Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

दातांच्या कॅप्स आणि तुम्ही; जाणून घ्या सर्व तपशील

by प्रभात वृत्तसेवा
March 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
डेन्टल कॅप केव्हा बसवावी लागू शकते ?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

– डॉ. श्‍वेता काकडे पोतदार

1. दातांवरची कॅप म्हणजे नक्की काय असते?
बऱ्याचदा दात खूप किडला असेल तर ट्रिटमेंट करताना संपूर्ण कीड काढून झाल्यावर असे लक्षात येते की, दाताचा पुष्कळ भाग पोखरला गेला आहे. असे दात नुसतेच सिमेंट लावून ठेवले तर तुटू शकतात. एखाद्या दाताला जर खोलवर फ्रॅक्‍चर झाले असेल तर तो काढावा लागतो. असे होऊ नये म्हणून दातांवर कॅप बसवतात. कॅप हे दातांवर बसवलेले एक कवच असते. तोंडात दिसणारा दाताचा भाग हा संपूर्णपणे कॅपमध्ये झाकला जातो. म्हणून त्याला कॅप असे म्हणले जाते.

2. कॅप केव्हा केव्हा बसवावी लागू शकते?

  • रूट कॅनल झालेल्या दातावर.
  • इंप्लांट बसवला असेल तर त्याच्यावर चावायला कॅप बसवावी लागते.
  • जर ब्रिजच्या सहाय्याने नसलेले दात बसवायचे असतील तर बऱ्याच कॅप मिळून एक प्रिज बसवता येतो.
  • जर एखादया व्यक्तीला दात चावायची सवय असेल, तर दातांची झीज होण्यापासून थांबवायला कॅप बसवली जाते.
  • जर एखादया दाताचा आकार रंग काही दातांची ठेवण दुरूस्त करायची असेल तर कॅपच्या सहाय्याने स्माईल डिझाइनिंग करता येते.

3. कॅपचा रंग दातासारखा करता येतो का?
होय; कॅपचा रंग दातासारखा करता येतो. बऱ्याच वेगवेगळया प्रकारच्या कॅप्स करता येतात. आपल्या डॉक्‍टरांशी बोलून आपण ठरवू शकता की आपल्यासाठी सर्वात उत्तम कोणती ठरू शकते. उदा. मेटल, सिरॅमिक (मेटल असलेले) झिरकोनिया इत्यादी. (बिना मेटलचे सिरॅमिक) कॅपचा रंग अगदी हुबेहुब दातासारखा करता येतो. जर समोरचा दात असेल तर अगदी ओळखू न येण्याइतका रंगात साम्य आणता येते.

4. कॅप बसवण्यासाठी डॉक्‍टरांकडे किती वेळा जाव लागू शकते?
कॅप बसवण्यासाठी आपल्याला डॉक्‍टरांकडे साधारण 2 ते 4 वेळेस जावे लागू शकते.

5. कॅप बसवण्यासाठी दातामध्ये काही फरक करावा लागतो का?
कॅप बसवण्यासाठी दाताला एक विशिष्ट आकार द्यावा लागतो. कॅप बसवण्यासाठी जागा तयार करावी लागते. त्यासाठी दात सर्व बाजूंनी लहान करावा लागतो.

6. कॅप बसवलयावर चावायला त्रास होतो का?
अन्न चावणे व्यवस्थित असावे म्हणूनच आपण कॅप बसवतो. कॅप बसवलयावर सर्व नेहमीच्या जेवणातले सर्वच पदार्थ खाता यायला पाहिजेत. फक्त खूप चिकट पदार्थ खाणे टाळावे. त्याने कॅप निघून येऊ शकते.

7. कॅप निघून आली तर नवीन कॅप बसवावी लागते का?
बसवलेली कॅप जर निघून आली तर तिचे निघायचे कारण निश्‍चित करणे महत्वाचे असते. जर आतला दात खराब झाल्यामुळे कॅप निघाली असेल तर दात व्यवस्थित करून मग ठरवता येते की, तिच कॅप बसेल का नवीन करावी लागेल. जर नुसतीच कॅप निसटून आली असेल तर 4-5 दिवसात तिच परत बसवली जाऊ षकते. त्यानंतर कॅपचे फिटींग बिघडते.

8. कॅप बसवल्यावर किती वेळ खाता येत नाही?
कॅप बसवल्यावर साधारण 1 तास काही खाऊ नये. तास भरांतर खायला सुरवात करता येते.

9. कॅप बसवल्यावर दात घासताना ती पडेल का?
दात घासताना कॅप पडत नाही. कॅप बसवल्यावर बशिंग व फ्लॉसिंग नियमीतपणे चालू ठेवावे. कॅपची काळजी अगदी खऱ्या दातासारखी घ्यावी. तरच ती दीर्घकाळ टिकेल.

10. कॅप बसवल्यावर उंचवटा वाटतो का?
कॅप बसवल्यावर एखादा दिवस वेगळेपणा जाणवतो. पण जर इतर दात एकमेकांवर टेकत नसतील तर डॉक्‍टरांना लगेच सांगावे. कॅपमध्ये उंचवटा असल्याने असे वाटते त्यामुळे दात दुखू शकतो व त्रास वाढू शकते.

11. कॅप आयुषयभर टिकते का?
आपला खरा दात खराब झाला की त्यावर कॅप बसवावी लागते. जर खरा दात आयुष्यभर नाही टिकत तर कॅप कशी टिकेल? एक कॅप साधारण 5-7 वर्षे टिकू षकते. जर मेंटेनन्स व्यवस्थित असेल तर अजून काही काळ टिकते.

12. कॅप बसवायची प्रक्रीया काय असते?
पहिल्या भेटीत आपल्या दाताला आकार देऊन त्याचे माप घेतले जाते. दुसऱ्या भेटीत ट्रायल घेतली जाते. जर ट्रायल मध्ये सगळे व्यवस्थित असले तर तिसऱ्या भेटीत कॅप बसवली जाते.

13. कुठली कॅप सर्वात उत्तम?
सर्व प्रकारच्या कॅप्सचे काम एकच असते, दाताचे संरक्षण करणे. पण डॉक्‍टर दात तपासून सांगतील की तुमच्यासाठी सर्वात योग्य कॅप कोणती ठरेल ते. प्रत्येकाच्या दाताच्या परिस्थितीवर अवलंबून असते की कोणती कॅप चांगली ठरेल.

Tags: Dental CapsDr. Shweta Kakde Potdar
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar