एकटा मधुमेह हाही हृदयविकाराच्या दृष्टीने एक अत्यंत गंभीर असा धोकादायक घटक आहे. मधुमेहींमधील हृदयविकाराचा धोका वाढवणारे आणखी घटक म्हणजे कोलेस्टरॉलची उच्च पातळी, उच्च रक्तदाब, धूम्रपान, अतिरिक्त वजन, स्थूलपणा, शारीरिक हालचालींचा अभाव, आहाराच्या अनारोग्यकारी सवयी, कमी वयात हृदयविकार होण्याची आनुवांशिकता, ताण वगैरे. इन्सुलिन प्रतिरोधाचा विकार किंवा या धोक्यांपैकी दोन-तीन एकाच वेळी अस्तित्वात असणे. यामुळे हृदयविकाराचा किंवा पक्षाघाताचा धोका आणखी वाढतो.
डा यबिटीस मेलिटस हा विकारांचा एक समूह असून, शरीराच्या इन्सुलिन तयार करण्याच्या किंवा ते वापरण्याच्या क्षमतेत निर्माण झालेल्या बिघाडांमुळे वाढलेली रक्तातील ग्लुकोजची पातळी हे त्याचे लक्षण आहे. व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी जेवढी उच्च तेवढा तिला हृदयविकाराचा धोकाही जास्त. मधुमेह नसलेल्यांच्या तुलनेत मधुमेहींना हृदयविकाराचा धोका अधिक असतो.
हृदयविकाराच्या दृष्टीने धोकादायक घटक त्यांच्यात अधिक प्रमाणात आढळतात, त्यांना तरुण वयात हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, त्यांना होणारा हृदयविकाराचा त्रास अधिक तीव्र स्वरूपाचा असू शकतो. लोकांना वाटते की, हृदयविकाराचा धक्का बसेल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल. त्यांची अपेक्षा असते की, छातीत तीव्र वेदना होतील किंवा त्या वेदना डाव्या हातापर्यंत जातील.
मात्र, प्रत्येक हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी ही ठरलेली लक्षणे दिसतीलच असे नाही. हृदयविकाराच्या झटक्यांपैकी सुमारे – टक्के सायलेंट समजले जातात. हृदयविकाराचा हा मूक झटका कोणत्याही स्पष्ट लक्षणांशिवाय येतो. किंवा काही वेळा कोणत्याही लक्षणांशिवायही येतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आलेला लक्षातच येत नाही, तो येऊन गेल्यानंतर काही दिवसांनी, काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनीही लक्षात येतो.
हृदयविकाराच्या मूक झटक्यांचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक असते. मात्र, असे मूक झटके प्राणघातक ठरण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे. कोणत्याही खुणांशिवाय किंवा लक्षणांशिवाय हृदयविकाराचा मूक झटका येण्याचा धोका टाइप टू मधुमेहामुळे वाढतो. या रुग्णांना कोणत्याही लक्षणांशिवाय हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
या हृदयविकाराच्या मूक झटक्याची लक्षणे
डोके हलके वाटणे, श्वास लागणे, मळमळणे, उलट्या होणे, अपचन किंवा जठर-आतड्यांचे अन्य काही त्रास, अतिथकवा, घाम येणे. अशा प्रकारचा मूक झटका येऊन गेल्यानंतर रुग्णाच्या नियमित तपासणीदरम्यान केलेल्या इलेक्ट्रोकार्डिआग्राममधून (ईसीजी) तो कळू शकतो. यामध्ये मागील झटक्याची लक्षणे दाखवणाऱ्या खुणा सापडतात.
मधुमेहामुळे होणाऱ्या सामान्य परिणामांपैकी एक म्हणजे मज्जातंतूंची एक प्रकारची हानी. याला न्युरोपॅथी असे म्हणतात. यामुळे रुग्णाच्या हात व पायांमध्ये बधीरपणा, मुंग्या येणे किंवा अशक्तपणा अशा समस्या जाणवतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये, विशेषत: त्यांना दीर्घकाळ उभे राहावे लागत असेल, तर मज्जातंतूंची हानी होत असते आणि यामुळे त्यांच्या हृदय, मूत्राशय आणि रक्तवाहिन्यांचेही नुकसान होते.
हे घडते तेव्हा त्यांना वेदना किंवा अस्वस्थपणासारखे महत्त्वाचे इशारे मिळत नाहीत. काही जणांना काही लक्षणेच जाणवत नाहीत. मधुमेहींसाठी वेदनांशिवाय येणारा हृदयविकाराचा झटका ही चिंतेची बाब आहे. कारण, रक्तातील साखरेची वाढलेली पातळी, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टरॉलची समस्या यांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, पण शिरांच्या हानीमुळे झटक्याचा इशारा देणारी लक्षणेच जाणवू शकत नाहीत.
