diabetesdiabetes daydiabetes information in marathidiabetes marathi infomadhumehआरोग्य माहितीमधुमेहमधुमेहाबद्दल माहिती
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar