पुणे – मन, शरीर, श्वास याच्या लयबद्ध सुसूत्रतेमुळे मनःशांती, श्वासाच्या (प्राणाच्या जाणीवा) आणि अंतर्गत शांती यामुळे खूप सक्षमता व उत्साह लाभतो असा अनेकांचा अनुभव आहे. मधुमेही रुग्णांनादेखिल अशा प्रकारच्या मन:शांतीची गरज असते. त्यामधून अनेक गोष्टींवर मात करता येते. जीवनशैलीविषयक अशा आजारांमध्ये योगासने महत्त्वाची भूमिका निभावतात. अशा रुग्णांसाठी ही खास माहिती
योगसाधना हा एक अत्यंत लोकप्रिय शिस्तबद्ध साधना व व्यायाम प्रकार गेल्या 5000 वर्षांपेक्षा जास्त वर्षे भारतात जीवनशैलीचा भाग म्हणून प्रचलित आहे. यामध्ये मानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिक सुसंस्कार व दैनंदिन शिस्तबद्ध आचरण यामुळे माणसाला मिळणारे फायदे ही एक देणगी आहे.
मन, शरीर, भावना, संतुलन, शांती, सुसूत्रता, सद्वर्तन, संपन्न जाणिवा, संवेदना, त्याग, निरपेक्षता, सक्षम मन याचा अत्यंत सुंदर मिलाफ योगाभ्यासाने मिळतो. मन, शरीर, श्वास याच्या लयबद्ध सुसूत्रतेमुळे मनःशांती, श्वासाच्या (प्राणाच्या जाणीवा) आणि अंतर्गत शांती यामुळे खूप सक्षमता व उत्साह लाभतो असा अनेकांचा अनुभव आहे.
आज आपण आधुनिक औषधपाणी व मॉडर्न लाईफस्टाईलच्या जमान्यात आहोत. या युगात संपूर्ण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे डायबेटीस, बी.पी., वजनवाढ असे अनेक विकार फोफावताना दिसतात. त्याचमुळे जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम दाखवणाऱ्या योगसाधनेचा पूरक उपचार म्हणून मधुमेहात कसा उपयोग होऊ शकतो ते या लेखात पाहू या.
भारतात व आता परदेशातही योगसाधनेचे अनेक प्रचलित प्रकार आहेत. ते असे-
– राजयोग (क्लासिकल रॉयल योग) – यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या सर्वांनी मुक्त योग
– मंत्रयोग- विशिष्ट आघात व उचारणासह श्लोकपठण करणे व त्याद्वारे मनाची व अध्यात्मिक ताकद वाढवणे.
– योगासने, विशिष्ट हालचालींद्वारे स्नायू व शरीराला आराम, शक्ती, रिलॅक्सेशन देणे.
– प्राणायाम- श्वसनाच्या विविध पद्धतींमधून श्वास, ठोके, मन, बुद्धी यावर एकाग्रता व सुसूत्रता मिळवणे.
– ध्यानधारणा
– मुद्रा
– हठयोग व त्याच्या पद्धती- कुंडलिनी जागृती, अष्टांग योग, विनियोग, विन्यास, कृपालू, विक्रमयोग इ.
यम म्हणजेच स्वयंनियंत्रणात अहिंसा, सत्यता, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य, अपरिग्रह (वस्तू, संपत्ती जमा न करणे) याचा अंतर्भाव होतो. नियम म्हणजेच स्वयंशिस्त यामध्ये शुचिता, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरावर श्रद्धा व समर्पण याचा अंतर्भाव होतो. प्रत्याहार म्हणजेच बाहेरील संवेदनांपासून अविचल होणे, धारणा म्हणजे एकाग्रता, ध्यान म्हणजे अहंकारापासून दूर अंतर्गत शांततेकडे वळणे, समाधी म्हणजे वैश्विक शांती व ईश्वराशी एकरूप होणे.
या सर्व योग प्रकारांवर व आसनांवर सध्या मॉडर्न सायन्समध्येही देशापरदेशात संशोधन चालू आहे व अत्यंत सकारात्मक निष्कर्ष बाहेर येत आहेत. तरीही अद्याप मोठ्या क्लिनिकल ट्रयल्स होणे गरजेचे आहे.
