Diabetes Awareness : आधुनिक युगात घरोघर एक पाहुणा ठाण मांडून बसलेला आहे तो म्हणजे मधुमेह. भारत देश तर मधुमेह आजाराच्या बाबतीत आघाडीवर आहे. घरटी एकच काय आता दोनही व्यक्ती मधुमेहाने ग्रासलेल्या असतातच.
हा आजार असा आहे की त्यामुळे रुग्ण कधीच आजारी दिसत नाही पण तो आतून हळूहळू पोखरला जात असतो. मधुमेह म्हणजे स्लो पॉयझनिंग आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. रक्तातील शुगर प्रमाणाबाहेर गेली की मधुमेह व्याधी जडते.
– शरीराला आवश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते. स्वादुपिंडातून पाझरणार्या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो. यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते, पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते.
– रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते. त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते.
– मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते.आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते.याची लक्षणे काय तयार होतात.
मधुमेहाची लक्षणे :-
सतत तहान लागणे.
घशा मध्ये कोरड पडणे.
हाता-पायाची खाज सुटणे.
जखम बरी न हाेणे.
वारंवार लघवी ला येणे .
लघवी करताना त्रास हाेणे.
डाेळ्यांची जळजळ हाेणे व नजर दोष निर्माण होणे.
पायाच्या तळव्यांची जळजळ होणे.
पोट साफ न होणे/पचनक्रिया मंदावणे, बिघडणे.
The post Diabetes Awareness : मधुमेह म्हणजे काय? लक्षणे आणि कारणे, वाचा सोप्या भाषेत…. appeared first on Dainik Prabhat.