संधिवात झालेल्या व्यक्तींना जरा जरी हात लावला तरी दुखते, मुंग्या येतात, चावल्यासारख्या वेदना होतात. पण अशावेळी घाबरून जाऊ नये. मसाज हा संधिवातावर उत्तम उपचार आहे. हा उपचार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामध्येच सध्या लोकप्रिय असलेला मसाज म्हणजे संधिवातावरील क्रिस्टल मसाज होय. क्रिस्टल द्वारा म्हणजेच विविध रंगाच्या स्फटिकांद्वारा मसाज केला जातो. हा मसाज तज्ज्ञांकडून घ्यावा. ( arthritis crystal massage treatment )
मसाज शक्यतो दुसऱ्याला द्यावा किंवा आपण दुसऱ्याकडून करून घ्यावा. प्रथम पोटावर छोटा क्रिस्टल ठेवावा. नंतर तळपायाला स्फटिक किंचित दाबून हळूहळू मसाज करावा. ह्याप्रमाणे दोन्ही पायांना मसाज झाल्यावर मग पाठीच्या कण्यावर हळूवारपणे क्रिस्टल ठेवून मसाज करावा.
मग अनुक्रमे मसाज करून खांदे, मान, डोके, हात ह्याप्रमाणे क्रमवार मसाज करीत यावे. नंतर उताणे झोपवून पायापासून गुडघ्यांपर्यंत मसाज करत यावे. नंतर पोटावर स्फटिक ठेवून घड्याळाच्या काट्याप्रमाणे गोलाकार हळूवार मसाज करावा. त्याहीपेक्षा हळूवार मसाज हृदयाला करावा. नंतर गाल, कपाळ, केस यांनाही मसाज करावा.
ह्या मसाजाने त्वरित आराम मिळतो. उत्साह वाटतो व शरीर, मन अत्यंत तरतरीत ताजेतवाने होते. विशिष्टप्रकारे स्फटीक ठेवले जातात. सर्वसाधारणपणे षट्चक्रांच्या रंगांचे स्फटिक मसाज वापरले जातात. यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. त्याचप्रमाणे ऑरा बॅलन्ससाठी त्या त्या चक्रावर ते ते स्फटिक ठेवून तळहातांवरही स्फटिके ठेवून डोळे मिटून शांतपणे 20 ते 30 मिनिटे पडून राहावे. दीर्घश्वसन करावे व मग रिलॅक्स व्हावे.
जर सर्व स्फटिके उपलब्ध नसतील तर मणिपूर, हृदय व आज्ञाचक्रावरच स्फटिक ठेवून दीर्घश्वसन करून नंतर शांतपणे पडून राहावे. क्रिस्टल मसाज थेरपी ही काही ऍजमसन्सवर आहे. प्रत्येकवेळी सकारात्मक विचार करून मसाज करावा. म्हणजे गुण त्वरीत मिळेल. ( arthritis crystal massage treatment )