Tuesday, September 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Dental Health: दातांमध्ये कीड वाढतेय? वेळेत काळजी घेतली तर रूट कॅनल टाळता येईल

by
March 10, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Dental Health: दातांना कीड लागल्यानंतर दात वाचवण्यासाठी केला जाणारा उपचार म्हणजे रूट कॅनल. या उपचारात दातातील कीड काढून नसा साफ केल्या जातात आणि दात पुन्हा भरला जातो. मात्र योग्य काळजी घेतल्यास दातांना कीड लागणे आणि रूट कॅनलची वेळ येणे टाळता येऊ शकते.

आजकाल बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि वेळेअवेळी खाण्याच्या सवयींमुळे दातांच्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. विशेषतः दातांना कीड लागण्याची समस्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये आढळते. दातांना कीड लागल्यामुळे सुरुवातीला किरकोळ त्रास होतो, पण नंतर ती वाढल्यास तीव्र वेदना होऊ शकतात. Dental Health

दातांमध्ये कीड वाढल्यास त्या भागात वेदना होतात. काही वेळा दातांच्या आसपास सूज येते किंवा पू तयार होतो. अशा वेळी अनेक जण दंतचिकित्सकाकडे उपचारासाठी जातात. मात्र काही लोक दात वाचवण्याऐवजी तो काढून टाकण्याचा पर्याय निवडतात. पण दात काढल्यास पुढे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. Dental Health

दात हे आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. अन्न व्यवस्थित चावण्यासाठी, स्पष्ट बोलण्यासाठी आणि चेहऱ्याची रचना नीट दिसण्यासाठी दातांची मोठी भूमिका असते. त्यामुळे दातांचे आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक आहे.

दात किडल्याची काही लक्षणे सहज ओळखता येतात. जसे की एका बाजूने अन्न चावताना त्रास होणे, तोंड उघडताना वेदना होणे, तोंडाच्या सांध्यातून आवाज येणे किंवा जबड्याच्या सांध्यात वेदना जाणवणे. अशी लक्षणे दिसू लागल्यास त्वरित दातांची तपासणी करून घेणे गरजेचे असते.

लहान मुलांमध्ये कीड लागलेला दात वेळेआधी काढल्यास पुढे येणारे कायमचे दात वाकडे किंवा चुकीच्या पद्धतीने येण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो दात वाचवण्यावर भर दिला पाहिजे.

दातांना कीड लागल्यानंतर दात वाचवण्यासाठी रूट कॅनल उपचार केला जातो. या प्रक्रियेत सर्वप्रथम दातातील कीड पूर्णपणे काढून टाकली जाते. त्यानंतर दातातील नसा काढून दाताचा आतील भाग नीट साफ केला जातो. साफ केल्यानंतर त्या जागेत कृत्रिम पदार्थ भरला जातो आणि दात बंद केला जातो.

रूट कॅनल केलेला दात जिवंत राहत नाही, त्यामुळे तो काहीसा ठिसूळ होतो. त्यामुळे अशा दातावर कॅप किंवा क्राऊन बसविणे आवश्यक असते. यामुळे दात मजबूत राहतो आणि त्याचे आयुष्यही वाढते.

मात्र प्रत्येक किडलेल्या दातावर रूट कॅनल उपचार करणे शक्य असतेच असे नाही. जर दात खूप किडला असेल किंवा त्याची मुळे खूप वाकडी असतील, तर हा उपचार करणे कठीण होते. त्यामुळे दातांमध्ये कीड दिसताच त्वरित उपचार करणे महत्त्वाचे असते.

उपचार करण्यापेक्षा दातांना कीड लागू नये यासाठी काही साध्या सवयी अंगीकारणे अधिक फायदेशीर ठरते. दिवसातून दोन ते तीन वेळा दात स्वच्छ ब्रश करणे, दातांच्या फटींमध्ये अडकलेले अन्न फ्लॉसने काढणे आणि प्रत्येक जेवणानंतर चूळ भरणे या सवयी दात निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.

तसेच दोन जेवणांच्या मधे जास्त गोड पदार्थ खाणे टाळणे आणि वेळोवेळी दातांची तपासणी करून घेणेही आवश्यक आहे. अशा साध्या सवयी अंगीकारल्यास दातांचे आरोग्य चांगले राहते आणि रूट कॅनलसारख्या उपचारांची गरजही टाळता येते.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar