समुपदेशनाच्या क्षेत्रात काम करताना लोकांकडून अनेकदा काही प्रश्न वारंवार विचारले जातात. त्यातलाच एक म्हणजे मानसिक आरोग्य सुदृढ कसं ठेवायचं? निकोप मानसिक आरोग्य कसं मिळवायचं? जसं शारीरिक आरोग्य उत्तम ठेवायला व्यायाम आणि सकस आहार महत्त्वाचं असतं तसं मानसिक स्वास्थ्यासाठी काय महत्त्वाचं असतं? या प्रश्नाचं उत्तर आहे-
सकारात्मक विचार ( always think positive in marathi )
सकारात्मक विचार किंवा positive thinking ही मानसिक आरोग्याची जणू गुरुकिल्लीच आहे असं म्हणता येईल. बघा ना, जेव्हा आपण अस्वस्थ असतो, दुःखी असतो, उदास असतो, ताप, चिडचिड अनुभवत असतो, तेव्हा आपले कोणते विचार कार्यरत असतात? आणि जेव्हा आनंद, सुख, समाधान अनुभवत असतो तेव्हा कोणते विचार असतात? अर्थात अनुक्रमे असणारी उत्तर नकारात्मक आणि सकारात्मक विचार हीच येणार. आपण दिवसभर ज्या ज्या कृती करतो, भावना अनुभवतो त्या साऱ्याच्या मागे आपले विचार असतात. विचारांमुळेच प्रेरीत होऊन आपण कृती किंवा काम करत असतो.
त्यामुळे हे विचार जितके सकारात्मक तितक्या कृती आणि भावनाही सकारात्मकच असणार हे अगदी साधं समीकरण आहे. त्यामुळे तुम्हाला जर मानसिक आरोग्य सांभाळायचं असेल, त्याचा आनंद लुटायचा असेल तर सकारात्मक विचार करायला शिका. हे सकारात्मक विचार आपल्याला काम करण्याची, ध्येय्य साध्य करण्यासाठी धडपडण्याची, कष्ट करण्याची आणि संकटातही खंबीरपणे, न डगमगता उभं राहण्याची प्रेरणा देतात. या सकारात्मक विचारांनाच बोली भाषेत “इच्छाशक्ती’ असं म्हटलं जातं आणि कितीही संकटं आली तरी केवळ या इच्छाशक्तीच्या जोरावर त्या संकटांवर मात करून यश मिळवलेली अनेक माणसं आपण आजूबाजूला पाहतो. आपण त्याचं कौतुकसुद्धा करतो, पण ती इच्छाशक्ती स्वतःमध्ये रुजवायला मात्र विसरतो. आणि मग छोट्या छोट्या अपयशांनी, अडचणींनी किंवा मग अनुभवांनी खचून जातो. नकारात्मक विचार आपलं मन झाकोळून टाकतात आणि पर्यायाने आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं.
जर आपले विचार सकारात्मक बनवायचे असतील तर अगदी सोपा उपाय म्हणजे स्वतःच स्वतःशी बोलणं. ज्याला मानसशास्त्रीय भाषेत स्व-गत किंवा ीशश्रष ींरश्रज्ञ म्हणलं जातं ते सकारात्मक आशावादी ठेवा. “मला हे येईल का? मला जमेल का? हे किती अवघड आहे, ही गोष्ट मला आयुष्यात कधी जमली नाही, हे करायला मी असमर्थ आहे.’ असे विचार करण्यापेक्षा “मी प्रयत्न करेन, मला जमेल, मी हे निश्चित शिकून घेईन, यातूनही काहीतरी चांगला मार्ग नक्की सापडेल.’ असे विचार करायला शिका. वाक्यं नीट वाचली तर आपल्या असं लक्षात येईल की, सकारात्मक वाक्य कृती करायला प्रेरणा देणारी आहेत. यातून कळत नकळत तुमच्या मेंदूपर्यंत जाणारी प्रत्येक सूचना सकारात्मक आहे आणि त्यामुळे भावना आणि कृतीही सकारात्मकच.
अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विचार केलात तर लक्षात येईल की, आध्यात्मही आपल्याला सकारात्मकता बाळगा हाच. संदेश देत म्हणून तर असं म्हणतात ना की; चांगलं काम करा चांगलंच फळ मिळेल, चित्त प्रसन्न ठेवा यश आपोआप मिळेल. चांगला विचार करा तर तुमच्याबाबतीत चांगलंच घडेल. खुद्द देवही आपल्याला असं सांगतात की, “तू प्रयत्न कर मी तुला यश मिळवून देईन’ काम न करता फळाची अपेक्षा करू नका. या साऱ्याचा मतितार्थ एवढाच की सत्विचार आणि सतकर्म करा यश आरोपआप मिळेल. म्हणजेच सकारात्मक विचार आणि कृती. तुमच्यापैकी काहीजणांनी “द सिक्रेट’ हे पुस्तक वाचलं असेल. त्यात लेखक असं म्हणतात की, तुम्हाला जे नको आहे त्याचा नाहीतर तुम्हाला जे हवं आहे त्याचा विचार करा.
जे तुम्हाला हवंय ते तुमच्याकडे आहे अशी कल्पना करत जगा म्हणजे ब्रह्मांड ती गोष्ट तुमच्यार्पंत पोहोचवते म्हणजे “मला आजारपण नको.’ असं म्हणण्यापेक्षा “आजपासून माझं आरोग्य उत्तम राहणार आहे’ असं म्हणा आणि आरोग्य उत्तम असल्याचे सतत स्वतःला सांगा म्हणजे आरोग्य खरंच उत्तम राहील. ब्रह्मांड त्यासाठी कार्यशील होईल. याचाच अर्थ “सकारात्मक विचार’.
हे सकारात्मक विचार म्हणजे जादूची काठी आहे. या सकारात्मक विचारांवर म्हणजेच इच्छाशक्तीवरच तर अनेकजण दुर्धर व्याधी, असाध्य रोग किंवा आयुष्यातल्या अडचणींवर मात करत आयुष्य जगतात आणि उत्तुंग यश मिळवतात. तर मग आता तुम्हीही सकारात्मक विचार करण्याचा निश्चय करा आणि मला सुदृढ मानसिक आरोग्य लाभेलच आणि मी ते मिळवेनच असे स्वतःला सांगा.( always think positive in marathi )