सामान्यपणे, हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी छातीत वेदना होतात आणि त्यांच्या कळा हात, खांदे, मान, दात, जबडा, ओटीपोट किंवा पाठीतही जाणवू शकतात. सामान्यत: आढळणारी आणखी लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासात अडचण, मळमळ किंवा उलट्या आणि घोर लागल्यासारखे वाटणे. मात्र, मधुमेहींना ही लक्षणे डायबेटिक न्युरोपॅथीमुळे काहीवेळा जाणवतच नाहीत. कारण, या अवस्थेमुळे त्यांच्या हृदयाचे नियंत्रण करणाऱ्या शिरांची हानी झालेली असू शकते.
मधुमेहाच्या रुग्णांना हृदयविकाराच्या वेदनारहित झटक्याबद्दल खालील बाबी माहीत असणे आवश्यक आहे :
मधुमेहींना छातीत तीव्र स्वरूपाच्या कळा किंवा ब्रेक डाऊन, थंड घाम येणे आदी लक्षणे जाणवली नाहीत, तरी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराच्या झटक्याच्या अन्य लक्षणांमध्ये अतिथकवा तसेच काम करत असताना श्वास लागणे आदींचा समावेश होतो.
हृदयविकाराचा झटका वेदनांशिवाय आला तरी त्याने होणारी हानी ही नेहमीसारख्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे होते तशीच असते. मधुमेहींमध्ये धोक्याच्या घटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यास, हृदयविकाराचा झटका टाळण्यात किंवा लांबवण्यात मदत होऊ शकते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले.
रक्तातील साखरेची पातळी सामान्य राखली, तर मधुमेहींच्या हृदयाचे दैनंदिन कामकाज सुधारते. मधुमेहाचे रुग्ण जीवनशैलीत काही बदल करून तसेच दिलेली औषधे घेऊन हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात. यामुळे त्यांना धोक्याचे अनेक घटक टाळण्यात किंवा नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते.
आरोग्यपूर्ण जीवनशैली हा आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी ठेवलेल्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचा भाग असला पाहिजे. मधुमेह आणि हृदयविकार या दोहोंवरील उपचारांचा आरोग्यपूर्ण जीवनशैली हा महत्त्वाचा भाग आहे. मधुमेहाचे काही रुग्ण केवळ जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने रक्तदाब आणि कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवू शकतात. शारीरिक व्यायामासारखे जीवनशैलीतील बदल तुमचा रक्तदाब नियंत्रणात आणू शकतात, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी आणि वजन आटोक्यात ठेवू शकतात आणि ताण कमी करू शकतात. आरोग्यपूर्ण आहार घेणे, आरोग्याला उपकारक ठरेल असे वजन राखणे यांमुळे हृदयविकाराच्या दृष्टीने धोकादायक घटकांवर नियंत्रण मिळवता येते.
मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितपणे वैद्यकीय तपासणी करून घेत राहावे. चाचण्यांमधून समस्या त्या जाणवण्यापूर्वीच उघडकीस येऊ शकतात. वेळेत उपचार मिळाल्यास संबंधित समस्या टाळल्या जाऊ शकतात किंवा लांबवल्या जाऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांना नियमित भेटा आणि ते तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल, कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल, तुमच्या जीवनशैलीबद्दल जे प्रश्न विचारतील, त्यांची प्रामाणिक आणि संपूर्ण उत्तरे द्या.
सणासुदीच्या दिवसांत अनेकदा निर्जळ उपवास केला जातो पण असं करताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अर्थात यामध्ये प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग असतो; परंतु वयोवृद्ध व मधुमेही रुग्णांसाठी सावधगिरी बाळगणे आणि त्यांचे उपवास करणे योग्य आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे.
इंसुलिन किंवा इतर मधुमेहावर औषधोपचार घेत असताना उपवास करण्याची शिफारस केली जात नाही. ह्यामुळे हायपोग्लायसेमिया किंवा रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते. परंतु, श्रावण महिना किंवा सणासुदीच्या दिवसांत सर्रास डॉक्टरांचे नियम धुडकावून उपवास करणाऱ्यांची अनेक उदाहरणे डॉक्टर देतात आणि मग बिघडलेल्या साखरेचे गणित व त्यामुळे मधुमेह रुग्णांना सतत होणारे निर्जलीकरण किंवा उच्च रक्तदाब होऊ शकतो.
या काळात औषधोपचार टाळण्यासाठी अनेक लोक उपवास करतात आणि दिवसभरात अन्न घेण्यास टाळतात. यामुळे यकृत रक्तात ग्लुकोज ऊर्जा उत्सर्जित करते. या दोन्हींमुळे रक्तातील ग्लुकोजच्या प्रमाणात वाढ होते.