ताडासन, वृक्षासन, त्रिकोनासन, पाश्वोथ्थानासन, वज्रासन, बक्रासन, गोमुखासन, पश्चिमोत्तानासन, उत्तानपादासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, प्राणायाम, शवासन अशा अनेक योगप्रकारांच्या क्लिनिकल ट्रायल्स होणे गरजेचे असून त्याचे काही निष्कर्ष बाहेर आले आहेत. त्याचे थोडक्यात निष्कर्ष असे-
– सेल्व्हम व सहकारी- आसने साखर नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतात. (कंट्रोल ग्रुपपेक्षा)
– तिखे व सहकारी- मध्यमवयीन टाईप 2 मधुमेहात शरीरातील चरबी, बॉडी मास इंडेक्स व शरीरांच्या उर्जेचे ज्वलन याकरिता भरपूर योगासने नियमित केल्यास सकारात्मक उपयोग दिसतो.
– शांताकुमारी व सहकारी- नेहमीचे व्यायाम व योगासने अशा दोन गटांची तुलना केल्यास 3 महिन्यांनंतर कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्स, एल. डी. एल. कोलेस्टेरॉल तसेच ब्लड शुगर कमी करण्यास योगासनांचा गट जास्त यशस्वी ठरला. तसेच एच.डी.एल. हे चांगले कोलेस्टेरॉल वाढले. योगासन गटात औषधांचे डोस कमी झाले.
– युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅनफ्रान्सिस्को व सॅन डियागो येथील क्लिनिकल ट्रायल्स- सहा महिन्यांच्या सातत्यपूर्ण योगसाधनेनंतर लिपिड प्रोफाईल सुधारला; पण एक वर्षानंतर ही सुधारणा टिकली नाही. परंतु उपाशीपोटीची साखर बराच काळ नियंत्रणात राहिली. तसेच कलअळल ची सुधारणाही फार काळ टिकली नाही.
-हेगडे व सहकारी- शरीराची मोजमापे, ब्लडप्रेशर, साखरेची पातळी तसेच शरीरातल्या (प्रदूषणाचे व आजारांचे ताण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस यावर योगसाधनेचा सकारात्मक परिणाम दिसतो.
-स्वामी विवेकानंद योग अनुसंधान केंद्र, समस्थना युनिव्हर्सिटी बंगलोर- मूळ औषधांसोबत योगासने केल्यास ताण कमी होऊन मनःशांती मिळते. तसेच साखरेची पातळी घटते. पण मॉडर्न युगात योगसाधनेत सातत्य ठेवण्यात अनेक अडथळे येतात हेही नमूद केले.
-जगन्नाथ व सहकारी- थोड्या कालावधीसाठी केलेल्या योगसाधनेमुळेही खङ6, तळीं. ऊ, तसेच डायबेटीसच्या रिस्क फॅक्टर्समध्ये सुधारणा होते. स्थूल माणसांमध्ये विशेषकरून हा उपयोग दिसतो.
-ज्योत्स्ना व सहकारी, सहा महिने सुदर्शन क्रिया व प्राणायाम केल्यानंतर जेवणानंतरची साखर, जीवनाची पातळी उंचावली पण उपाशीपोटची साखर व कलअळउ यावर फरक पडला नाही, योग्य प्राणायामाने हृदयाच्या नसांचे विकार सुधारतात.
– कामझेम व सहकारी- योगासने व प्राणायाम यामुळे झ300 (झ3) लेव्हल सुधारतात. शरीरातील झ3 ची पातळी ही मेंदूच्या कार्यक्षमतेची द्योतक असते म्हणजेच योगासनांमुळे मेंदू तल्लख होण्यास मदत होते. हे कसे घडते हे अजून नीटसे समजलेले नाही. फुप्फुसांची क्षमता व साखरेची पातळी तसेच मज्जातंतूंचे कामकाज योगसाधनेमुळे सुधारते.
योगसाधना करताना आहार, आचार, विचार दिनचर्या व विहार यांचेही पालन करावे लागते ते असे-
1. आहाराचे पालन- आहाराचे सात्विक, राजसिक व तामसिक असे प्रकार आहेत. संतुलित, प्रमाणबद्ध व वक्तशिर आहार उपयुक्त ठरतो. योगामध्ये सकाळी 8, दुपारी 12, दुपारी 4 व रात्री 8 असा 4 वेळा प्रमाणित सात्विक आहार घेण्यास सुचवले आहे. याच्यामध्ये काही घ्यायचे असल्यास फक्त पाणी, क्लियर सूप, लिंबाचा रस घेऊ शकतो. खाताना अर्धपोट घनआहार, पाव पोट रसाहार घेऊन उरलेले पाव पोट गॅससाठी रिक्त ठेवावे असे सुचवले आहे.
