Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Devendra Fadnavis Daughter Divija Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी बाप्पांचे आगमन; लेक दिविजाच्या लूकने खेचली सर्वांची नजर

by
August 28, 2025
in लाईफस्टाईल
A A
Devendra Fadnavis Daughter Divija Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी बाप्पांचे आगमन; लेक दिविजाच्या लूकने खेचली सर्वांची नजर
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Devendra Fadnavis Daughter Divija Fadnavis: गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रभर उत्साहाचे वातावरण आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले. या निमित्ताने झालेल्या स्वागत समारंभात नेहमीप्रमाणे अमृता फडणवीस यांच्या लूकची चर्चा झालीच, पण यावेळी विशेष आकर्षण ठरली त्यांची मुलगी दिविजा फडणवीस. साध्या, पण देखण्या साडीतील तिचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना पती आणि लेकीसोबतचा एक खास क्षण शेअर केला. व्हिडिओमध्ये सीएम फडणवीस बप्पाला घरी आणताना दिसतात, तर त्यांच्या मागे अमृता आणि दिविजा दोघीही पारंपरिक वेशभूषेत चालताना दिसल्या. साधारणपणे क्वचितच प्रकाशझोतात दिसणारी दिविजा, यावेळी तिच्या साध्या पण मोहक लूकमुळे चर्चेत आली.

अमृता फडणवीस नेहमी आपल्या वेगवेगळ्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांना मोहून टाकतात. या वेळी त्यांनी निळ्या रंगाची फ्लोरल साडी परिधान केली होती. सोनेरी दागिने, बिंदी आणि खुले केस या सर्वांमुळे त्यांचा लूक नेहमीप्रमाणेच ग्रेसफुल दिसत होता. मात्र, या मोहकतेवरही दिविजाने आपल्या सोज्वळ साडी लूकने सर्वांची मने जिंकली.

दिविजाने गुलाबी रंगाची फ्लोरल साडी नेसली होती. त्यावर पांढरे, हिरवे आणि जांभळट रंगाचे सुंदर फुलांचे डिझाईन होते. त्याचसोबत फ्लोरल ज्वेलरी, गुलाबी फुलांचा नेकपीस, स्टड इअररिंग्स आणि मॅचिंग बांगड्या घालून तिने आपला लूक पूर्ण केला. कपाळावरील छोटीशी टिकली आणि कुंकू यामुळे तिच्या लूकमध्ये अधिकच पारंपरिक भाव झळकत होता.

गेल्या काही वर्षांपासून अमृता फडणवीस यांच्या फॅशन सेन्सची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते. मात्र यावेळी त्यांच्या लेकीने आपल्या साध्या आणि देखण्या अवताराने आईलाही मागे टाकले, असे नेटकरी म्हणताना दिसत आहेत.

गणेशोत्सवाच्या या शुभ प्रसंगी फडणवीस कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बप्पाच्या स्वागतासोबतच दिविजाच्या पारंपरिक सोज्वळ लूकने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

Join our WhatsApp Channel

The post Devendra Fadnavis Daughter Divija Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी बाप्पांचे आगमन; लेक दिविजाच्या लूकने खेचली सर्वांची नजर appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar