भारतीय जेवणात वापरण्यात येणारे सगळे पदार्थ शरीरात औषधीच्या रूपात काम करतात. त्यातूनच एक आहे कढीपत्ता, ज्याने कढी आणि आमटी चविष्ट बनते. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे 100 ग्राम कढीपत्त्याच्या पानात 66.3 टक्के आर्द्रता, 6.1 टक्के प्रोटीन, एक टक्का चरबी, 16 टक्के कार्बोहाइड्रेट, 6.4 टक्के फायबर 4.2 टक्के खनिज आढळतं.
पाहू कढीपत्ता सेवन केल्याने अनेक फायदे होतात. कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहते, नियमित कढीपत्ता सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते, दर रोज कढीपत्ता चावल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते, मधुमेही रुग्णाने सतत तीन महिने रोज सकाळी कढीपत्ता खाल्ल्याने फायदा होईल.
शिवाय केस गळत असल्यासही कढीपत्ता आहारात समाविष्ट करावा. इतकेच नाही तर पोटातील रोगांवरही कढीपत्ता फायदेशीर आहे. पोटातील रोगांवर मात करण्यासाठी ताकात कढीपत्ता घालून पिण्याने आराम मिळतो किंवा कढीपत्त्याचा रस काढून त्यात लिंबू पिळून थोडीशी साखर मिसळून सेवन करावे.
कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना कढीपत्ता वापरावा ज्याने पोटातील रोगांपासून आराम मिळतो. याशिवायही कढीपत्त्याचे इतर अनेक फायदे आहेत. कढीपत्त्याने डोळ्यांची ज्योती वाढत असून याचे सेवन केल्याने काचबिंदू सारखे रोग दूर होऊ शकतात. तोंडातील छाले आणि डोकेदुखीवर कढीपत्त्याची ताजी पाने लाभदायक असतात.
कढीपत्ता कफ बाहेर काढण्यात मदत करतो. कफ दूर करण्यासाठी एक चमचा मधात एक चमचा कढी पत्त्याचा रस मिसळून सेवन केल्यास कफाचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. कढीपत्ता पावडरमध्ये लिंबाचे 2-3 थेंब आणि थोडीशी साखर मिसळून खाल्ल्याने उल्टीचा त्रास नाहीसा होतो. अशा प्रकारे केवळ पोटाच्या आजारांवरच नाही तर कढीपत्ता अनेक प्रकारच्या विकारांवर गुणकारी आहे. त्याचे नियमित सेवन करावे.