तसेच खाण्यापूर्वी व खाण्यानंतर 1 तास पाणी न पिण्याचे सांगितले आहे. पाण्याबाबतचा हा सल्ला ऍलोपॅथीला मान्य नाही. जेवताना कच्चा आहार जास्त घ्यावा, पूर्ण लक्ष खाण्याकडे द्यावे, प्रसन्नतेने व शांतपणे जेवावे तसेच आवडनिवड न ठेवता नीट चावून जेवावे असे सुचवले आहे.
पूर्ण धान्यत, डाळी, उसळी, मूग, हळद, जिरा, चिंच यांनी युक्त आहार असावा. सात्विक आहारात क्षार, व्हिटॅमिन्स, तंतू, अँटिऑक्सिडंटंस भरपूर असतात व त्याचा साखर व चरबी उतरवण्यास उपयोग होतो. तसेच झीज व जखमा भरण्यास हा आहार उपयुक्त ठरतो.
2. विहार- भावनिक निचरा व नावीन्यपूर्ण नवनिर्मिती यामुळे ताणावर नियंत्रम मिळते म्हणून छंद, मित्र मैत्रिणी, गप्पा यांना महत्त्वाचे स्थान असावे.
3. आचार- सत्कर्म, आसने, नेती, बस्ती, कपालभाती, धौती हे आचाराचा भाग असल्यास नितीमत्ता, सामाजिक जाणिवा, मानसिक व शारीरिक स्वास्थ्य यात सुधारणा होण्यास मदत होते.
4. विचार- मैत्री, करुणा, सद्भावना, ओंकारसाधना याने विचारांवर नियंत्रण येते.
5. दिनचर्या- दैनंदिन कर्तव्ये, नियमितता, सातत्य, करुणा, आदर, दुसऱ्यांना मदत करणे, सामाजिक सलोखा, शिस्त याचे भान दिनचर्येत असावे.
या सर्वांचे पालन सातत्याने योगसाधनेसह केल्याने खालील फायदे मिळतात.
– इ.च.ख., कमरेचा घेर, ब्लडप्रेशर, उपाशीपोटीची साखर, कल यात सुधारणा होते.
– ऑक्सिडट्विह स्ट्रेस कमीहोऊन सुपरऑक्साईट डिसम्युटेझ या चांगल्या घटकात वाढ होते.
-इन्शुलिनची पातली, कार्यक्षमता सुधारते. कॉर्टिसॉलसारख्या हॉमोईनमध्ये सुधारणा होते. इन्शुलिन रेझिस्टंस कमी होतो.
– फॅटी ऍसिड, स्थूलत्व, मेद घटक यात सुदारणा होते.
– प्रेग्नंसीमधील साखरेत सुधारणा होते.
– वयस्कर व्यक्तींमधील डायबेटीसमध्ये ऋइडङ, कल श्रळळिव िीेषळश्रश सुधारतो.
– एक वर्षापेक्षा जास्त योगसाधनेमुळे वजन व इन्शुलिन कामकाजात सुधारणा होते.
– व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतो.
– ताणतणाव वसंशय दूर होतात.
– मनाचा चंचलपणा व असंतुलनाची कारणे काय आहेत हे शोधण्याची मानसिक ताकद वाढते.
– आत्मभान वाढते.
– प्राणायाम व आसनांनी दिनचर्या सुधारते.
– डायबेटीसच्या आजारासह स्वतःला स्वीकारणे, पथ्य पाळणे, मधुमेहावर नियंत्रणासाठी स्वतः प्रयत्नशील होणे हे योगामुळे सुधारते.
मॉडर्न जमान्यातल्या आपण सर्वांनी पाच हजार वर्षांच्या आपल्या निरामय जीवनशैलीला धुडकावून लावल्याचे परिणाम आपण मधुमेहाच्या रूपात भोगत आहोत. आपली सुसंस्कारीत जीवनशैली नेमकी किती उपयुक्त आहे हे समजण्यासाठी लश्रळपळलरश्र ढीळरश्री मोठ्या प्रमाणात, खूप दिवस, योग्य शास्त्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे. तरच आजच्या र्एींळवशपलश इरीशव चशवळलळपश च्या जमान्यात आपण छातीठोकपणे योगोपचारांचा स्वीकार मॉडर्न सायन्समध्येही करू शकू.
– डॉ. गौरी दामले