गोडावर नियंत्रण हवेच…
कोणत्याही आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी रक्त गोठवण्याचे नियमित नियमन करणे फार महत्त्वाचे आहे, ग्लुकोजच्या पातळीनुसार एमजी / डीएलपेक्षा कमी व एमजी / डीएलपेक्षा जास्त नसावे. अशा प्रसंगी, उपवास तोडण्यासाठी वा कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी तत्काळ कर्बोदक समृद्ध अन्न किंवा पेय वापरणे महत्त्वाचे आहे. उपवासाच्या आधी वैद्यकीय उपचारांचे मूल्यांकन केले जाऊ शकते. ज्यामुळे औषधोपचार, पोषण होईल व हायड्रेशन होणार नाही. अशी योजना डॉक्टरांकडून तयार करून घ्यावी.
उपवास काळात औषधे टाळण्यासाठी रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वाढ होऊ शकते त्यामुळे मधुमेही रुग्णांना समस्या उद्भवू शकतात वा आरोग्य समस्या वाढू शकतात. तीव्र डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या या सर्व कारणांमुळे तुमचा उपवास मोडू शकतो. आपल्या मूत्राचा रंग बदलणे हे देखील डीहायड्रेशनचे एक कारण असू शकते.
काही पदार्थ आहेत जे उपवासात घ्यावे आणि उपवास काळात हे पदार्थ मधुमेही रुग्णांना मदत करतील. जरी कर्बोदकांमध्ये खूप ऊर्जा उपलब्ध आहे. पण हे मी मधुमेह असलेल्या लोकांसाठी विशेषत: मधुमेह टाईप च्या रुग्णांसाठी पदार्थ नाहीत. त्यामुळे पांढरे तांदूळ किंवा बटाटे यांच्या तुलनेत ब्राऊन तांदूळ, पूर्ण धान्यांचा ब्रेड आणि भाज्या सारख्या कमी ग्लायसेमिक निदेशांकासह त्या अन्नपदार्थाची निवड केली जाते.
कर्बोदकांपासून प्रोटिन्स शोषणे कमी होते; परंतु प्रथिनेयुक्त समृद्ध अन्नाची या काळात शिफारस केली जाते. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवताना आपल्याला आवश्यक असलेली ऊर्जा मिळविण्यासाठी, ते नट, तेलकट मासे, ऍव्होकॅडस्, ऑलिव्ह आणि ऑलिव्ह ऑईल वापरण्यासाठी आवश्यक आहे. कारण ते ऊर्जेचे सर्वोत्तम स्रोत आहेत आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढविण्यासाठी देखील मदत करतात.
पूर्व-दिवस आणि सूर्यास्ताच्या जेवणांच्या दरम्यान जेवण न खाणे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. उपवास नसणाऱ्या काळाच्या दरम्यान सर्व कॅलरी दोन ते तीन लहान जेवणांवर वितरित केल्या पाहिजेत.
सर्व शारीरिक हालचालींची तीव्रता आणि वेळ वाढविणे आवश्यक आहे. महिन्याच्या लांब उपवासाच्या शेवटी दिवसांचा उपवास असतो. ज्यात अन्न, शीतपेये आणि मिठाई यांचा समावेश असतो. रुग्ण परत उपचारात्मक आहारपटाच्या रूपात असावा, ज्यामध्ये ते हळूहळू नियमितपणे खाणे सुरू करतात, जे ग्लायसेमिक निर्देशांक समाधानकारक वाटतात.
पुरेशी झोप गरजेची
मधुमेही लोकांना झोपेचा त्रास असतो. मधुमेही लोकांपैकी किमान अर्ध्याहून अधिक लोकांना रात्री झोप येत नाही. पुरेशी झोप न मिळाल्याने ग्लुकोजचे प्रमाण पुरेसे राखले जात नाही, तात्पर्याने इन्शुलीन पुरेशा प्रमाणात स्रवत नाही. त्यामुळे तुम्हाला टाईप मधुमेह होण्याची शक्यता वाढते. झोपेच्या अभावामुळे इन्शुलीनची निर्मिती करणाऱ्या पेशींच्या कामात अडथळे निर्माण होतात, त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि तात्पर्याने मधुमेह होण्याची शक्यताही वाढते.
पुरेशी झोप न मिळण्याने ज्या लोकांना आधीपासूनच मधुमेह आहे त्यांना हा धोका आणखीनच वाढतो. सलग काही रात्री झोप मिळाली नाही तर या व्यक्तींच्या जीवावरही बेतू शकतं. मधुमेह नसलेल्या लोकांच्या तुलनेत मधुमेही लोकांना झोपेचा त्रास अधिक असतो असे पुराव्याने सिद्ध झालेले आहे.
एक-दोन दिवस पुरेशी झोप झाली नाही, तर ती झोप नंतर भरून काढता येते, पण झोप न लागण्याचा त्रास कायम राहिला तर मात्र त्यातून सावरणे अवघड होऊन बसते. जितके जास्त दिवस तुम्हाला पुरेशी झोप मिळणार नाही, झोप भरून काढणं तितकंच अशक्य होत जाईल. असं झाल्यास तुमचं शरीर पुरेशी झोप न मिळण्यालाच सरावून जाईल आणि त्याची परिणती तुमचा मधुमेह वाढण्यात होईल.
– डॉ. प्रदीप गाडगे