Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अशी घ्या मधुमेहींनी मुख आरोग्याची काळजी

by प्रभात वृत्तसेवा
May 18, 2021
in आरोग्य वार्ता
A A
अशी घ्या मधुमेहींनी मुख आरोग्याची काळजी
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

दातांशी संबधित वैद्यकीय समस्यांची अनेक उदाहरणे आपण पाहतो, दातांना होणारी वेदना कमी व्हावी, या उद्देशाने विशिष्ट पद्धतीने ब्रश करण्याचाही सल्ला दिला जातो. दर 100 पैकी किमान 35 रुग्ण त्यांच्या दातांच्या संवेदना आणि हिरडयांमधून रक्‍तस्त्रावाच्या समस्या घेऊन येतात.

दात घासताना किंवा ब्रश करताना मोठया प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो.. अनेकदा त्यांना वाटते की, ब्रशिंगचे हे काम सोपे कसे होईल? काहीजण ब्रशिंगच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी गृहित धरतात, त्यामुळे याबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे. दररोज सकाळी ब्रश करताना किंवा दात घासताना योग्य प्रकारे घासण्याची प्रक्रिया केली पाहिजे.

 

साफ दातांसाठी सूचना
तुम्हाला जेवढे आवश्‍यक वाटते, त्याहून अधिक वेळ दात घासा पण त्याची झिंग चढू देऊ नका. अनेकजण आपले दात अक्षरश: रगडतात, त्यामुळे संवेदनशील हिरडयांना त्रास होतो. बरीच मंडळी हा प्रकार योग्य असल्याचे मुलांवर बिंबवितात. वास्तविक हा प्रकार सोपा व जलद असल्याचे अनेकांना वाटते, पण तसे नाही. तुम्ही फक्‍त दोन मिनिटे योग्यरित्या ब्रश करू शकता, तेवढे पुरेसे आहे.

 

मधुमेह आणि मुख आरोग्य
मधुमेह हा एका विषासारखा आजार असून तो विविध अवयवांवर परिणाम करतो आणि आरोग्याचे इतर प्रश्‍नही त्यामुळे भेडसावतात. नंतरच्या टप्प्यांमध्ये हे आजार डोळे, मज्जाव्यवस्था, मूत्रपिंड आणि हृदय इत्यादींवर परिणाम करतात.

मधुमेह संसर्गाप्रती आपली प्रतिकारशक्‍ती कमी करतो आणि बरं होण्याच्या प्रक्रियेचा वेगही कमी करतो. तुम्हाला मधुमेह असल्यास तुम्हाला हिरड्यांचा त्रास होण्याची शक्‍यता जास्त आहे. त्यामुळे आपल्याला रक्‍तशर्करेचं व्यवस्थापन करताना दात आणि हिरडयांची विशेष काळजी घेण्याची गरज असते.

रक्‍तशर्करेच्या पातळ्यांचे नियंत्रण नीट न केले गेल्यास तुम्हाला हिरड्यांचे आजार होण्याची खूप शक्‍यता असते आणि मधुमेह नसलेल्या लोकांच्या तुलनेत आपण जास्त दात गमावू शकता.

दातांची झीज आहारातील आणि शीतपेयांमधील स्टार्च व साखर या जीवाणूंच्या संपर्कात येतात, तेव्हा प्लाक नावाचा चिकट पडदा तुमच्या दातांवर तयार होतो. प्लाकमधील आम्लं तुमच्या दाताच्या पृष्ठभागावर हल्ला करतात (इनॅमल आणि डेंटिन). यामुळे कीड लागण्याची शक्‍यता असते.

कोरडे तोंड
कोरडे तोंड हे तुमच्या तोंडातील ग्रंथींमधून (लाळग्रंथी) निर्माण होणाऱ्या लाळेच्या प्रमाणातील घट झाल्यामुळे होते आणि तो सामान्यत: औषधांचा साईड इफेक्‍ट असतो.

बुरशीजन्य संसर्ग
तोंडाची जळजळ मधुमेह असलेल्या लोकांना संसर्गाचा सामना करण्यासाठी सतत अँटिबायोटिक्‍स घ्याव्या लागतात. त्यामुळे त्यांना तोंडात आणि जिभेवर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्‍यता असते. ही बुरशी अनियंत्रित मधुमेह असलेल्या लोकांच्या लाळेतील साखरेच्या उच्च प्रमाणावर जगतात. त्यामुळे तुमचे तोंड आणि जीभ जळजळू शकते.

दातांतील कीड
तुम्हाला दंतक्षयामुळे कीड निर्माण होते. ती दाताच्या बाहेरील आवरण (इनॅमल) आणि अंतर्गत आवरण (डेंटिन) त्यावरही परिणाम करू शकते.

हिरड्यांची सूज
ही जीभ, हिरडया, ओठ किंवा गालांच्या आत होते. ते अल्सर्स म्हणून किंवा तोंडात लाल-पांढरे चट्टे म्हणून दिसू शकतात.

अल्सर्स
या सामान्यत: लहान, वेदनादायी फोडी असतात, ज्या तुमच्या तोंडात किंवा तुमच्या हिरड्यांच्या तळाशी होऊ शकतात. त्यामुळे खाणे, पिणे आणि बोलणे वेदनादायी होऊ शकते.

चवीतील अडथळे
हा सर्वात मोठा चवीतील अडथळा आहे, जो टिकून राहतो. सामान्यत: तुमच्या तोंडात काहीही नसले तरीही नकोसे वाटते. तुुम्ही हे त्रास दूर करण्यासाठी बरंच काही करू शकता. त्यासाठी आपल्याला तोंड, दात आणि हिरडयांची नीट काळजी घेण्यापासून सुरुवात केली पाहिजे.

काही टीप्स खालीलप्रमाणे…
तुमचे तोंड कोरडे असल्यास अल्कोहोलमुक्‍त माऊथवॉशने खळबळून धुवा.
तुमच्या आहारात दूध, चीझ, चिकन इत्यादींचा समावेश करा. या आहारामुळे दाताच्या इनॅमलला कॅल्शियमचा पुरवठा करून त्याचे संरक्षण होते.
प्रत्येक आहारानंतर तुमचे दात स्वच्छ घासा. खाण्यानंतर ब्रशपूर्वी किमान अर्धा तास थांबून इनॅमलचे संरक्षण करा.
मऊ ब्रिसल्सचे टूथब्रश वापरा.
दिवसातून एकदा तरी फ्लॉस करा.
डेंचर्सचा वापर करत असल्यास ते रोज स्वच्छ करा. डेंचर्स लावून झोपू नका.

Tags: 10 min exerciseaarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedaBenefits fit exerciseblood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietHealth Indoor Exercise
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar